शतायुषींचे ‘नील’प्रदेश
Submitted by हेमंतकुमार on 11 April, 2026 - 22:17
मानवी जीवनातील दोन मूलभूत टप्पे म्हणजे जन्म आणि मृत्यू. या दोहोंदरम्यानचा कालावधी म्हणजे आपले आयुष्य. आयुष्याचा कालावधी अत्यंत भिन्न असू शकतो. एका टोकाला पाहता, जन्मताच मृत होणाऱ्या बालकाच्या बाबतीत आयुष्य अक्षरशः क्षणभंगुर ठरते तर दुसऱ्या टोकाला तब्बल 122 वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेले एखाददुसरे विक्रमी उदाहरण मानवी इतिहासात नोंदलेले दिसते. सरासरी आयुर्मान हा देखील जागतिक भिन्नतेचा विषय असून आजच्या घडीला त्याची व्याप्ती 55 ते 85 वर्षांपर्यंत दिसून येते. आज जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत शतायुषी असलेल्या माणसांचे प्रमाण अत्यल्प (0.007% ते 0.01%) आहे.
विषय:
शब्दखुणा: