सुरक्षित चौकटीत जगणारा ..........

चौकट

Submitted by मिरिंडा on 23 June, 2023 - 06:02

सुरक्षित चौकटीत
जगणारा माझा चेहरा
वेल फेड वेल पेड
दिसणारा माझा
तजेलदार चेहरा
मला आणि माझ्या
चौकटीतले बांधवांना
आवडतो

त्याला चौकट सुरक्षितता देते
संरक्षण देते
आणि मी शिकतो
चौकटीतले शिक्षण
करतो चौकटीतलं
लग्न ,...
पण चौकटीचा तुरुंग
मला जाणवत नाही
माझ्या कुटुंबाला
कारण मी
माझ्या कुटुंबासहित
चौकटीबाहेर
कधीच उडत नाही

प्रांत/गाव: 
Subscribe to RSS - सुरक्षित चौकटीत जगणारा ..........