बहिनाईची लेकरं

बहिनाईची लेकरं

Submitted by Asu on 24 August, 2019 - 05:52

लेवा गणबोलीत अजरामर कविता लिहून कवितांबरोबरच लेवा गणबोलीलाही खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या निसर्गकन्या 'बहिणाबाई चौधरी' यांना १३९ व्या जयंतीनिमित्त माझी लेवा गणबोलीत काव्यांजली-

बहिनाईची लेकरं

लेवा गनबोलीत कवनं केली
मुखे बहिनाईच्या परकटली
न्यान सांगत, जगा जग्याचं
आमर गानी निसर्गात झाली

बहिनाईची आम्ही लेकरं
तापी गिरणाचं पानी पेतो
नामा-तुक्याचे अभंग मुखी
गानं निसर्गाचं गातो

साधी-भोयी आम्ही मानसं
तुयशी माय शोभते गया
पंढरपूरचे नित वारकरी
कपायी गोपीचंदन टिया

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बहिनाईची लेकरं