Submitted by केशवकूल on 6 July, 2026 - 06:17
महाराष्ट्रात SIR सुरु झाले आहे का?
मी असे ऐकले आहे कि पुण्यात SIR प्रोसेस सुरु झाली आहे. ह्या बद्दल कुणाला काही माहिती आहे का?
हे आर्टिकल वाचा
https://thewire.in/labour/maharashtra-blo-whatsapp-groups-sir-details-vo...
Overworked and With Very Little Time, Some Maharashtra BLOs Are Collecting SIR Details Through WhatsApp Groups
आणि माझ्याकडे मोबाईल नाही, कसे होणार?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>महाराष्ट्रात SIR सुरु झाले
>>महाराष्ट्रात SIR सुरु झाले आहे का?>> हो. घरी येतात पण ओटिपी विचारत नाहीत. त्यामुळे तो एक आइडी मिळणार असतो तो मिळत नाही.
ओनलाईन करायची मुदत १-१५ मे होती. आता पुन्हा जानेवारी २०२७ मध्ये होईल.
१ ते १५ ऑनलाइन जनगणनेच्या
१ ते १५ ऑनलाइन जनगणनेच्या तारखा होत्या. self enumeration. हे झाल्यावर घरोघरी जाऊनही माहिती घेण्यात आली. ज्यांनी ऑनलाइन केली त्यांना ईमेलने SE ID आला. घरी आलेल्या नोंदणी करणार्याने दिलेली माहिती कन्फर्म केली. ही पहिली फेरी. यात अधिकतर घराबद्दलची माहिती होती. घरात राहणार्या माणसांबद्दलची माहिती नोंदवायला दुसरी फेरी होईल.
SIR आणि जनगणना वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
आमच्या भागात कॉलनीतच्या असोसिएशनना आणि सोसायट्यांच्या पदाधिकार्यांना BLO ने संपर्क साधून मॅपिंग साठी दोनदा कँप आयोजित केले. आता परवा आमच्या भागात येणार आहेत. तुम्ही तुमच्या BLO ला फोन करून विचारा.

BLO चा फोन नंबर https://electoralsearch.eci.gov.in/uesfmempmlkypo इथे मिळेल.
SIR सुद्धा ऑनलाइन करता येत असावे. मी अजून पाहिले नाही. इथे दिसते आहे.
https://voters.eci.gov.in/
हे माझ्या BLO ने पाठवलं
हे माझ्या BLO ने पाठवलं
हे भारताबाहेर रहाणार्यांनी
हे भारताबाहेर रहाणार्यांनी जे भारतीय नागरिक आहेत त्यांनी कसे करायच? नाही केल तर चालेल का?
Thanks
Thanks
भरत. and Srd
तुम्ही मी वर रिफर केलेले Wire मधले आर्टिकल वाचले असेलच.
मला पुण्यातील कोणी माहिती दिली तर बरे होईल.
आमच्या इथे जन गणनेची पहिली फेरी झाली आहे. घराच्या बाहेर काहीतरी कोड नंबर लिहिला गेला आहे.
माझे नागरिकत्व सिद्ध झाले नाही तरी परवा नाही पण माझे थोडे सेविंग आहे ते सुरक्षित राहावे अशी इच्छा आहे.
राहून राहून एक वाईट वाटते आहे कि मी अमेरिकेत का गेलो नाही. इथे सारखी कागदपत्र बनवण्यात वेळ जातो आहे.
उम्र-ए-दराज़ माँग के लाई थी चार दिन
दो आरज़ू में कट गए दो इंतिज़ार में
आधारने सांगितले होते आधार कार्ड कुठेही द्यायची गरज नाही.
इथे स्वच्छता गृहात जायचे तरी आधार नंबर द्यायला लागणार आहे.
सारखे कुठेना कुठे e kyc करतो आहे.
दसा
दसा
२००२ मध्ये मी बांद्र्याला होतो. आता त्या वेळचे electoral रोल कुठे मिळणार?
केशवकुल, इथे शोधाhttps:/
केशवकुल, इथे शोधा
https://ceoelection.maharashtra.gov.in/2002/2002rolldata.aspx
२००२ मधल्या मतदार याद्या {
२००२ मधल्या मतदार याद्या { मिळाल्या तरी} घेऊन काय करणार?
--------------------------------
>>घराच्या बाहेर काहीतरी कोड नंबर लिहिला गेला आहे.>> तो आपल्या कामाचा नसून त्यांचा पर्यवेक्षक तपासणी करत असेल की काम करणारा माणूस खरंच गेला होता का.
-----------------------
गेल्या लोकसभा/ विधानसभा निवडणुकांच्या यादीत
https://electoralsearch.eci.gov.in
मतदार यादीत नाव आहे. मग २००२ च्या याद्या कशाला हव्या आहेत मतदारांना/सरकारला?
>>सारखे कुठेना कुठे e kyc
>>सारखे कुठेना कुठे e kyc करतो आहे.>>>
राष्ट्रीय बँकाकडे डिजीलॉकर वरून EKYC किंवा CKYC घेण्याची व्यवस्था नाही. ती असती तर काही वीस तीस टक्के खातेदारांनी केले असते.
भरत
भरत
आभार
मिळाले माझे नाव. हुस्श्ह!
BTW शोधता शोधता मला सलमान खान च्या सगळ्या भावांचे अरबाझ सोहेल सलीम खान ह्यांची पण नावे सापडली. पहा Galaxy
aptt. पण एहसान नुरानी मुसिक डायरेक्तर ते माझे शेजारी होते. त्यांचे नाव नाही मिळाले.
आता एक फोटो काढून तयार ठेवा.
आता एक फोटो काढून तयार ठेवा. मी उद्या ऑनलाइन करून पाहेन.
>>>२००२ मध्ये मी बांद्र्याला
>>>२००२ मध्ये मी बांद्र्याला होतो. आता त्या वेळचे electoral रोल कुठे मिळणार?>>>
मी दिलेल्या चित्रात सर्व स्टेप आहेत. मी त्याप्रमाणे मिळवले.
द्सा आभार. माझे नाव मिलाले.
द्सा
आभार. माझे नाव मिलाले.
द्सा आभार. माझे नाव मिलाले.
double. काढून टाकले.
दाराबाहेर लिहिलेला नंबर
दाराबाहेर लिहिलेला नंबर जनगणनेच्या पहिल्या पायरीत घरांची माहिती नोंदवणार्याने लिहिला आहे. त्याने फोनमधल्या अॅपद्वारे माहिती नोंदवली किंवा मी आधीच भरलेली माहिती व्हेरिफाय केली.
त्यात बरेच प्रश्न होते. पाणीपुरवठा, सांडपाण्याची व्यवस्था, घरात किती लोक राहतात, बांधकाम कसले आहे, इंटरनेट, वाहने असं काय काय.
सेल्फ एन्युमरेशनमध्ये मॅपवर आपले घर मार्क करायचे होते.
पण इथे जो भाषे बद्दल वाद
पण इथे जो भाषे बद्दल वाद चालला होता त्याबद्दल म्हणजे मातृ भाषा इत्यादी बद्दल मात्र काहीही विचारले नाही.
ते पुढच्या फेरीत. यात फरक घर
ते पुढच्या फेरीत. यात फक्त घर आणि घरातल्या सोयींबद्दल माहिती घेतली. माणसांबद्दलची माहिती पुढच्या फेरीत.
पहिली फेरी house enumeration
इथे SE questions मध्ये प्रश्न पाहता येतील
https://se.census.gov.in/
ओके.
ओके.
https://voters.eci.gov.in
https://voters.eci.gov.in/enumeration-form-new
हा चक्रव्यूह आहे.
झालं एकदाचं ऑनलाइन. बी एल ओ आज आमच्या सोसायटीत येते आहे.
मंदार, समुद्रापारच्या लोकांसाठी तिथे पर्याय दिसतो आहे.
धन्यवाद भरत चेक करतो
धन्यवाद भरत चेक करतो
२००२ च्या मतदार याद्यांच्या
२००२ च्या मतदार याद्यांच्या पीडीएफ फायलीत शोध सुविधा नाही. आपले डोळे वापरून नाव शोधा.
आयोगाने राजकीय पक्षांना ज्या याद्या दिल्या त्याही अशाच होत्या.
आमचे शाळेतले सर एक गोष्ट सांगत. एका सासूची सून कामात फार हुशार होती. सगळी कामे चटकन उरकून टाकी. सासूला तिला कामाविना असलेली बघवत नसे. मग सासू दोनतीन डाळी एकत्र करी आणि तिला त्या वेगवेगळ्या करायचे काम देई.
Online search is therehttps:/
Online search is there
https://voters.eci.gov.in/searchInSIR/S2UA4DPDF-JK4QWODSE
It's easy to search here. You need to know which constituency you were in 2002
फॉर्म मात्र क्लिष्ट आहे
फॉर्म मात्र क्लिष्ट आहे भरायला. पण आमच्या इथल्या BLO ने अगदी व्यवस्थित केलं सगळं. अजून 2 / ३ जणांचा पण इतर BLO बद्दल चांगला अनुभव आहे.
मतदार फेरतपासणीसाठी अर्ज देऊन
मतदार फेरतपासणीसाठी अर्ज देऊन गेलेत. भरून द्यायचे आहेत. ज्यांचे अर्ज जाणार नाहीत ती नावे गळणार.
पुणेकर पी, तुम्ही दिलेली
पुणेकर पी, तुम्ही दिलेली लिंक आधी पाहिली होती. तिथे २००२ मधलं मतदान केंद्र आधीच माहीत असायला हवंय.
तेच तर शोधायचंय ना?
आणि मी लिहिलंय २००२ च्या पीडीएफ याद्यांबद्दल. तिथे कंट्रोल एफ करून नाव शोधता येत नाही. ती सोय असती तर पटापट शोधता आलं असतं.
आमच्याकडे आलेल्या बूथ लेव्हल ऑफिसरबद्दलही लोकांनी चांगलं म्हटलंय. बिचारे शिक्षक शाळा सोडून आलेत.
अर्ज देऊनही तुमचं नाव मतदार
अर्ज देऊनही तुमचं नाव मतदार यादीत राहील याची खात्री नाही.
पण जर २००२ मध्ये माझे नाव
पण जर २००२ मध्ये माझे नाव यादीत असेल तर तेव्हढा संदर्भ मी दिल्यावर पुढची कवायत मी का करावी? एकदा नागरिक तर सदाचा नागरिक नाही का?
समजा माझे नाव यादीत नसेल तर मला कुठल्या देशात ढकलतील?
मागचं SIR 2002 मध्ये झालं
मागचं SIR 2002 मध्ये झालं होतं. त्या यादीत तुमचं नाव आहे म्हणजे तुम्ही व्हेरिफाइड मतदार आहात. म्हणून तेव्हाचे डिटेल्स आताच्या डिटेल्स सोबत द्यायचे. एवढंच करायचं. याला मॅपिंग म्हणतात.
ज्यांची नावं २००२ च्या यादीत नाहीत, त्यांच्यासाठी आणखी गोष्टी लागतील. ज्यांनी मधल्या काळात पत्ता बदललाय, त्यांना जुनी माहिती शोधणं कठीण असू शकेल. अनेकदा पत्ता बदलला असेल तर तेव्हा नेमके कुठे होतो हे आठवून शोधणं कठीण.
जे नंतर मतदार झालेत त्यांना आईवडिलांची माहिती द्यावी लागेल.
माझ्या हाउसहेल्पकडे बर्थ सर्टिफिकेट नाही. तो दहावीपर्यंत शिकलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेमुळे आधार ओळखपत्र म्हणून चालेल.
तुमचं नाव मतदार यादीत आलं नाही तर तुमचं रेशन, इतर सरकारी सुविधा बंद होऊ शकतात. पासपोर्ट मिळणार नाही, असंही होऊ शकतं.
रेशन, इतर सरकारी सुविधा बंद
रेशन, इतर सरकारी सुविधा बंद होऊ शकतात. पासपोर्ट मिळणार नाही, असंही होऊ शकतं.>>>परवा इल्ले !!!
जे नंतर मतदार झालेत त्यांना
जे नंतर मतदार झालेत त्यांना आईवडिलांची माहिती द्यावी लागेल.
>> हो. २००२ मध्ये माझ्या वयाची १८ वर्षे पूर्ण नव्हती. त्यामुळे आता २०२६ ला येऊन माझ्या वडिलांचे PAN कार्ड मागत आहेत. ते द्यायला अजिबात comfortable नाहीयेत. त्यांच्या मते आता लग्न झाल्यावर त्यांची कागदपत्रे देण्याची गरज का भासावी?
Pages