हिंदी चित्रपट सृष्टीत दिसणारा दुटप्पीपणा

Submitted by shendenaxatra on 5 April, 2026 - 17:22
दीवार

धुरंधर ह्या सिनेमाने प्रचंड यश मिळवले आहे आणि अनेक डाव्या, सेक्युलर लोकांना त्यातील अनेक गोष्टी खटकताना दिसत आहेत.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसर्‍या भागात सुरवातीलाच कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन असा श्लोक अनुवादासकट दाखवला होता त्यावरून काहीसा गदारोळ झाला. सिनेमात धार्मिकता कशाला हवी असा एक टीकेचा सूर काही व्यक्तींच्या बोलण्यात आला. ह्यावरून गेल्या ६०-७० वर्षे हिंदी सिनेमात दिसणारा दुटप्पीपणा चर्चिला जावा असे वाटते.
सिनेमात हिंदू धर्म आणि तो पाळणारे कसे वाईट हे विविध पद्धतीने आडवळणाने दाखवले जाते. उलट अन्य धर्म, विशेषतः इस्लाम कसा शांतता प्रेमी आहे. तो धर्म पाळणारे दयेचा, विशाल हृदयाचा, सहिष्णूतेचा, त्यागाचा मूर्तीमंत पुतळा कसे असतात ते कधी सरळ तर कधी आडवळणाने सुचवले जाते.
एक मोठे उदाहरण म्हणजे अमिताभ बच्चनला अँग्री यंग मॅन म्हणून पुढे आणणारा पहिल्या दोन तीन सिनेमातला एक दीवार.
ह्यात नायक म्हणजे अमिताभ बच्चन देवळात जात नाही. आई त्याला देवळातला प्रसाद देते तर तोही खायला नाखूश. भाऊ त्याला प्रसाद नाही तर मिठाई समजून खा असे सांगितल्यावर नाईलाजाने खाणारा.
उलट कामावर बिल्ला लावावा लागतो त्यावरील नंबर हा मुस्लिमांसाठी कमालीचा पवित्र आहे असे कुठलासा मुस्लिम चाचा (अर्थातच दयाळू, मदतीला तत्पर, सहृदयी वगैरे वगैरे!) सांगतो तेव्हापासून तो बिल्ला ह्या हिरोसाठी कमालीचा पवित्र बनतो. हिंदू देव वगैरे न मानणारा बिसमिल्लाह ह्या अर्थाचा बिल्ला तो मोठ्या आदराने जवळ बाळगतो.
हे एक उदाहरण झाले.
असंख्य सिनेमात खलनायक बटबटीत गंध लावून, जाडजूड शेंडी दाखवत, महाकाय निरांजन ओवाळत जय काली मा नाहीतर जय भवानी अशी गर्जना करतो आणि पूजा होताच विकट हास्य करत कुठल्याशा दीन गरीब माणसाचा गळा चिरतो नाहीतर असहाय अबलेवर हात टाकतो असे रमणीय दृश्य आपण अनेकदा पाहिले असेल.
हिंदू धर्मातील जातीभेद हा तर हिंदूना झोडपायचा हक्काचा विषय. तोही वेळोवेळी दिसतोच. पण मुस्लिम धर्मावर अशी टीका करायचा प्रयत्न केला तर प्रचंड वादंग निर्माण होतो. सिनेमावर बंदी येते. दंगल, आंदोलने होतात. मग आपला सिनेमा विविध मौलाना मुफ्ती मंडळींना दाखवून त्यात बदल करून मगच प्रदर्शित होतात. उदा. निकाह, कुली.
सिनेमात धोतर पगडी वगैरे नेसलेला माणूस एक तर विदुषकी आचरट चाळे करणारे पात्र किंवा अत्यंत वाईट वृत्तीचा खलनायक असतो.
उलट मुस्लिम जर म्हातारा, मुस्लिम पद्धतीची दाढी टोपी बाळगणारा असेल तर दयेचा पुतळा, त्यागाची मूर्ती वगैरे असतो.

भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांबद्दल काही दाखवायचे असेल तर दोन्ही देश कसे चांगले आहेत उलट "दोन्ही बाजूचे" काही वाईट लोक दोन देशातले संबंध कसे खराब करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत असे दाखवले जाते.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मुद्दे आवडले. फार पद्धतशीरपणे हे केलं जात होतं आता जाणवतंय. हळूहळू ब्रेनवॉशिंग फॉर हिंदूबॅशिंग आणि इस्लामचं ग्लोरिफिकेशन.

गुगल नुसार चक दे इंडिया हा चित्रपट रंजन नेगी वर आधारित होता. पण चित्रपटात त्याच्या character ला वेगळंच नाव दिलं.

असंख्य सिनेमांमध्ये लेखात वर्णन केलेली परिस्थिती कमालीच्या कौशल्याने मांडलेली असते.

आताच्या धुरंधर सिनेमांत हिंदू असलेल्या, "हिंदू कौम बड़ी डरपोक होती है" चा बदला घेणार्या माधवनला लोक डोक्यावर घेत आहेत. ‌तोच माधवन 3इडियट्स् मध्ये मुस्लिम असताना, "सौ रुपयों में आजकल ट्राफिक हवलदार भी मानता नही है, भगवान क्या खाक मानने वाले थे?" असं म्हणायचा.

Lol हे दळण आहे होय! तुमचं नाव वाचून तुम्ही परत आलात म्हणजे चिकन आऊटचा दिग्विजय साजरा करणार, किमान अनंतकोटी ब्रह्मांड नायकाला चार शेलके शब्द सुनावाल वाटलं आणि आशेने आलो. हेच आपलं नेहेमीचे हिंदू मुस्लिम - धुरंधर आणि बॉलिवूड इ. दळण! ऑलरेडी दोन धाग्यांवर लिहून परत तीच दारू नव्या बाटलीत भरण्याची वेळ का यावी? बाकी काहीच मनासारखं घडत नाही आहे का हो!

>> सिनेमात हिंदू धर्म आणि तो पाळणारे कसे वाईट हे विविध पद्धतीने आडवळणाने दाखवले जाते. उलट अन्य धर्म, विशेषतः इस्लाम कसा शांतता प्रेमी आहे. तो धर्म पाळणारे दयेचा, विशाल हृदयाचा, सहिष्णूतेचा, त्यागाचा मूर्तीमंत पुतळा कसे असतात ते कधी सरळ तर कधी आडवळणाने सुचवले जाते.

ह्या आडवळणाने सुचवले जाण्याने, कोणी दयेचा, विशाल हृदयाचा, सहिष्णूतेचा, त्यागाचा मूर्तीमंत पुतळा होण्यासाठी इस्लाम धर्म स्विकारत नव्हते वा हिंदू धर्म आणि तो पाळणारे कसे वाईट म्हणून धर्म सोडूनही जात नव्हते. सिनेमा फिक्शन आहे हे समजून-उमजून लोकं तो सिनेमा पाहिल्यानंतर सिनेमाघरातच सोडून यायचे.

- (जुन्या-नव्या हिंदी चित्रपटांचा चाहता) सोकाजी

>>
हे दळण आहे होय! तुमचं नाव वाचून तुम्ही परत आलात म्हणजे चिकन आऊटचा दिग्विजय साजरा करणार, किमान अनंतकोटी ब्रह्मांड नायकाला चार शेलके शब्द सुनावाल वाटलं आणि आशेने आलो. हेच आपलं नेहेमीचे हिंदू मुस्लिम - धुरंधर आणि बॉलिवूड इ. दळण! ऑलरेडी दोन धाग्यांवर लिहून परत तीच दारू नव्या बाटलीत भरण्याची वेळ का यावी? बाकी काहीच मनासारखं घडत नाही आहे का हो!
<<
जिथे जो विषय मांडला जात आहे तिथे तो चर्चिला जावा इतपत तारतम्य असावे. नेहमीचेच दळण नाही. धुरंधर हे निमित्त आहे.
हिंदी सिनेमातील हळूहळू भिनणारे हिंदू द्वेषाचे विष हा मुद्दा आहे. आपणास त्यात स्वारस्य नसल्यास सहभागी होऊ नये. आपल्या आवडीची दळणे आहेतच की.
असो.

>>
ह्या आडवळणाने सुचवले जाण्याने, कोणी दयेचा, विशाल हृदयाचा, सहिष्णूतेचा, त्यागाचा मूर्तीमंत पुतळा होण्यासाठी इस्लाम धर्म स्विकारत नव्हते वा हिंदू धर्म आणि तो पाळणारे कसे वाईट म्हणून धर्म सोडूनही जात नव्हते. सिनेमा फिक्शन आहे हे समजून-उमजून लोकं तो सिनेमा पाहिल्यानंतर सिनेमाघरातच सोडून यायचे.
<<
आजिबात नाही. अशा प्रकारचे हळूवार विष हे समाजासाठी घातक आहे. हिंदू धर्म वाईट हिंदू परंपरा वाईट असे वाटणारा वर्ग वाढत जातो.
आपला सुपरस्टार देवासमोर उभा राहून देवाला शिव्या घालतो आहे आणि मग मोठमोठे पराक्रम करतो आहे असे संस्कारक्षम वयात दिसत गेले तर त्याचा अनिष्ट परिणाम होणारच.
पारंपारिक वेषभूषा करणारी व्यक्ती विशेषतः धोतर नेसणारी व्यक्ती एक तर हलकट किंवा विदुषकी आहे असे मनावर ठसवल्यावर तशी वेषभूषा कोण करेल?
जय काली मा आणि जय भवानी किंवा हर हर महादेव म्हणणारा आणि खून बलात्कार करणारा खलनायक बघितल्यावर काली आणि भवानी बद्दल आदर दुणावेल की तिरस्कार वाटेल?
आणि ही टी़का कायम एकाच धर्माला का सहन करावी लागते? बाकी धर्म टीकेपासून मुक्त का?
मशिदीत जाऊन अल्लाच्या नावाने खडे फोडणारा नायक एका तरी सिनेमात दाखवा.
चर्च मधे क्रॉसच्या समोर उभा राहून माझ्या बापाला लोक मारत होते तेव्हा तू कुठे होतास म्हणून आकांडतांडव करणारा हिरो दाखवा.

शोले सिनेमा. ह्यातील धर्मनिंदा थोडी छुपी आहे. बसंती देवळात जाते तेव्हा देवळात मूर्तीमागे लपून धर्मेंद्र देव असल्याचा आव आणून तिला वीरूशी लग्न कर म्हणून सांगतो वगैरे. एक म्हणजे गावातील मुलगी इतकी मूर्ख असते की एक दिवस अचानक देव आपल्याशी बोलतो आहे ह्यात तिला काही लबाडी असल्याचा संशयही येत नाही. थोडक्यात मूर्तीपूजक लोक हे मूर्ख असतात असा थोर संदेश सलीम आणि जावेद यांनी दिला आहे.
त्याच सिनेमात सचिन हे एक पात्र असते जे त्याच्या बापाला सोडून कुठल्याशा विडीच्या कारखान्यात नोकरी मिळत असतानाही जायला तयार नसतो. कल्पना करा की मशिदीत एक नळकांडे घेऊन धर्मेंद्र लपला आहे आणि सचिन नमाज पढायला आला असता (नेहमीची वेळ सोडून अन्य वेळी नमाज पढता येतो) त्या नळकांड्यातून मी अल्ला आहे आणि तुला मीच नोकरी दिली आहे आणि ती तू नाकारून मला अल्लाला अपमानित करत आहेस. चुपचाप निघ आणि ती नोकरी सुरू कर असा प्रसंग दाखवायची सलीम जावेदची हिंमत झाली असती का? मुस्लिमांनी अशी टिंगल सहन केली असती का?

हिंदू ठाकूरच्या घरातील पाच सहा सदस्य मारले जातात त्यावर सगळे गावकरी अश्रू ढाळतात. मात्र एक सचिन गब्बरकडून मारला जातो तेव्हा समस्त गावकरी खवळून जय आणि वीरूला ठार मारायला उद्युक्त होतात. म्हणजे सलीम जावेद हे सुचवतात की हिंदू मारले गेले तर काही विशेष नाही पण एक मुस्लिम मारणे म्हणजे फारच भयंकर!

>>
ह्या आडवळणाने सुचवले जाण्याने, कोणी दयेचा, विशाल हृदयाचा, सहिष्णूतेचा, त्यागाचा मूर्तीमंत पुतळा होण्यासाठी इस्लाम धर्म स्विकारत नव्हते वा हिंदू धर्म आणि तो पाळणारे कसे वाईट म्हणून धर्म सोडूनही जात नव्हते. सिनेमा फिक्शन आहे हे समजून-उमजून लोकं तो सिनेमा पाहिल्यानंतर सिनेमाघरातच सोडून यायचे.
<<
आजिबात नाही. अशा प्रकारचे हळूवार विष हे समाजासाठी घातक आहे. हिंदू धर्म वाईट हिंदू परंपरा वाईट असे वाटणारा वर्ग वाढत जातो.
आपला सुपरस्टार देवासमोर उभा राहून देवाला शिव्या घालतो आहे आणि मग मोठमोठे पराक्रम करतो आहे असे संस्कारक्षम वयात दिसत गेले तर त्याचा अनिष्ट परिणाम होणारच.
पारंपारिक वेषभूषा करणारी व्यक्ती विशेषतः धोतर नेसणारी व्यक्ती एक तर हलकट किंवा विदुषकी आहे असे मनावर ठसवल्यावर तशी वेषभूषा कोण करेल?
जय काली मा आणि जय भवानी किंवा हर हर महादेव म्हणणारा आणि खून बलात्कार करणारा खलनायक बघितल्यावर काली आणि भवानी बद्दल आदर दुणावेल की तिरस्कार वाटेल?
आणि ही टी़का कायम एकाच धर्माला का सहन करावी लागते? बाकी धर्म टीकेपासून मुक्त का?
मशिदीत जाऊन अल्लाच्या नावाने खडे फोडणारा नायक एका तरी सिनेमात दाखवा.
चर्च मधे क्रॉसच्या समोर उभा राहून माझ्या बापाला लोक मारत होते तेव्हा तू कुठे होतास म्हणून आकांडतांडव करणारा हिरो दाखवा.

शोले सिनेमा. ह्यातील धर्मनिंदा थोडी छुपी आहे. बसंती देवळात जाते तेव्हा देवळात मूर्तीमागे लपून धर्मेंद्र देव असल्याचा आव आणून तिला वीरूशी लग्न कर म्हणून सांगतो वगैरे. एक म्हणजे गावातील मुलगी इतकी मूर्ख असते की एक दिवस अचानक देव आपल्याशी बोलतो आहे ह्यात तिला काही लबाडी असल्याचा संशयही येत नाही. थोडक्यात मूर्तीपूजक लोक हे मूर्ख असतात असा थोर संदेश सलीम आणि जावेद यांनी दिला आहे.
त्याच सिनेमात सचिन हे एक पात्र असते जे त्याच्या बापाला सोडून कुठल्याशा विडीच्या कारखान्यात नोकरी मिळत असतानाही जायला तयार नसतो. कल्पना करा की मशिदीत एक नळकांडे घेऊन धर्मेंद्र लपला आहे आणि सचिन नमाज पढायला आला असता (नेहमीची वेळ सोडून अन्य वेळी नमाज पढता येतो) त्या नळकांड्यातून मी अल्ला आहे आणि तुला मीच नोकरी दिली आहे आणि ती तू नाकारून मला अल्लाला अपमानित करत आहेस. चुपचाप निघ आणि ती नोकरी सुरू कर असा प्रसंग दाखवायची सलीम जावेदची हिंमत झाली असती का? मुस्लिमांनी अशी टिंगल सहन केली असती का?

हिंदू ठाकूरच्या घरातील पाच सहा सदस्य मारले जातात त्यावर सगळे गावकरी अश्रू ढाळतात. मात्र एक सचिन गब्बरकडून मारला जातो तेव्हा समस्त गावकरी खवळून जय आणि वीरूला ठार मारायला उद्युक्त होतात. म्हणजे सलीम जावेद हे सुचवतात की हिंदू मारले गेले तर काही विशेष नाही पण एक मुस्लिम मारणे म्हणजे फारच भयंकर!

>> पारंपारिक वेषभूषा करणारी व्यक्ती विशेषतः धोतर नेसणारी व्यक्ती एक तर हलकट किंवा विदुषकी आहे असे मनावर ठसवल्यावर तशी वेषभूषा कोण करेल?

हे अत्यंत हास्यास्पद आहे. तुम्ही धोतर नेसून ऑफिसला ह्यामुळेच जात नाही का? तसं असेल तो सिनेमाचा ताडातोब काढून टाका आणि उद्यापासून धोतर, शेंडी आणि कपाळभर भगवं गंध लावून ऑफिसला जायला सरूवात करा.

सोडा हो, तमाशाने समाज बिघडत नाहि आणि किर्तनाने समाज सुधारत नाहत, सिनेमाचही तसंच असतं.

- (सिनेमा 'फिक्शन' म्हणूनच बघणारा) सोकाजी

>> पारंपारिक वेषभूषा करणारी व्यक्ती विशेषतः धोतर नेसणारी व्यक्ती एक तर हलकट किंवा विदुषकी आहे असे मनावर ठसवल्यावर तशी वेषभूषा कोण करेल?

हे अत्यंत हास्यास्पद आहे. तुम्ही धोतर नेसून ऑफिसला ह्यामुळेच जात नाही का? तसं असेल सिनेमाचा तो पगडा ताबडतोब काढून टाका आणि उद्यापासून धोतर, शेंडी आणि कपाळभर भगवं गंध लावून ऑफिसला जायला सरूवात करा.

सोडा हो, तमाशाने समाज बिघडत नाहि आणि किर्तनाने समाज सुधारत नाहत, सिनेमाचही तसंच असतं.

- (सिनेमा 'फिक्शन' म्हणूनच बघणारा) सोकाजी

आडवळणाने सुचवले जाण्याने, कोणी दयेचा, विशाल हृदयाचा, सहिष्णूतेचा, त्यागाचा मूर्तीमंत पुतळा होण्यासाठी इस्लाम धर्म स्विकारत नव्हते वा हिंदू धर्म आणि तो पाळणारे कसे वाईट म्हणून धर्म सोडूनही जात नव्हते. सिनेमा फिक्शन आहे हे समजून-उमजून लोकं तो सिनेमा पाहिल्यानंतर सिनेमाघरातच सोडून यायचे.

>>> सिनेमाला कुणी फिक्षण समजून गांभीर्याने घेवो अथवा न घेवो, सिनेमात हिंदू धर्म आणि तो पाळणारे कसे वाईट हे विविध पद्धतीने आडवळणाने दाखविणे हा आस्तिक हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अवमान नाही का?

हिंदूंच्या धार्मिक भावना कुठल्यातरी फिक्शनने अवमानित होण्याइतक्या तकलादू असतील तर हिंदू धर्मात नेमकं काय शिकवलं आहे ह्याची उजळणी करून त्या आणखिन स्ट्रॉन्ग करणं गरजेचं आहे!

- (अधार्मिक) सोकाजी

सोकाजीराव अगदी पटल.
चि वि जोशींचे "ओसाडवाडीचे देव" वाचा,
किंवा " कृष्ण देवा आम्हाला पण एक चान्स द्या ना." हे माहित आहे का?
किंवा शंकर पाटीलांची "रामजल्माची best स्टोरी" वाचा.

हिंदी चित्रपटात हिंदुंविषयी मुद्दाम दुटप्पीपणा दाखवला गेला
यातल्या ‘मुद्दाम’ या शब्दाशी असहमत. बाकी उरलेले विचार व त्या अनुषंगाने आलेल्या प्रतिक्रिया पटल्या नाहीत.

तुमची मुले चित्रपट पाहुन धर्म समजुन घेत असतील तर तुम्ही मुलांना तुमच्या धर्माचे ज्ञान देण्यात कमी पडताहात. इतर धर्मिय लोक त्यांच्या मुलांना लहानपासुन धर्मज्ञान देतात, तशा सोयी आहेत. एखाद्या हिंदु संस्थेने तसा उपक्रम सुरु केला तर किती लोक आपल्या मुलांना पाठवतील? शेवटी ही मुलेच उद्याचा समाज आहेत. बाकी पिटातल्या प्रेक्षकांची व त्यांच्या धर्मविषयक जाणिवाण्ची काळजी करायची गरज नाही, ते अशिक्षित असतील, अडाणी नाहीयेत. Happy

हिंदुबहुल समाजात त्यांची जीवनशैली, ते बॅकग्राऊंडला ठेऊन काढलेले सिनेमे यांची भरमार हिंदीत झाली आहे. जसे मराठी प्रांतातल्या मुंबईत हिंदी चित्रपट बनले तरी ते बनवणारे पंजाबी असल्यामुळे चित्रपटात पंजाबी वातावरण दिसत राहिले तसेच हे आहे हेमावैम. इतर भाषिक चित्रपटातही प्रामुख्याने हिंदु वातावरण असते. गलीबॉय, डार्लिंग सारखे जिथे सगळी पात्रे मुस्लिम पण विषय त्या धर्माशी निगडीत नाही असा मराठी चित्रपट मला आत्तातरी आठवत नाहीय, मराठी भाषिक मुस्लिम्स अजिबातच नाहीयेत का?

हिंदु माणसाला देवाची भिती नसते, गॉडफिअरिंग ह्या अर्थाने. देव त्याच्या स्वतःचा असतो. आई बाप भाऊ बहिण मित्र ही सगळी नाती तो देवात बघतो, त्याच्यावर प्रेम करतो, रुसतो, भांडतो, त्याला नाते तोडायची धमकी देतो, संकटनिवारण होईपर्यण्त त्याला पाण्यात बुडवुन वेठीला धरण्यात त्याला काहीच चुकीचे वाटत नाही कारण देवाशी त्याचे तितके हक्काचे संबंध आहेत, गणपतीला गणु, गणोबा अशा हाका मारणे त्याला चुक वाटत नाही, तितका लडिवाळपणा तो देवाशी करतो. त्याचे सगळे अपराध देव आईच्या मायेने पोटात घालणार याची त्याला खात्री आहे..

दिवार मधले वर उल्लेखलेले दृष्य लोकांना खुप आवडले कारण त्यांच्या मनात देवासोबत जे नाते आहे तेच पडद्यावर हिरोचे देवासोबत त्यांना दिसले, त्यांना त्याच्याशी रिलेट होता आले.

इतर धर्माचे, विशेषतः मुस्लिम समाजाचे त्यांच्या अल्लाशी असे संबंध असणे शक्य आहे काय? अल्लाचे ते गुलाम आहेत, तो सर्वशक्तिमान मालक. मालकाशी नोकर कसे वागणार? तिथे आई लेकरु हे नातेच नाही.

मुस्लिम पार्श्वभुमी असलेले कितीशे चित्रपट गेल्या शंभर वर्षात निघालेत याचाही विचार व्हायला हवा. जुन्या काळाचा विचार केला तर फारतर १००-२०० चित्रपट मुस्लिम पार्श्वभुमीवरचे मिळतील, तेही चित्रपटाचा विषय मुस्लिम म्हणुन. नाहीतर नेहमीच्या एक कुटुंब व त्यांचा संघर्ष यातले कुटुंब हिंदुच असते किंबहुना कथेची गरज नसेल तर धर्माचा ठळक उल्लेख नसतो. जब जब फुल खिले मधल्या हिरोचा धर्म कोणता याचा उल्लेख चित्रपटात येत नाही पण काश्मिरच्या हाऊसबोटींचे बहुतांशी चालक मुस्लिम असायचे, आजही तेच आहेत. मोगॅम्बोचा धर्म कोणता हा विचार चित्रपट पाहताना डोक्यात येत नाही. बरसात की रातमध्ये सगळी पात्रे मुस्लिम आहेत कारण चित्रपटाची कथेत कव्वालीगायक व शेरोशायरी मुख्य आहे आणि यात मुस्लिम कलाकार जास्त होते. तिथे मुद्दाम मुस्लिम दाखवले हा बिचार कोणी करत नाही. इतरही चित्रपट जिथे मुख्य पात्रांना शेरोशायरी वगैरेत रमताना/त्या व्यवसायात दाखवले तिथे चित्रपट मुस्लिम होतो.

जिथे बहुतांश चित्रपटातली नावे, रितीरिवाज हिंदु आहेत तिथे व्हिलनही हिंदुच असणार ना?? पडद्यावर चालबाज पंडित बघुन कोणी त्याच्या गल्लीतल्या पंडिताचा गळा धरला किंवा धर्मत्याग केला अशी घटना अपवाद म्हणुनही कधी ऐकिवात आली नाही. पडद्यावर जे धर्माच्या अनुषंगाने दिसते ते लोक खुप
गांभिर्याने घेतात असे होत असते तर जाग उठा इन्सान चित्रपटानंतर लोकांचा जातीविषयक दृष्टिकोन बदलला असता. त्या चित्रपटात ब्राम्हण कोण व शुद्र कोण या विषयावर उत्तम चर्चा आहे. पण असे कुठे घडले ??

आज बाहेरची परिस्थिती बदललेली आहे. आज तथाकथित पुरोगाम्यांना चित्रपटात पाकिस्तानचा खरा चेहरा दाखवला की त्रास होतो कारण ते प्रत्येक गोष्टीचा संबंध मोदीशी लावतात ज्या नावाची त्यांना अ‍ॅलर्जी आहे. ज्या कथेत भारत पाकिस्तान गळ्यात गळे घालुन फिरतात तो चित्रपट हे बघत नाहीत. जिथे पाकिस्तान भारतातला दहशतवाद पुरस्कृत करतो असे दाखवले जाते तिथे त्यांना भयंकर त्रास होतो. नोटबंदीचा पाकिस्तानातल्या धंदेवाईकावर परिणाम झाला याचाही यांना त्रास. जणु फेक नोटा भारतीय रिझर्व बँकच छापतेय Happy यांचा मोदीद्वेष इतका टोकाचा आहे की यांचा पुर्ण दिवस मोदी काय करतोय हे बघण्यातच जातो, नाहीतर टिका कशी करणार??

हिरो एका वेळी पन्नास माणसांना मारतो हे यांना चालते पण काश्मिरात एका रात्रीत धर्माचे नाव घेऊन लोकांना पळवुन लावले गेले हे दाखवले की पोटशुळ.. अरे तुम्ही कशाला पोटशुळ उसळवुन घेता? नावातच मोदी असलेला चित्रपट लोकांनी नाकारला, अ‍ॅक्सिडेंटल पिएम लोकांनी नाकारला. का? तर चित्रपट म्हणुन ते सुमार होते. लोकांना चांगले वाईट समजण्याची अक्कल आहे यावर तुमचा विश्वास नाही आणि तुमच्यावर लोकांचा विश्वास नाही.

आज फक्त ३५ टक्के भारत सोमिवर आहे असे ए आय सांगते. म्हणजेच सगळे पुरोगामी आणि अंधभक्त मिळुन फक्त ३५ टक्केच आहेत (जे पुरोगाम्यांच्या कळपात नाहीत ते सगळे अंधभक्त ही व्याख्याही पुरोगाम्यांचीच). बाकीचा ६५% भारत या दोघांना कवडीचीही किम्मत न देता त्याला जे वाटतेय ते करतोय. तो पठाणचीही तिकिटे काढतोय आणि धुरंधरचीही. त्याला तिन तास करमणुक हवीय, कसलेही डोस नकोयेत.

साधनाजी
क्या बात है!
हिंदी सिनेमातील बगुतेक व्हिलन हिंदू होते, असणारच, काहीच चूक नाही,
Shejari | Chandrakant Mandare, Sumitra Devi, Keshavrao Date, Gajanan | Marathi Full Movie (1941)
https://www.youtube.com/watch?v=HTm_NUmiOok
लेखक विश्राम बेडेकर.
सलीम जावेद तेव्हा चड्डीत असणार.

या लेखाशी संबंधित वाटली म्हणून ही एक फेबु पोस्ट इथे पेस्टत आहे -

एक काळ होता जेव्हा पॉर्न पाहणाऱ्यांसाठी खूप अवघड होते. तुम्हाला व्हीसीपी किंवा व्हीसीआर घ्यावा लागायचा, आणि तुमचे आवडते बॉलीवूड चित्रपट चालू असताना, तुम्हाला हळू आवाजात म्हणावे लागायचे, "मला एक सिंगल डिस्क द्या." दुकानदाराला समजायचे, आणि मग तो भारतीय आणि विदेशी चित्रपट मागून ठरवून घ्यायचा...
स्थानिक प्रेक्षकांपैकी मोठ्या संख्येने लोक मल्याळम पार्श्वभूमीचे होते. असे म्हटले जायचे की हे चित्रपट केरळमध्ये चित्रित केले जात होते आणि त्यातील अभिनेते आणि अभिनेत्री स्थानिक होते.
तज्ज्ञांच्या मते, असे चित्रपट अजूनही तयार होत आहेत आणि देशातील सर्वाधिक साक्षर राज्य असलेले केरळ यात आघाडीवर आहे...
काळ बदलला आहे. मोबाईल फोन सगळीकडे आहेत आणि पॉर्नही सगळीकडे आहे... आणि सेमी-पॉर्नसाठी तर इन्स्टाग्राम आहेच, जिथे लहान-मोठी असंख्य 'लव्ह शॉप्स' उघडली आहेत.
बरं, तो एक वेगळा विषय आहे... आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं सांगणार आहे. सध्या एका चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. तो चित्रपट नाही, तर एक वेब सिरीज आहे.
चित्रपटाचं नाव आहे: लोला कॉटेज. या चित्रपटाचं वर्गीकरण पॉर्नोग्राफिक म्हणून केलं जातं. यात मुख्य भूमिका नीला नंबियारने साकारली आहे आणि दिग्दर्शन मोहम्मद इस्लाम यांनी केलं आहे.
चित्रपटाची अभिनेत्री, नीला नंबियार, ही मोहम्मद इस्लाम यांची भाची आहे.
आता तुम्ही विचाराल, हे काय आहे? नीला नंबियार हिंदू आहे आणि मोहम्मद इस्लाम मुस्लिम... मग हे दोन काका-पुतण्या कसे काय?
थांबा, थांबा, साहेब...
जन्माने मुस्लिम असलेल्या नीला नंबियार (मूळ नाव आसिया खातून) यांनी एका मुलाखतीत कबूल केले की, त्यांचे काम (मल्याळम पॉर्न इंडस्ट्रीमधील) इस्लाममध्ये मान्य नसल्यामुळे त्यांनी आपले नाव बदलले. त्यामुळे, कोणत्याही विरोधाशिवाय आपले काम सुरू ठेवण्यासाठी त्यांनी आपले नाव बदलून हिंदू नाव ठेवले. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये त्या कपाळावर भरपूर कुंकू लावलेल्या दिसत आहेत.
केरळमधील पॉर्नोग्राफिक चित्रपट उद्योग पूर्णपणे जिहादी चालवतात आणि मुस्लिमांमध्ये हिंदू नावे स्वीकारण्याचा कल वाढत आहे. याचा उद्देश काय?
स्वतःचे रक्षण करत असताना, हिंदू महिलांना वेश्या म्हणून चित्रित करणे आणि समाजाची प्रतिष्ठा डागाळणे.
ही केवळ फसवणूक नाही; हिंदू महिला आणि समाजाची बदनामी करण्याचा हा एक संघटित प्रयत्न आहे.
सर्वात खेदजनक गोष्ट म्हणजे हिंदूंचे मौन..

स्रोत:
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=pfbid02s83YR9mRHDnEGmE...

>>> हिंदी सिनेमातील बगुतेक व्हिलन हिंदू होते, असणारच, काहीच चूक नाही,

तत्वतः काहीही चूक नाही. पण ठरवून, सिलेक्टिव्हली - सिनेमाच्या कथा-प्रवाहात एका प्रसंगात हिंदूंच्या श्रद्धा पायदळी तुडविणे व त्यानंतर लगेच दुसऱ्या प्रसंगात इस्लाम म्हणजे खूपच पवित्र आहे असे दाखविणे व असा पॅटर्न असंख्य वेळा राबविणे यात काहीच चूक नाही?

ही केवळ फसवणूक नाही; हिंदू महिला आणि समाजाची बदनामी करण्याचा हा एक संघटित प्रयत्न आहे.
सर्वात खेदजनक गोष्ट म्हणजे हिंदूंचे मौन..>>>>

हिंदुनी काय करायला हवे? आणि हिंदुंनी आजवर कुठल्या प्रश्नावर आक्रोश केलाय ते यावर करतील?

नीला नम्बियार या धंद्यात नक्कीच स्वमर्जीने आली नसणार. स्वमर्जी असती तर दुसरा कुठलातरी उद्योग केला असता. सनी लिओनीने संधी मिळताच हा धंदा सोडलाच ना? तीही स्वतःचे नाव बदलुनच धंद्यात उतरली. नीला नम्बियारलाही भिती वाटली म्हणुन तिने नाव बदलले आणि सेफ नाव घेतले.

हिंदु धर्म व त्या धर्माची पताका खांद्यावर घेतलेले लोक या धंद्यात असलेल्या हिंदु स्त्रियांसाठी काय करत आहेत याची माहिती द्याल का? हिंदुबहुल समाजात या धंद्यातही बहुसंख्य हिंदुच असणार
आणि ग्राहकही हिंदुच असावेत. आता प्रत्येक गोष्टीचा संदर्भ धर्माशीच जोडायचा झाला तर भारतात हिंदुच अजुनतरी पुढे असतील. भविष्यात काय होइल देव जाणे.

या धंद्यात असणार्‍या स्त्रियांसाठी कार्यरत असलेल्यांमध्ये एक नाव समीर गायकवाड यांचे आहे, त्यांनी कुठलीही धर्मपताका खांद्यावर घेतलेली अजुन तरी दिसलेली नाही आणि कुठल्याही विशिष्ट धर्माच्या स्त्रियांसाठीच ते झटताहेत असे अद्याप दिसले नाही.

तत्वतः काहीही चूक नाही. पण ठरवून, सिलेक्टिव्हली - सिनेमाच्या कथा-प्रवाहात एका प्रसंगात हिंदूंच्या श्रद्धा पायदळी तुडविणे व त्यानंतर लगेच दुसऱ्या प्रसंगात इस्लाम म्हणजे खूपच पवित्र आहे असे दाखविणे व असा पॅटर्न असंख्य वेळा राबविणे यात काहीच चूक नाही?>>>>

हिंदुंच्या श्रद्धा पायदळी तुडवल्या असे जे म्हणताहात आणि त्यासाठी उदाहरणे देताहात ती मला अयोग्य वाटताहेत. जे दाखवले गेले ते लोक रोज बाहेरही पाहतच होते त्यामुळे लोकांना त्यात वावगे वाटले नाही. चित्रपट बनवणार्‍यांना लोकभावना कळत होती व त्यांनी ती कॅश केली असे म्हणता येईल फारतर.

नोटबंदीचा पाकिस्तानातल्या धंदेवाईकावर परिणाम झाला हे एकवेळ खरे मानले तरी घराला आग लागल्यावर ढेकूणही मरतात या कॅटॅगरीतले आहे.

देशभक्तीपर सिनेमात अनेक प्रसंग अतिशयोक्त असतातच, सन्नी थेट पाकिस्तानात जाऊन हँडपंप उखाडतो, बॉर्डर सारख्या अनेक सिनेमात पाकिस्तान विरुद्ध भारतीय सैन्याने गाजवलेले अचाट शौर्य दाखवले जाते, अशा प्रसंगावर कुणी आक्षेप घेत नाही, पण नोटाबंदी सारख्या निर्णयाचे समर्थन ( एकाच पक्षाची तळी उचलण्यासाठी) असले प्रसंग दाखवले तर किल्ली उडणारच.

छान धागा. मी यावर अभ्यास केला आणि माझ्या निदर्शनास आलं की जो तरुण वर्ग आहे त्याला हा पिक्चर खूप आवडला पण मो मध्यम, म्हातारा वर्ग आहे त्याला हा पिक्चर प्रपोगंडा वाटतोय याचं कारण म्हणजे हा लेख. या वयाची माणसं लहानपणापासून असे हिंदू विरोधी पिक्चर बघत आलेत त्यामुळे त्यांचा ब्रेन वॉश झाला आहे. आदित्य धर आता हा ब्रेन वॉश धुवून काढत आहे त्यामुळे वर्षानुवर्षे या मंडळींच्या डोक्यात जे समीकरण बसलं आहे त्याला तडा जाऊन त्यांना दुःख होत आहे. आदित्य धारने पिक्चर काढला पण आता आपल्यावर मोठी जबाबदारी आले. या सगळ्या ब्रेन वॉश झालेल्या मंडळींना समजून घेऊन आपल्याला अखंड भारत घडवायचा आहे. जय हिंद जय महाराष्ट्र

प्रतिसाद खूप मोठा होणार आहे.
आधीच्या धाग्यावर लिहायचं होतं कारण लेखकाने अटी घातल्या आहेत. पण तो धागा अ‍ॅडमिनने कोणतंही कारण न देता उडवलेला आहे. हा धागा ठेवलेला आहे. हाच दुटप्पीपणा ठळक आहे, त्यामुळे हा प्रतिसाद राहील का ही शंकाच आहे. जर उडवला तर धन्यवाद म्हणजे कन्फर्म होऊन जाईल.

एकच सदस्य निरनिराळ्या धाग्यांवर मुस्लीम विरोधी गरळ ओकतो, त्या विरोधात फक्त सार्कजम (उसना) दर्शवणारा प्रतिसाद येतो. पण तेच जर एखाद्या जातीचे नाव न लिहीताही तर्काने उत्तर दिले कि ते नाहीसे होते आणि तो सदस्यही गारद होतो, याबद्दल कुणालाही ना खेद ना खंत. अशा ठिकाणी मत मांडण्यात काय हंशील? एक उसन्या उपहासाची कमेण्ट केली कि आपण पुरोगामी खेम्यात जातो हा शोध कधी लागला आहे याची काही कल्पना नाही. यालाच बॅलन्स साधणे म्हणत असावेत. याचीही कल्पना नाही. असो. हा निषेध ( किंव किरकिर) इथेच समाप्त. पुढच्या पोस्टमधे विषयावर येतो.

>> सनी लिओनीने संधी मिळताच हा धंदा सोडलाच ना?

ह्या धाग्यावर अवांतर आहे!
पण 'संधी मिळताच हा धंदा सोडला' नाही तर 'वाढत्या वयामुळे संधी नसल्यामुळे' धंदा सोडावा लागला.

- (प्रॅक्टीकल) सोकाजी

सनीच्या "धंद्याची मायबोलीवर चर्चा"
हल्ली मायबोलीवर असे प्रकार वाढत्या प्रमाणात दिसत आहेत.
थोडीतरी शरम,

ठिक आहे. पण हा धंदा छान आहे असे तिला वाटले असते तर तिने तिच्या मुलांना यात उतरवले असते की. इतर सर्व व्यावसायिकांची मुले कुटुंबाचे व्यवसाय पुढे चालवतात. तिचे व मुलांचे नशीब की तिच्या मुलाना ती चांगले आयुष्य देऊ शकली. अन्यथा या धंद्यातल्या स्त्रिया व त्यान्ची मुले यांचे काय होते हे समीर गायकवाडांच्या लेखात वाचलेय सगळ्यांनीच. Sad

तो नीला नंबियारवाला लेख मीही फेबुवर वाचलेला. वाचुन वाईट वाटले. यासाठी की हिंदुनी तिचा निषेध करावा अशी अपेक्षा त्यात मला दिसली. त्याने काय होणार्?खरेच कोणालाकाही वाटत असेल तर एकुण एक हिंदु स्त्रीला त्या दलदलीतुन बाहेर काढा आणि मग म्हणा की बाई आम्हा हिंदुंची एकही स्त्री यात नाही त्यामुळे तु आमचे नाव धारण करु नकोस. हे कधी होइल का?? Sad Sad असो.

आपल्याला अखंड भारत घडवायचा आहे. >> Redevelopment केल्यावर मोठा फ्लॅट मिळत असेल तर आनंदच होतो. पण त्या फ्लॅट मध्ये दुप्पट लोकं (तेही नको असलेले) राहायला येणार असल्यावर redevelopment चालेल का?

Pages