गूढपट आहे असं शीर्षकातच म्हटलंय. सायकॉलॉजिकल हॉरर असा शब्द वापरला आहे. राही बर्वेचा हॉररचा वेगळा जॉनरा दिसतो त्याच्या प्रत्येक सिनेमात. गूढ + भय + मानवी भावना , षडरिपू. आपल्याला सवयीच्या असलेल्या हॉररपटात असंही काही नावीन्य उरलेलं नाही.
एकमेव प्रॉब्लम तो म्हणजे मेक्सिको साठी हॉलिवूड वापरत असेलेला पिवळा टोन आणि टिपिकल दृश्यात्मक इंडियन बायसेस जे असतात त्यातून AI अजिबात बाहेर पडत नाही. कारण आपली दृश्यात्मक सेन्सिबिलिटी आणि AI च्या डेट्यात असलेली पाश्चात्यांच्या दृष्टीने झालेली भारतीय दृश्यात्मक सेन्सिबिलिटी यांच्यात खूपच मोठा फरक आहे.
शिवाय कधी कधी AI एवढे स्टीरिओटिपिकल इमेजेस काढतो की त्याला म्हणावे लागते बास भाऊ आता. जरा कलंड बाजूला.
MANN-PISHACH | Full Film | Zero-Budget AI Horror Experiment (2026) | Rahi Anil Barve
विडीओ खाली असे लिहिले आहे.
AI Horror ह्या शब्द प्रयोगामुळे गैरसनज होऊन मी बघायला घेतला. But it literally turned out to be "Horror".
अँकी नं.१
फिल्ममध्ये स्टोरी चे क्रेडीट नारायण धारप ह्याना दिले आहे.
जाई गुलमोहरनी बहुतेक स्कीनप्ले लिहिला असावा, चेक करायला पाहिजे.
हो जाई गुलमोहरनी स्कीनप्ले लिहिला आहे,
मस्तच लिहिलंय राभु, एकदम मुद्देसूद आणि स्ट्रेटफॉरवर्ड!
पाहून बघेन. अजून तरी जे बंडल AI पाहिले आहे ते बरेचदा प्रमाणबद्ध वाटलं नाही. म्हणजे माणूस नॉर्मल आणि हात , पाय त्या स्त्री मधल्या सरकट्याच्या मापाचे! पर्सनली मला AI चा वापर केलेला आवडत नाही, क्रिएटिव्हीटीचा शॉर्ट कट वाटतो. खऱ्याखुऱ्या माणसांची, वातावरणाची बरोबरी त्याला येत नाही. अनुभव म्हणून ते तितके पोचत नाही. हे इंटरेस्टिंग वाटतेय, बघून पाहेन.
दृश्यात्मक सेन्सिबिलिटी आणि AI च्या डेट्यात असलेली पाश्चात्यांच्या दृष्टीने झालेली भारतीय दृश्यात्मक सेन्सिबिलिटी यांच्यात खूपच मोठा फरक आहे.
>>> म्हणजे आपला डेटा पुरेसा नाही AI कडे? त्यामुळे ते जैविकवैविध्य, वातावरण, सूर्यास्त - सूर्योदय, घरं - गावं - लोक - कपडेपट, आवाज, उच्चार असे सेन्सरी अनुभव त्याच्याशी मिळतेजुळते नाहीत असे का ? यासाठी आपणच डेटा उभा करावा लागणार मग, जे या मातीतले नाहीत त्यांचं interpretation बेगडीच वाटणार.
पण ह्या film मध्ये दोन खरी खरी माणसे आहेत. AI चा फार खुबीदार वापर केला आहे.
मला खटकलेल्या गोष्टी
१ कथेचा काल १९६० च्या दशकातला आहे. जे काही शेवटी विचार मंथन आहे ते किमान १०० वर्षे जुने आहे.
२ म्हातारा दोनही हात वापरून जेवतो असे आहे,
3 त्या म्हातार्यासाराखा माणूस पुरातत्व खात्यात काम करतो हे काही पटत नाही,
4 तो नेमका त्या विधवेच्या घरीच कसा टपकतो?
तुम्ही पहा आणि मी चूक करत असेन तर कान उपटा.
रानभुली मी आज सिनेमा बघितला. अत्यंत जबरदस्त कॉम्प्लेक्स आणि गूढ आहे. हा सिनेमा स्टोरी नाही, एक अनुभव आहे. अनेक प्रश्नांची लड मनावर सोडून आपल्याला विचार करायला भाग पाडतो.
मी राही बर्वे ची फॅन आहे, तुंबाड हा माझ्या सर्वात आवडत्या चित्रपटयांपैकी एक आहे. त्यामुळे आज लगेच बघून घेतला.
सिनेमा डिकोड करावा लागतो. आणि त्यात फार मजा आहे. शोले सारखं या सिनेमातलं प्रत्येक पात्र ही अत्यंत महत्वाचं आणि symbolic आहे.
आणि सिनेमा पाहिल्यावर तुझी पोस्ट पुन्हा एकदा मन लावून वाचली, मी सिनेमा बघताना जो जो विचार केला तो तो तू मांडला आहेस, शिवाय ai चे विशेष विश्लेषण, uncanny valley चा संदर्भ ही सगळं तू उत्तम कव्हर केलं आहेस.
>> म्हणजे आपला डेटा पुरेसा नाही AI कडे? त्यामुळे ते जैविकवैविध्य, वातावरण, सूर्यास्त - सूर्योदय, घरं - गावं - लोक - कपडेपट, आवाज, उच्चार असे सेन्सरी अनुभव त्याच्याशी मिळतेजुळते नाहीत असे का ? यासाठी आपणच डेटा उभा करावा लागणार मग, जे या मातीतले नाहीत त्यांचं interpretation बेगडीच वाटणार. <<
आहे पण तो चित्रपटाला वापरला जाईल इतका प्रगल्भ नसावा.
आता एवढ्या इमेजेस आहेत पण कधीतरी chatgptla इमेज करायला सांगा. कसला तरी एक स्मज झालेला रवी वर्मा च्या पिवळ्या पडलेल्या पेंटिंग सारखा, आणि मुघलांच्या कामगारांच्या स्केचेस मधे असतील तसे पोत तो वापरतो भारतीय काँटेक्स्टची भनक जरी लागली तरी.
टेक्निकली मूवी इज वेरी गुड.
मला तुंबाड आणि हा का आवडला नाही त्याची कारणे मी इथे लिहिणार नाही .कारण मग सगळे माझ्यावर तुटून पडतील.

नाही मला असे काही वाटले नाही, स्वतः पहा आणि मग ठरवा,
अहो ताई तुम्ही कोकणी ना. आपला तर बहुतांशी दररोज पाला पडतोय. मन पिशाच मध्ये खरी भूत थोडीच आहेत? एक शीळा भाकरीचा तुकडा आणि लोणचे ओवाळून टाका. खाऊन तृप्त होऊन निघून जातील,
बघितला. बर्वे डेंजर आहेत. काय करतात कळत नाही. डीप आणि डार्क सबकॉन्शस मध्ये घुसत घुसत जातात. सॉफ्ट स्टाईल वगैरे काही नाही, हल्लाच डायरेक्ट.
एक आर्कियोलॉजिचा सर्वेयर. मनाच्या प्रदेशाचं उत्खनन करणारा. स्वप्न आणि जाग यांच्या सीमारेषेवर चाललेला हा सावल्यांचा खेळ.
जगण्याच्या क्रियेमध्ये मनुष्य काही वासना दाबून टाकत राहतो. काही अनकम्फर्टेबल मानवी प्रेरणा ॲबंडन करत असतो. वर ते जस्टीफाय पण करत असतो. ह्या भावनांना कळत नाही की आपल्या जन्मदात्यानं/ जन्मदात्रीनंच आपल्याला असं बेवारस कुत्र्याच्या मौतीनं मरायला का सोडून दिलं आहे.? आपलं अस्तित्व, आपला बर्थराईट का नाकारला जातो आहे? आपली चूक काय आहे?
त्या लक्ष दिलं जाण्याची वाट बघत राहतात दीर्घकाळ. आणि संधी मिळताच विद्रोह करतात. स्वतःच शरीर-अस्थि-मांस-मज्जा धारण करतात. त्यातून मग जे व्होल्कॅनिक इरप्शन होतं, त्यासमोर कुठलाच मुखवटा टिकत नाही. असं सगळं. त्यासाठी एआयचं तंत्र चांगलंच हाती लागलंय बर्व्यांच्या.
बाकी, कार्ल गुस्ताव जुंगचं एक यानिमित्तानं आठवलं. 'What you resist, persists.'
हे सगळे ठीक आहे. पण हे निराळ्या प्रकारे पण हाताळता आले असते. पिक्चर शेवटी शेवटी खूप लाउड अक्राल विक्राळ झाला आहे. उगाचच हॉरर वळण देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
Shirley Jackson ची Lottery किंवा Stephen King ची Autopsy Room Four ह्या अंगाचा थरकाप उडवणाऱ्या कथा वाचा , सायकॉलॉजीकल हॉरर साठी Psyco वा गिल्टी कॉन्शस पाहिजे असेल तर आमीर खान चा तलाश पहा, सिक्स्थ सेन्स पहा.
ह्यांच्या तुलनेत "मन पिशाच " कुठे बसतो? "मन पिशाच " मध्ये जी हाताळणी आहे ती समहाउ अगदी एलेमेंटरी आहे असे मला वाटले.
जाता जाता एक कथा वाचल्यावर/ सिनेमा बघितल्यावर वाचकाच्या/ प्रेक्षकाच्या मनात काय भाव यायला पाहिजेत?
हा सिनेमा संपल्यावर सदाशिव किंवा ती विधवा ह्यांच्याबाद्दक कणव किंवा सहानुभूती किंवा अरेरे अरेरे असे नको होते व्हायला असे काही भाव आले का? त्या भावना हॉररच्या झंझावातात उडून गेल्या आहेत.
अँकी नं.१, केशवकूल- बरोबर आहे तुमचे. नारायण धारप यांची कथा आहे आणि जाई गुलमोहर यांनी स्क्रीनप्ले (संहिता) लिहिली आहे. मूळ कथेमध्ये बरेच डिटेल्स नव्हते ते स्क्रीनप्ले मध्ये घातले आहेत. आणि हो, रॉय... जाई गुलमोहर हे राहीचे टोपण नाव नाही. जाई स्वतःचे अस्तित्व आणि स्वतःचा दृष्टीकोन असलेली हाडामासाची व्यक्ती आहे. मी जाई गुलमोहर आहे आणि मी या चित्रपटाचा स्क्रीनप्ले लिहिला आहे. चित्रपटाची पूर्ण समीक्षा लिहिताना त्या चित्रपटात योगदान दिलेल्या सर्व लोकांची नावे दिलीत तर चित्रपटाचा आदर होईल. (मग तो चित्रपट आवडो अथवा नावडो)
हाय ईजाबेल (जाई)
आत्ता निघताना मायबोली पाहिले आणि हा मेसेज दिसला. सिनेमा जिने लिहीला आहे त्या स्क्रीनप्ले रायटरला इथे भेटून आनंद झाला.
मला सांगायला आवडेल कि मी चित्रपट समीक्षक नाही. आम्ही समविचारी, समान आवड असलेले लोक इथे एकमेकांना आवडलेल्या, न आवडलेल्या चित्रपटाची ओळख करून देतो. तो आवडला किंवा नाही हे पाहून कळवतात. ही आवड आहे. ओळख थोडक्यात असते , पण जास्त मजकूर असेल तर वेगळा धगा काढण्याची रीत आहे. चित्रपट समीक्षा हा माझा व्यवसाय नाही. त्यामुळे अनादर करायचा हेतू नाही इथे.
हा ए आय सिनेमा आहे हे समजले होते. याचे प्रमोशन वगैरे बद्दल माहिती नाही. मी टिव्ही बघत नाही. फेसबुकवर खूप कमी सक्रीय आहे. ए आय सिनेमा आणि नावे अनोळखी त्यातून थोडी वेगळी असल्याने राही बर्वेंनी हा हा प्रयोग केला आहे आणि स्क्रीनप्ले साठी दिलेली नावे खरी आहेत का ही शंका मला सुद्धा होती. त्यामुळे सिनेमा पुन्हा एकदा पहावा लागेल असे म्हटले आहे.
मला कल्पना आहे कि पुढे येऊ पाहणाऱ्या प्रतिभाशाली कलाकारांचा अनुल्लेख अन्यायकारक आहे. पण असा कोणताही हेतू नाही इथे. हे गप्पांचं सर्कल आहे. प्रोमेशनल मुळीच नाही. उलट या प्रतिसादामुळे आज किती तरी वर्षांनी फेसबुकवर लॉगिन केल. तुम्हाला मेसेज केला आहे. प्लीज त्याला उत्तर द्या.
खरं सांगायचं तर तुम्ही स्वतः इथे अवतरला हा माझा सन्मान समजायला हवा. त्यासाठी मनःपूर्वक आभार.
तुमचे उत्तर मिळाले कि मी नावे add करीनच. दीपक दामले आणि बाकी क्रू मेंबर्स पण खरे आहेत हे समजले. यातले कुणी ओळखीचे नसल्याने उल्लेख केला नव्हता. माझ्या मुळे मनःस्ताप झाला असेल तर मनापासून क्षमस्व!
चित्रपटाची ओळख इथे करून दिल्याबद्दल धन्यवाद, रानभुली.
काल रात्री चित्रपट पाहिला. एक प्रयोग म्हणून खरंच खूप वेगळा व चांगला वाटला. या प्रकारचा म्हणजे पूर्णतः AI निर्मित ( की पूर्णतः AI चित्रित?) हा माझ्या माहितीतला पहिलाच चित्रपट आहे.
काही ठिकाणी दृश्य 90 अंशात फिरवलेले दिसते त्याचे प्रयोजन कळले नाही. बाकी दृश्यात्मकता नैसर्गिक वाटत नाही तरीही चांगली वाटते.
हॉरर संबंधी धागा किंवा मायबोलीवर झालेली असल्यास कल्पना नाही. मी आधी इथे विचारणा केली होती, नंतर संपादीत केलं. माबो सर्च दिल्यावर असा धागा सापडला नाही. या धाग्यावर लिहायचं नव्हतं आणि नवा धागा पण नको वाटला. कशाला हॉरर म्हणायचं असा प्रश्न उपस्थित झाल्याने ही चर्चा व्हावी किंवा जुनी असेल तर कळवावी ही इच्छा. तिकडे लिहीणे सर्वात जास्त संयुक्तिक ठरेल.
रानभुली: तुमचा ब्लॉग वाचून आनंद झाला. कंमेंट मध्ये कुणीतरी जाई गुलमोहर हे राहीचे टोपण नावच असेल वगैरे बोलले म्हणून हे लिहावेसे वाटले. तसेच टीमचा उल्लेख केला कारण या फिल्म संबधी असा गैरसमज होऊ शकतो कि यातले कलाकार, लेखक हे सगळेच ए आय ने निर्माण केलेले आहेत, ते तसे नाही आहे. लेखक आणि ऍक्टर्स हि माणसे आहेत हे अदोरेखित करायला ती कंमेंट लिहिली.
तू केलेलं विश्लेषण अगदी रोचक
तू केलेलं विश्लेषण अगदी रोचक आहे. मी ही गेले काही दिवस या सिनेमाची जाहिरात बघत होते फेसबुकवर.
आज बघेन.
छान सांगितलंस राभू
छान सांगितलंस राभू
बघते हा सिनेमा
Intersting वाटतोय
छान लिहिलंय रानभुली. विषय,
छान लिहिलंय रानभुली. विषय, मांडणी, निर्मिती हे सर्वच वेगळं, नवीन काहीतरी असं दिसतंय. सिनेमा नक्की पाहून इथे लिहीन.
उत्साहाने बघायला घेतला. पण
हॉरार मूवी आहे असे समजून उत्साहाने बघायला घेतला. पण झेपला नाही.
गूढपट आहे असं शीर्षकातच
गूढपट आहे असं शीर्षकातच म्हटलंय. सायकॉलॉजिकल हॉरर असा शब्द वापरला आहे. राही बर्वेचा हॉररचा वेगळा जॉनरा दिसतो त्याच्या प्रत्येक सिनेमात. गूढ + भय + मानवी भावना , षडरिपू. आपल्याला सवयीच्या असलेल्या हॉररपटात असंही काही नावीन्य उरलेलं नाही.
एकमेव प्रॉब्लम तो म्हणजे
एकमेव प्रॉब्लम तो म्हणजे मेक्सिको साठी हॉलिवूड वापरत असेलेला पिवळा टोन आणि टिपिकल दृश्यात्मक इंडियन बायसेस जे असतात त्यातून AI अजिबात बाहेर पडत नाही. कारण आपली दृश्यात्मक सेन्सिबिलिटी आणि AI च्या डेट्यात असलेली पाश्चात्यांच्या दृष्टीने झालेली भारतीय दृश्यात्मक सेन्सिबिलिटी यांच्यात खूपच मोठा फरक आहे.
शिवाय कधी कधी AI एवढे स्टीरिओटिपिकल इमेजेस काढतो की त्याला म्हणावे लागते बास भाऊ आता. जरा कलंड बाजूला.
MANN-PISHACH | Full Film |
MANN-PISHACH | Full Film | Zero-Budget AI Horror Experiment (2026) | Rahi Anil Barve
विडीओ खाली असे लिहिले आहे.
AI Horror ह्या शब्द प्रयोगामुळे गैरसनज होऊन मी बघायला घेतला. But it literally turned out to be "Horror".
चित्रपट जाई गुलमोहोर नी
चित्रपट जाई गुलमोहोर नी लिहिलय
धारपांच्या स्टाईल मधे असेल पण क्रेडिट ड्यू आहे...
अँकी नं.१
अँकी नं.१
फिल्ममध्ये स्टोरी चे क्रेडीट नारायण धारप ह्याना दिले आहे.
जाई गुलमोहरनी बहुतेक स्कीनप्ले लिहिला असावा, चेक करायला पाहिजे.
हो जाई गुलमोहरनी स्कीनप्ले लिहिला आहे,
छान लिहिलयं! तुंबाड बघितला
छान लिहिलयं! तुंबाड बघितला नाही, हा कदाचित घाबरत घाबरत बघेन.
जाई गुलमोहर हे राही अनिल
जाई गुलमोहर हे राही अनिल बर्वेचेच टोपण नाव उर्फ डू आयडी वाटत आहे. लोल.
मस्तच लिहिलंय राभु, एकदम
मस्तच लिहिलंय राभु, एकदम मुद्देसूद आणि स्ट्रेटफॉरवर्ड!
पाहून बघेन. अजून तरी जे बंडल AI पाहिले आहे ते बरेचदा प्रमाणबद्ध वाटलं नाही. म्हणजे माणूस नॉर्मल आणि हात , पाय त्या स्त्री मधल्या सरकट्याच्या मापाचे! पर्सनली मला AI चा वापर केलेला आवडत नाही, क्रिएटिव्हीटीचा शॉर्ट कट वाटतो. खऱ्याखुऱ्या माणसांची, वातावरणाची बरोबरी त्याला येत नाही. अनुभव म्हणून ते तितके पोचत नाही. हे इंटरेस्टिंग वाटतेय, बघून पाहेन.
दृश्यात्मक सेन्सिबिलिटी आणि
दृश्यात्मक सेन्सिबिलिटी आणि AI च्या डेट्यात असलेली पाश्चात्यांच्या दृष्टीने झालेली भारतीय दृश्यात्मक सेन्सिबिलिटी यांच्यात खूपच मोठा फरक आहे.
>>> म्हणजे आपला डेटा पुरेसा नाही AI कडे? त्यामुळे ते जैविकवैविध्य, वातावरण, सूर्यास्त - सूर्योदय, घरं - गावं - लोक - कपडेपट, आवाज, उच्चार असे सेन्सरी अनुभव त्याच्याशी मिळतेजुळते नाहीत असे का ? यासाठी आपणच डेटा उभा करावा लागणार मग, जे या मातीतले नाहीत त्यांचं interpretation बेगडीच वाटणार.
मला हे वाक्य कळालेय का ?
पण हता film मध्ये दोन खरी खरी
पण ह्या film मध्ये दोन खरी खरी माणसे आहेत. AI चा फार खुबीदार वापर केला आहे.
मला खटकलेल्या गोष्टी
१ कथेचा काल १९६० च्या दशकातला आहे. जे काही शेवटी विचार मंथन आहे ते किमान १०० वर्षे जुने आहे.
२ म्हातारा दोनही हात वापरून जेवतो असे आहे,
3 त्या म्हातार्यासाराखा माणूस पुरातत्व खात्यात काम करतो हे काही पटत नाही,
4 तो नेमका त्या विधवेच्या घरीच कसा टपकतो?
तुम्ही पहा आणि मी चूक करत असेन तर कान उपटा.
विधवेचे आणि त्याचे सेटिंग
.
रानभुली मी आज सिनेमा बघितला.
रानभुली मी आज सिनेमा बघितला. अत्यंत जबरदस्त कॉम्प्लेक्स आणि गूढ आहे. हा सिनेमा स्टोरी नाही, एक अनुभव आहे. अनेक प्रश्नांची लड मनावर सोडून आपल्याला विचार करायला भाग पाडतो.
मी राही बर्वे ची फॅन आहे, तुंबाड हा माझ्या सर्वात आवडत्या चित्रपटयांपैकी एक आहे. त्यामुळे आज लगेच बघून घेतला.
सिनेमा डिकोड करावा लागतो. आणि त्यात फार मजा आहे. शोले सारखं या सिनेमातलं प्रत्येक पात्र ही अत्यंत महत्वाचं आणि symbolic आहे.
आणि सिनेमा पाहिल्यावर तुझी
आणि सिनेमा पाहिल्यावर तुझी पोस्ट पुन्हा एकदा मन लावून वाचली, मी सिनेमा बघताना जो जो विचार केला तो तो तू मांडला आहेस, शिवाय ai चे विशेष विश्लेषण, uncanny valley चा संदर्भ ही सगळं तू उत्तम कव्हर केलं आहेस.
>> म्हणजे आपला डेटा पुरेसा
>> म्हणजे आपला डेटा पुरेसा नाही AI कडे? त्यामुळे ते जैविकवैविध्य, वातावरण, सूर्यास्त - सूर्योदय, घरं - गावं - लोक - कपडेपट, आवाज, उच्चार असे सेन्सरी अनुभव त्याच्याशी मिळतेजुळते नाहीत असे का ? यासाठी आपणच डेटा उभा करावा लागणार मग, जे या मातीतले नाहीत त्यांचं interpretation बेगडीच वाटणार. <<
आहे पण तो चित्रपटाला वापरला जाईल इतका प्रगल्भ नसावा.
आता एवढ्या इमेजेस आहेत पण कधीतरी chatgptla इमेज करायला सांगा. कसला तरी एक स्मज झालेला रवी वर्मा च्या पिवळ्या पडलेल्या पेंटिंग सारखा, आणि मुघलांच्या कामगारांच्या स्केचेस मधे असतील तसे पोत तो वापरतो भारतीय काँटेक्स्टची भनक जरी लागली तरी.
कळाले.
टेक्निकली मूवी इज वेरी गुड
टेक्निकली मूवी इज वेरी गुड.
मला तुंबाड आणि हा का आवडला नाही त्याची कारणे मी इथे लिहिणार नाही .कारण मग सगळे माझ्यावर तुटून पडतील.
>> म्हणजे आपला डेटा पुरेसा नाही AI कडे? त्यामुळे ते जैविकवैविध्य, वातावरण, सूर्यास्त - सूर्योदय, घरं - गावं - लोक - कपडेपट, आवाज, उच्चार असे सेन्सरी अनुभव त्याच्याशी मिळतेजुळते नाहीत असे का ? यासाठी आपणच डेटा उभा करावा लागणार मग, जे या मातीतले नाहीत त्यांचं interpretation बेगडीच वाटणार. <<
नाही मला असे काही वाटले नाही, स्वतः पहा आणि मग ठरवा,
मस्त लिहिलेस गं रानभुली.
मस्त लिहिलेस गं रानभुली.
मला पाहावासा वाट्टोय पण रात्री झोपल्यावर काळोखात भुते दिसायला लागतात त्याण्ची भिती वाटते.
अहो ताई तुम्ही कोकणी ना.
अहो ताई तुम्ही कोकणी ना. आपला तर बहुतांशी दररोज पाला पडतोय. मन पिशाच मध्ये खरी भूत थोडीच आहेत? एक शीळा भाकरीचा तुकडा आणि लोणचे ओवाळून टाका. खाऊन तृप्त होऊन निघून जातील,
बघितला. बर्वे डेंजर आहेत.
बघितला. बर्वे डेंजर आहेत. काय करतात कळत नाही. डीप आणि डार्क सबकॉन्शस मध्ये घुसत घुसत जातात. सॉफ्ट स्टाईल वगैरे काही नाही, हल्लाच डायरेक्ट.
एक आर्कियोलॉजिचा सर्वेयर. मनाच्या प्रदेशाचं उत्खनन करणारा. स्वप्न आणि जाग यांच्या सीमारेषेवर चाललेला हा सावल्यांचा खेळ.
जगण्याच्या क्रियेमध्ये मनुष्य काही वासना दाबून टाकत राहतो. काही अनकम्फर्टेबल मानवी प्रेरणा ॲबंडन करत असतो. वर ते जस्टीफाय पण करत असतो. ह्या भावनांना कळत नाही की आपल्या जन्मदात्यानं/ जन्मदात्रीनंच आपल्याला असं बेवारस कुत्र्याच्या मौतीनं मरायला का सोडून दिलं आहे.? आपलं अस्तित्व, आपला बर्थराईट का नाकारला जातो आहे? आपली चूक काय आहे?
त्या लक्ष दिलं जाण्याची वाट बघत राहतात दीर्घकाळ. आणि संधी मिळताच विद्रोह करतात. स्वतःच शरीर-अस्थि-मांस-मज्जा धारण करतात. त्यातून मग जे व्होल्कॅनिक इरप्शन होतं, त्यासमोर कुठलाच मुखवटा टिकत नाही. असं सगळं. त्यासाठी एआयचं तंत्र चांगलंच हाती लागलंय बर्व्यांच्या.
बाकी, कार्ल गुस्ताव जुंगचं एक यानिमित्तानं आठवलं. 'What you resist, persists.'
हे सगळे ठीक आहे. पण हे
हे सगळे ठीक आहे. पण हे निराळ्या प्रकारे पण हाताळता आले असते. पिक्चर शेवटी शेवटी खूप लाउड अक्राल विक्राळ झाला आहे. उगाचच हॉरर वळण देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
Shirley Jackson ची Lottery किंवा Stephen King ची Autopsy Room Four ह्या अंगाचा थरकाप उडवणाऱ्या कथा वाचा , सायकॉलॉजीकल हॉरर साठी Psyco वा गिल्टी कॉन्शस पाहिजे असेल तर आमीर खान चा तलाश पहा, सिक्स्थ सेन्स पहा.
ह्यांच्या तुलनेत "मन पिशाच " कुठे बसतो? "मन पिशाच " मध्ये जी हाताळणी आहे ती समहाउ अगदी एलेमेंटरी आहे असे मला वाटले.
जाता जाता एक कथा वाचल्यावर/ सिनेमा बघितल्यावर वाचकाच्या/ प्रेक्षकाच्या मनात काय भाव यायला पाहिजेत?
हा सिनेमा संपल्यावर सदाशिव किंवा ती विधवा ह्यांच्याबाद्दक कणव किंवा सहानुभूती किंवा अरेरे अरेरे असे नको होते व्हायला असे काही भाव आले का? त्या भावना हॉररच्या झंझावातात उडून गेल्या आहेत.
हॉरर म्हणजे काय?
हॉरर म्हणजे काय?
अँकी नं.१, केशवकूल- बरोबर
अँकी नं.१, केशवकूल- बरोबर आहे तुमचे. नारायण धारप यांची कथा आहे आणि जाई गुलमोहर यांनी स्क्रीनप्ले (संहिता) लिहिली आहे. मूळ कथेमध्ये बरेच डिटेल्स नव्हते ते स्क्रीनप्ले मध्ये घातले आहेत. आणि हो, रॉय... जाई गुलमोहर हे राहीचे टोपण नाव नाही. जाई स्वतःचे अस्तित्व आणि स्वतःचा दृष्टीकोन असलेली हाडामासाची व्यक्ती आहे. मी जाई गुलमोहर आहे आणि मी या चित्रपटाचा स्क्रीनप्ले लिहिला आहे. चित्रपटाची पूर्ण समीक्षा लिहिताना त्या चित्रपटात योगदान दिलेल्या सर्व लोकांची नावे दिलीत तर चित्रपटाचा आदर होईल. (मग तो चित्रपट आवडो अथवा नावडो)
हाय ईजाबेल (जाई)
हाय ईजाबेल (जाई)
आत्ता निघताना मायबोली पाहिले आणि हा मेसेज दिसला. सिनेमा जिने लिहीला आहे त्या स्क्रीनप्ले रायटरला इथे भेटून आनंद झाला.
मला सांगायला आवडेल कि मी चित्रपट समीक्षक नाही. आम्ही समविचारी, समान आवड असलेले लोक इथे एकमेकांना आवडलेल्या, न आवडलेल्या चित्रपटाची ओळख करून देतो. तो आवडला किंवा नाही हे पाहून कळवतात. ही आवड आहे. ओळख थोडक्यात असते , पण जास्त मजकूर असेल तर वेगळा धगा काढण्याची रीत आहे. चित्रपट समीक्षा हा माझा व्यवसाय नाही. त्यामुळे अनादर करायचा हेतू नाही इथे.
हा ए आय सिनेमा आहे हे समजले होते. याचे प्रमोशन वगैरे बद्दल माहिती नाही. मी टिव्ही बघत नाही. फेसबुकवर खूप कमी सक्रीय आहे. ए आय सिनेमा आणि नावे अनोळखी त्यातून थोडी वेगळी असल्याने राही बर्वेंनी हा हा प्रयोग केला आहे आणि स्क्रीनप्ले साठी दिलेली नावे खरी आहेत का ही शंका मला सुद्धा होती. त्यामुळे सिनेमा पुन्हा एकदा पहावा लागेल असे म्हटले आहे.
मला कल्पना आहे कि पुढे येऊ पाहणाऱ्या प्रतिभाशाली कलाकारांचा अनुल्लेख अन्यायकारक आहे. पण असा कोणताही हेतू नाही इथे. हे गप्पांचं सर्कल आहे. प्रोमेशनल मुळीच नाही. उलट या प्रतिसादामुळे आज किती तरी वर्षांनी फेसबुकवर लॉगिन केल. तुम्हाला मेसेज केला आहे. प्लीज त्याला उत्तर द्या.
खरं सांगायचं तर तुम्ही स्वतः इथे अवतरला हा माझा सन्मान समजायला हवा. त्यासाठी मनःपूर्वक आभार.
तुमचे उत्तर मिळाले कि मी नावे add करीनच. दीपक दामले आणि बाकी क्रू मेंबर्स पण खरे आहेत हे समजले. यातले कुणी ओळखीचे नसल्याने उल्लेख केला नव्हता. माझ्या मुळे मनःस्ताप झाला असेल तर मनापासून क्षमस्व!
चित्रपटाची ओळख इथे करून
चित्रपटाची ओळख इथे करून दिल्याबद्दल धन्यवाद, रानभुली.
काल रात्री चित्रपट पाहिला. एक प्रयोग म्हणून खरंच खूप वेगळा व चांगला वाटला. या प्रकारचा म्हणजे पूर्णतः AI निर्मित ( की पूर्णतः AI चित्रित?) हा माझ्या माहितीतला पहिलाच चित्रपट आहे.
काही ठिकाणी दृश्य 90 अंशात फिरवलेले दिसते त्याचे प्रयोजन कळले नाही. बाकी दृश्यात्मकता नैसर्गिक वाटत नाही तरीही चांगली वाटते.
हॉरर संबंधी धागा किंवा
हॉरर संबंधी धागा किंवा मायबोलीवर झालेली असल्यास कल्पना नाही. मी आधी इथे विचारणा केली होती, नंतर संपादीत केलं. माबो सर्च दिल्यावर असा धागा सापडला नाही. या धाग्यावर लिहायचं नव्हतं आणि नवा धागा पण नको वाटला. कशाला हॉरर म्हणायचं असा प्रश्न उपस्थित झाल्याने ही चर्चा व्हावी किंवा जुनी असेल तर कळवावी ही इच्छा. तिकडे लिहीणे सर्वात जास्त संयुक्तिक ठरेल.
रानभुली: तुमचा ब्लॉग वाचून

Pages