
"नको करायला यावर्षी काही.मस्त मस्त पाककृती आल्यात, बुकमार्क करून ठेवाव्या,करून पहाव्या."
"वेडी आहेस का?यावेळी किमान सोपे पेपर आलेत.पुढच्या वर्षी उकडीचे मोदक, सुरळी वड्या किंवा पुरणमांडे वगैरे आले तर?संधी दारावर परत परत नॉक करत नसते.मायगेट च्या नोटिफिकेशन सारखं तिचं नोटिफिकेशन ती एकदाच देते."
तर मनाचा संवाद संपवून नेहमीप्रमाणे सुट्टीच्या दिवशी दिवसभर लोळून संध्याकाळी तहान लागल्यावर विहीर खणायला घेतली.डोक्यात आईस्क्रीम स्कुप सारखा भात वगैरे कल्पना होत्या पण गिफ्ट सेट मधले बाउल आपण 2 फोडले, 2 ला कडेला पोचे पडले आणि 2 वर पालीचा स्प्रे मारल्याने ते टाकले असं आठवलं आणि मग हातासरशी एका नव्या प्लॅटर ची खरेदी झाली.सजावट कच्चा माल खरेदीला किराणा वाल्याकडे गेल्यावर:
"नाचणी पापड तो कल ही खतम हो गया भाभीसा.त्योहार का दिन है ना."
"ठीक है बटाटा साबुदाणा पापड दो."
"वो अभि नवरात्र मे नया स्टॉक आयेगा.चाहीये तो कल मंगाके देता है, फोन नंबर लिखाके जाव."
"नही ठीक है, कोई बात नाही भैसा, उडद पापड होगा तो वो दे दो और वर्हाडी ठेचा." (आपणही त्या निमित्ताने सभ्यपणे दुकानदाराला भैसा म्हणून मनात 'अरे म्हश्या सगळं कसं संपलेलं असतं तुझ्याकडे अडीच गाळा दुकान असून?तो सेवा ड्रायफ्रुट वाला बघ मोठ्या गल्लीतला.त्याच्याकडे अगदी आगावे सिरप ची बिस्किटं पण मिळतात.' म्हणून व्हेंटून घ्यावं.)
आता मुख्य कृती
1. घरी येऊन बीट पावडर मध्ये 3 पापड भिजवून वाळत घालून इन्स्पेक्टर झेंडे बघायला जावं.
2. आल्यावर कुकर लावून त्या पापडाचे तुकडे कापायला घेऊन सुबक चटई विणावी. आणि मायक्रोव्हेव मध्ये 1.2 मिनिट ठेवावी.
3. छान दिसतेय म्हणून खुश होऊन चटई उचलायला जावी तर ती प्लेट ला चिकटलेली.मग सुरीने सिरीयल किलर सारखे त्याचे तुकडे करून डिश बाजूला ठेवून द्यावी.आणि कपाटातून दुसरी डिश काढावी.
4. आता रंगवायची एनर्जी संपल्याने पांढरी चटई फूड पेपरला तेल लावून प्लेट मध्ये ठेवून 1.2 मिनिट ठेवून द्यावी आणि कुकर बघायला घ्यावा.
5. वरण घट्ट शिजवून बाजूला ठेवावे.
6. श्वास रोखून घाबरत भात वाटीत थापायला घ्यावा.भात हा प्रकार कधीही सैल कधीही घट्ट बनू शकतो.तो कमीत कमी चमचा वापरून थापून थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवावा.
7. आता पापडाचा द्रोण करायला घ्यावा. हा द्रोण सुटतो. पण हे बग फिचर म्हणून वापरून थेंबाचा आकार बनवावा.
8. अर्धाच उरलेला उकडलेला बटाटा सत्कारणी लावून बटाटा, दही,जिरा पावडर, चाट मसाला, मीठ असे रायते बनवावे.
9. कढल्यात मोहरी हिंग फोडणी करून त्यात टोमॅटो परतावे.त्यात भरपूर klm(म्हणजे कांदा लसूण मसाला) टाकून थोडे तापवावे.
10. आता त्या मोला महागाच्या प्लॅटर मध्ये(आयकिया वर 4 दिवस आधी काळी प्लेट मागवून स्वस्त पडली असती पण अजिबात म्हणजे अजिबात विचारच करायचा नाही.आली लहर केला कहर.) भातरुपी वाटी, त्यात घट्ट वरण, वर टोमॅटो klm फोडणी घालावी.द्रोणात बटाटा रायते घालावे.लेसन लर्नट असलेली पांढरी चटई अंथरुन तिचे आयुष्य पावन करावे.
11. आपल्याकडे चांगली पांढरी बॅकग्राऊंड नाही याचा साक्षात्कार होऊन एक बेबी ब्लॅंकेट त्या प्लॅटर खाली वापरावे.वेळेला केळे.
12. भरपूर फोटो काढावे.
13. आता स्टेप क्र.3 मध्ये कापड चिकटून बाजूला ठेवलेली प्लेट घेऊन त्यात वरणभात कालवावा आणि सर्व डेकोरेशन साहित्य चुरून मिक्स करावे.
14. खाणं झाल्याशिवाय लेख अजिबात लिहू नये.
यानंतर 'आता शिरा स्पर्धा करूया का' असे साहसी विचार मनात येतील ते दाबावे.आपले शिरा स्किल शिरा करताना खीर होणे, जास्त परतले जाणे, मोकळा न होणे या लेव्हल चे माशाल्लाह आहेत याची विनम्र जाणीव ठेवून शांत झोपायला जावे.
मोरया!!!
आणि मी_अनु मायबोलीवर परतली
आणि मी_अनु मायबोलीवर परतली आहे with bang.........
पदार्थ मला थोडा कळला थोडा
पदार्थ मला थोडा कळला थोडा नाही.. पण लिखाणाचे फुल मार्क्स
आणि वेलक्कम बॅक!
छान दिसतंय. अनु, किती
छान दिसतंय. अनु, किती दिवसांनी दिसलीस.
पाकृ माझा प्रांत नाही. पण
पाकृ माझा प्रांत नाही. पण चिवड्यातले फक्त शेंगदाणे वेचून खावे तसे मधले मधले 'पंचेस' वाचून मजा आली
भैसा
एक नंबर अनु! वेलकम बॅक
एक नंबर अनु! वेलकम बॅक
Bang on! Me Anu is back!
Bang on! Me Anu is back!
छान दिसते आहे प्रकरण (;))
अनु परतली (कढईत नाही) बघूनच
अनु परतली (कढईत नाही) बघूनच इतका आनंद झाला हे सांगते फक्त बाकी पाकृविषयी, लिखाणाविषयी दुसऱ्या भागात (प्रतिसादात)
दोन दोन कंस दिलेत
अरे व्वा, मस्त लिहिले आहे.
अरे व्वा, मस्त लिहिले आहे. पापडाची चटई पण आवडली.
आता परतली आहेस आणि पुन्हा रोमात जाणार नाहीस असे गृहित धरून लिहिलेय.
वेलकम बॅक!
अनु, किती छान वाटले तुला
अनु, किती छान वाटले तुला पाहून !
अनु, छानच.
अनु, छानच.
गो बाय, कुठे होतीस इतके दिवस
गो बाय, कुठे होतीस इतके दिवस ??
प्रतिसाद दिला, आता पा कृ वाचते...
सकाळची सुरुवात ख्या ख्या खी खी ने होणार नक्की..
अनु इज बॅक! नेहमीच्या
अनु इज बॅक! नेहमीच्या स्टाईलमधलं लिखाण अर्थातच आवडलं!
वाह, मस्तच अनू
वाह, मस्तच अनू
वेलकम बॅक!
वेलकम बॅक!
नेहमीच्या स्टाईलमधलं लिखाण अर्थातच आवडलं>>>+१
वेलकम बॅक अनु.
वेलकम बॅक अनु.
लिखाण फर्मास अर्थातच आणि वरणभात, ती पापडाची चटई सगळ मस्त दिसतय.
अरे वा अनु is back!! मस्त
अरे वा अनु is back!! मस्त लिहिले आहे आणि फोटो पण भारी आलाय
फायनली माबो उपास वरणभाताने
फायनली माबो उपास वरणभाताने सोडवला म्हणायचा.
सजावट छान
पंचेस भारी
भैसा
Btw

इन्स्पेक्टर झेंडे न बघता ही रेसिपी करता येईल का?
आमच्याकडे नेटफ्लिक्स नाही ना.
फायनली माबो उपास वरणभाताने
फायनली माबो उपास वरणभाताने सोडवला म्हणायचा.
सजावट छान >> 'अनु'मोदन बरं. 'अनु'मुळे 'मोद' न.
भारी दिसतेय प्रकरण
भारी दिसतेय प्रकरण
माशाल्लाह..!!
माशाल्लाह..!!
वेलकम बॅक अनु.
वेलकम बॅक अनु.
अनु वेलकम. अगदी जोरदार बॅटिंग
अनु वेलकम. अगदी जोरदार बॅटिंग, सिक्सर वर सिक्सर मारत पुनरागमन, क्या बात, छान वाटलं तुला बघून.
आहाहा कसली कल्पकता, सहीच सजावट.
व्वा, अनु is back !! मस्त
व्वा, अनु is back !! मस्त वाटले वाचून...
मस्त लिहिले आहे .सजावट छान.
मस्त लिहिले आहे .सजावट छान.
वेलकम बॅक अनु !
वेलकम बॅक अनु !
आता कसं घर भरल्यासारखं वाटतंय.
मस्त आहे डिश. लेखाइतकीच चविष्ट असणार !
Mi - Anu, वरण्भाताला चमचमीत
Mi - Anu, वरण्भाताला चमचमीत लेखाचं seasoning जाम भारी !
भाताच्या मूदीऐवजी त्याची वाटी बनवायची कल्पना खूप आवडली. तसेच पापडाची चटई पण मस्त!
एकदम झकास!
एकदम झकास!
Mi - Anu, वरण्भाताला चमचमीत
Mi - Anu, वरण्भाताला चमचमीत लेखाचं seasoning जाम भारी !>> +१
ती चटई करायला शिकव मला
Mi - Anu, वरण्भाताला चमचमीत
Mi - Anu, वरण्भाताला चमचमीत लेखाचं seasoning जाम भारी !
भाताच्या मूदीऐवजी त्याची वाटी बनवायची कल्पना खूप आवडली. तसेच पापडाची चटई पण मस्त!++१
इन्स्पेक्टर झेंडे छान आहे.
इन्स्पेक्टर झेंडे छान आहे.
Pages