शशक २ - सरप्राइज - मॅगी

Submitted by मॅगी on 30 August, 2025 - 07:03

गेले सात महिने तिच्या कानात फक्त किंचाळून रडण्याचे आवाज घुमत होते.

अंगात चुरगाळलेला जुनाट गाऊन, ना धड जेवणखाण, जेवायला बसताच आलेली हाक, घामाने चिकट झालेल्या, वेड्यावाकड्या वाढलेल्या केसांच्या बटा, महिनो- महिने न कोरलेल्या भुवया, चेहऱ्याची मुरुमानी लागलेली वाट, वाढलेले वजन, सगळीकडून दुखणारे शरीर, शून्य सोशल लाइफ आणि स्वतःचा येत असलेला भयंकर वैताग.

तिने आंघोळ उरकून दार उघडले. खोली शांत होती. ती घाबरून प्लेपेनपाशी गेली. तिथे एक लाल गुलाब आणि त्याखाली स्पा कूपन! सहा तास स्पा आणि पार्लर सर्व्हिसेस!! तिच्या चेहऱ्यावर मोठ्ठं हसू फुललं.

' मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील, thanks darling!' टायपून तिने गिरकी घेतली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आवडली Happy

पण इतकी हालत होऊ नये याची काळजी सुद्धा घेता आलीच असती असेही वाटले.

पण इतकी हालत होऊ नये याची काळजी सुद्धा घेता आलीच असती असेही वाटले.>>
ते कधी कधी मुलावरती/ आईच्या तब्येतीवरती ही अवलंबून असते.
जनारलाईझ नाही करता येत.

एक्झॅक्टली, बाळाच्या किंवा आईच्या तब्येतीच्या काही तक्रारी असू शकतात. नवरा एकटाच कमावता असेल तर त्याला ऑफिसला जाणे भाग आहे बाळ आणि आईबाबा एवढेच घरात असतील तर अशी परिस्थिती होते. भले कामाला मदतनीस ठेवल्या तरी बाळाचे feeding वगैरे आईलाच करावे लागते.

>>>>बाळाचे feeding वगैरे आईलाच करावे लागते.
अ फुल टाईम जॉब. पहीले काही महीने तर, दिवस-रात्र, दर अर्ध्या/पाऊण तासाने. आणि मग बाळ झोपते. आता झोपावे म्हटले तर बाळाचं चिटुकल पोट, त्यामुळे लगेच शू होते आणि बाळ जागे होते. बाळ उठुन रडून परत झोपेपर्यंत, तो पाऊण तास निघून गेलेला असतो. अव्याहत चक्र.

चांगला विषय हाताळतात. वेगळी आणि चांगली कथा आहे. खूप गोड!

एकदा बाळ झाले की center of attention फक्त बाळ असते. आई जरा मागे रहाते. तिचे तिच्याकडे दुर्लक्ष होते. Pregnant असताना सर आँखो पर असणारी बाई बाळाच्या आगमनानंतर इतरांच्या दृष्टीनेही मागे जाते. हे बऱ्याच घरी होते. पण spa Ani पार्लर service la गेल्यानंतर आईने ते enjoy करणे आणि relax होणे गरजेचे आहे. बाळ जवळ नाही म्हणून पहिलटकरणीला anxiety यायची शक्यता असू शकते काही बायकांच्या बाबतीत!!! Happy
हे जरा अवांतर झाले. पण या निमित्ताने जे सुचले ते लिहीत गेले.