
१५ मे १९९९
सेकंड शिफ्ट संपत आली.
अकराचे टोल पडले. ११.०५ मिनिटांनी नवीन शिफ्ट कार्डस पंच करेल.
त्या आधी मशीन बंद आणि स्वच्छ करून कालजय सप्तर्षी गडबडीत निघाले.
मुलं झोपली असतील. त्यांच्या मनात विचार आला.
गेले कित्येक दिवस ते सेकंड आणि थर्ड शिफ्ट करत होते. थर्ड शिफ्टला लोक टाळाटाळ करतात.
पूर्वी डबल शिफ्टचे पैसे मिळायचे आणि रात्रीच्या शिफ्टचे अडीच पट.
पण आता कंपनीने लबाडी सुरू केली. रात्रीच्या शिफ्टमधे सप्तर्षींना टाकलं.
आणि सेकंड शिफ्टचा ओव्हरटाईम देऊ लागले. त्यामुळं नुकसान होऊ लागलं पण सांगता कुणाला ?
हे बरेच महीने झाल्यावर त्यांनी हिय्या काढून कंपनीच्या मालकाकडे तक्रार केली.
त्यांनी लक्ष घालून सप्तर्षींना सेकंड शिफ्ट आणि फर्स्ट शिफ्ट दिली.
आज खूप दिवसांनी ते सेकंड शिफ्ट करून घरी येणार होते.
रात्री मुलं झोपलेली असतील, तरीही सकाळी तर भेटतील !
शाळेत जायच्या आधी आज उठायला हवं. जरा लवकर घरी जावं म्हणजे झोप होईल.
सप्तर्षींच्या मनात असे विचार चालू होते.
कंपनी विस्तीर्ण होती.
प्रॉडक्शन युनिट जिथे होतं तिथल्या गेटबाहेर पडलं कि कंपनीचंच आणखी एक आवार होतं. इथे पूर्वी कसलासा कारखाना होता.
तो बंद पडल्यावार या कंपनीने ती जागा विकत घेऊन तिथे गोडाऊन बनवलं होतं.
एक फॅब्रिकेशन शॉप पण होतं पण ते बरेच दिवस बंद होतं.
सप्तर्षी आजवर सेकंड करून कधीच रात्री बाहेर पडले नव्हते. थेट सकाळीच.
त्यामुळं त्यांच्या कानावर काही न काही येऊनही त्यांना कशाशी घेणं देणं नव्हतं.
हे आवार संपल्यावर पार्किंग होतं.
तिथे सप्तर्षींची मोपेड होती.
आता फॅब्रिकेशन शॉपपासून जाताना त्यांना ते ऐकलेलं सगळं आठवलं.
इथे या शेड मधे एक केबीन होती.
तिथे म्हणे कामगारांना रात्री भूत दिसलं होतं.
आणि ते दिसायचं. रोज नाही. पण ठराविक काळानंतर दिसायचं.
केबीन मधे ते भूत काही तरी करायचं. मग लाईट्स बंद व्हायच्या.मग शांतता.
त्यामुळंच तिथे फॅब्रीकेशनची कामे करायला कुणी तयार होत नसे.
शेवटी ते आताच्या शेड मधे आणावं लागलं.
एक जुनी क्रेन अद्याप तिथे होती. ती पण हलवायला सुरूवात केली होती.
पण तिला एका जागेवरून दुसरीकडे नेण्यासाठी सोय होत नसल्याने ते काम पेंडींग होतं.
आता सप्तर्षींना ते सगळं आठवलं.
निघताना उशीर झाल्याने सेकंडचे सगळे लोक आधीच निघून गेले होते.
मेन गेटमधून ते दोनशे फूट पुढे आले. पुढे अंधार होता.
त्या अंधाराच्या ग्रे शेडमधून फॅब्रीकेशन शॉपचं स्ट्रक्चर हलक्या काळ्या कॅनव्हास वर डार्क काळ्या रंगाचं पेंटींग करावं तसं दिसत होतं.
मागचा उजेड आता संपला. पुढे अजून पाचशे मीटर आणि मग पार्किंग सुरू होत होतं.
सप्तर्षींना पहिल्यांदाच भय वाटू लागलं.
ते झपाझप पावलं टाकत चालू लागले.
शेड डाव्या बाजूला आ वासून उभी होती.
तिकडे न पाहता ते क्रेनजवळून चालू लागले. आणि त्यांना आठवलं...
क्रेन हलवण्याच्या प्रयत्नात तिचे नट बोल्टस सुटे केले होते. नेहमी जाणारे येणारे कामगार क्रेनला वळसा घालून चालायचे.
सप्तर्षींची ही पहिलीच वेळ.
धडाम मोठा आवाज झाला . त्या आवाजासरशी सप्तर्षींनी आत केबीन कडे धूम ठोकली.
ते केबीन मधे गेले.
दिवे लावले आणि बाहेर काय झालं याचा अदमास घेऊ लागले.
इतक्यात गलका ऐकू आला.
बाहेर कुणी तरी ओरडलं.
"अरे सप्तर्षी गेले"
सप्तर्षींच्या कानावर हे वाक्य आलं आणि ते मोठ्याने ओरडले.
"मूर्खांनो मी इथे आहे"
पण कुणीच त्यांचं ऐकत नव्हतं,
त्यांनी दार उघडलं आणि नाटकाचा पडदा पडून सेट बदलावा तसं झालं.
सप्तर्षींनी घरातून बाहेर पडताना ठरवलं कि आज काहीही झालं तरी मालकांची भेट घ्यायचीच.
त्यानुसारच त्यांनी मालकांची भेट घेतली.
,
,
,
त्यांनी लक्ष घालून सप्तर्षींना सेकंड शिफ्ट आणि फर्स्ट शिफ्ट दिली.
आज खूप दिवसांनी ते सेकंड शिफ्ट करून घरी येणार होते.
रात्री मुलं झोपलेली असतील, तरीही सकाळी तर भेटतील !
शाळेत जायच्या आधी आज उठायला हवं. जरा लवकर घरी जावं म्हणजे झोप होईल.
सप्तर्षींच्या मनात असे विचार चालमालकांनी,
,
,
,
शेड डाव्या बाजूला आ वासून उभी होती.
तिकडे न पाहता ते क्रेनजवळून चालू लागले. आणि त्यांना आठवलं...
क्रेन हलवण्याच्या प्रयत्नात तिचे नट बोल्टस सुटे केले होते. नेहमी जाणारे येणारे कामगार क्रेनला वळसा घालून चालायचे.
सप्तर्षींची ही पहिलीच वेळ.
धडाम मोठा आवाज झाला . त्या आवाजासरशी सप्तर्षींनी आत केबीन कडे धूम ठोकली.
ते केबीन मधे गेले.
,
,
,
सप्तर्षी बाहेर पडत असतानाच त्यांना आठवलं
तिथे म्हणे कामगारांना रात्री भूत दिसलं होतं.
आणि ते दिसायचं. रोज नाही. पण ठराविक काळानंतर दिसायच
१५ मे २०२५
सप्तर्षींच्या घरी सालाबाद प्रमाणे त्यांची पुण्यतिथी आयोजित केली होती.
सप्तर्षी ओरडून सांगत होते.
काळाचा पीळ सोडवण्यासाठी त्यांना एकदाच त्या क्रेनजवळून न जाता वळसा घालायचा होता.
आणि केबीनमधून बाहेर न पडता आपलं मृत शरीर पाहण्याची चूक टाळायची होती.
म्हणजे पीळ सुटेल आणि सगळं व्यवस्थित होईल.
त्यांच्या जागेवर त्यांचा मुलगा कंपनीत कामाला लागलेला होता.
त्याने आज निवृत्ती घेतली होती.
सप्तर्षी त्याला सांगू पाहत होते.....
पण ते आता नावाप्रमाणेच कालजयी झाले होते.
कालजयी सप्तर्षी !
म्हणजे मुलगा निवृत्त झाला तरी
म्हणजे मुलगा निवृत्त झाला तरी ती क्रेन त्या शेड मध्यच होती.
कथा अर्धी झाल्यावर अंदाज आला होता कथेचे वळण काय असेल याचा. छान आहे गूढकथा.
छान गूढकथा!
छान गूढकथा!
लूप मध्ये अडकले बिचारे
लूप मध्ये अडकले बिचारे
पण काहीतरी मार्ग असेल ना?
नरेन, आबा झकासराव. तुमचे
नरेन, आबा झकासराव. तुमचे मनापासून आभार.
हा तसा घिसापिटा फॉर्मॅट आहे.
पण बरेच दिवस काही न लिहील्याने आणि अचानक छोटीशी कथा सुचल्याने एकटाकी कथा लिहून काढली.
त्रुटी राहिल्या असतील कदाचित.