
सकाळची वेळ. Mr. वर्मा, ऑफिसला निघण्याच्या तयारीत होते. का कोण जाणे, ते जरासे गंभीर दिसत होते.तोच त्यांच्या फोनची रिंग वाजते.
पलिकडून घोगऱ्या, जरबेच्या आवाजात शब्द येतात -
"तुमची मुलगी सोनालीला, आम्ही किडनॅप केलंय. ती सुरक्षित हवी असेल, तर दोन दिवसांत ५ कोटी रुपये तयार ठेवा. आणि पोलिसांना काही कळलं, तर तुमची मुलगी कधीच घरी येणार नाही. लक्षात ठेवा!"
"अरे देवा!" Mrs. वर्मा भीतीने किंचाळल्या.
Mr. वर्मांनी आवाज स्थिर ठेवत विचारलं. "मी विश्वास कसा ठेवू, की ती तुमच्याच ताब्यात आहे?"
Kidnapper हसून म्हणाला -
"हं... हुशारीची गरज नाही. तिचा आवाज ऐकायला मिळणारच आहे."
दोन सेकंद पलिकडे शांतता होती. मग सोनालीचा घाबरलेला आवाज आला -
"पप्पा… पप्पा… मला वाचवा."
"सोना.." Mr. वर्मा हळूच पुटपुटले, मग काळजीच्या सुरात म्हणाले - "बेटा… घाबरू नकोस. मी तुला सोडवीन."
पलिकडून, पुन्हा त्या किडनॅपरचा आवाज आला
"आता पटली खात्री? मग बोला..
"ठिक आहे. मी.." वर्मा बोलू लागले ; पण त्यांचे शब्द तोडत kidnapper म्हणाला -
एक मिनिट… तुमचा ड्रायव्हर काहीतरी बोलायचय म्हणतो."
आता फोनवरून, वर्माच्या माणसाचा आवाज येतो.
"सर, मी आहे सोनाली सोबत. काही होऊ देत नाही. तुम्ही एक पैसाही देऊ नका!" इतक्यात पलिकडून चापट मारल्यासारखा आवाज आला. मग पुन्हा किडनॅपर दरडावून म्हणाला -
"याच्या हीरोगिरीवर विसंबून राहू नका. पैसे तयार ठेवा." आणि फोन कट झाला.
---
Mr. वर्मा आपल्या केबिनमध्ये बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी पुसली जाऊन, त्यावर व्यावसायिक मख्खपणा आलेला. त्यांनी P.A. ला काही सूचना देऊन बाहेर पाठवले. आणि टेलिफोनवर एक नंबर फिरवला.
"हॅलो.. बोला." पलिकडून तरूणीचा मधाळ आवाज आला.
"हॅलो… मला विराट जयकर यांच्याशी बोलायचं आहे." वर्मा म्हणाले.
"Just one second हं." पलिकडून उत्तर आलं. मग काही सेकंदाच्या शांतते नंतर, एक पुरूषी, खणखणीत आवाज आला -
"हॅलो.. जयकर बोलतोय."
Mr. वर्मा चटकन म्हणाले -
"जयकर, मी विजय वर्मा बोलतोय. माझ्या मुलीचं, अपहरण झालं आहे.." त्यांनी सारी हकीकत कथन केली.
"काळजी करू नका सर. मी लगेच कामाला लागतो. तुमची मुलगी सुरक्षितपणे घरी परत येईल." विराटने वर्मांना आश्वस्त केलं.
___
वर्मांची मुलगी सोनाली, आदल्या रात्री आपल्या मैत्रिणीच्या birthday party ला गेलेली. वर्मांनी आपल्या विश्वासू माणसाला तिच्या सोबत पाठवलं होतं. पण ते दोघेही सकाळी परत आले नव्हते. उलट त्यांचं अपहरण झाल्याचा कॉल आला होता.
___
विराट हा थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करणारा, कल्पक detective होता. त्याने या प्रकरणावर बारकाईने विचार करून, त्वरित हालचाली सुरू केल्या.
एकट्या सोनालीला kidnap केलं नव्हतं. तर त्यांची कार अन् वर्मांचा माणूसही kidnapper च्याच ताब्यात होता. चौकशी करावी असं फार कुणी नव्हतंच. वर्मांना कॉलवर त्यानं काही प्रश्नोत्तरे केली. आता एकच व्यक्ती शिल्लक होती.
आपला असिस्टंट अनिकेत सोबत, विराटने सोनालीच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन चौकशी केली. आणि काही अनपेक्षित गोष्टी त्याला समजल्या.
---
त्या birthday party ला गेलेल्या, सोनालीच्या इतर मैत्रिणींनाही विराटने कॉल्स केले. त्यांना प्रश्नोत्तरे केली.
एका ठिकाणी मात्र, तो स्वतः गेला. तिथे फक्त एक मध्यमवयीन स्त्री होत्या. विराटने त्यांच्याकडे थोडी विचारपूस केली.
---
अगदी अचानकपणे वर्मांची लाडकी मुलगी सोनाली, सुखरूप घरी आलेली. त्यांच्याकडे कामाला असलेल्या आशिषने, ज्याला सोनाली सोबत kidnap केलं होतं, तोच सोनालीला घेऊन आला होता.
"पप्पा…" सोनाली सांगू लागली "मी तर खूप घाबरले होते. पण आशिषने चालाकीने दोघांची सुटका केली. आणि मला सुखरूप घरी आणलं."
Mr. वर्मा सद्गदित स्वरात आशिषला म्हणाले -
"आशिष, खूप खूप थॅंक्यू."
"पप्पा, मला काही सांगायचं आहे." सोनाली, मध्येच म्हणाली "हा आशिष, माझ्याच कॉलेज मधला. मी त्याला नीट ओळखते. त्याचा स्वभाव, त्याचं व्यक्तित्व खूप चांगलं आहे, आता तर त्याने मला एका मोठ्या धोक्यातून वाचवलं. प्रत्येक मुलीला आयुष्यात, असाच साथीदार हवा असतो. मला तो खूप आवडला पपा. त्याच्याशी लग्न करण्याची माझी इच्छा आहे. तसा तो तुमच्या तोला मोलाचा नाही हे खरं..."
"काहीतरीच काय बोलतेस." तिचं बोलणं तोडत, Mr. वर्मा म्हणाले. "माझा तुझ्या निवडीवर विश्वास आहे. आता तर याने मला कायमचा ऋणी करून ठेवलंय." मग आशिषला त्यांनी विचारलं. "आशिष, लग्न करशील माझ्या मुलीशी?"
आशिषनेही जरा लाजत होकार दिला.
---
थोड्याच दिवसात सोनाली आणि आशिषचं लग्न पार पडलं. विराट आणि अनिकेतही लग्नाला हजर होते.
"विराट… मला माफ कर. माझ्यामुळे तुझा किमती वेळ वाया गेला." वर्मा विराटला म्हणाले.
"काहीतरीच काय सर… सोनाली सुरक्षित आहे, आणि तिचं सारं चांगलं होतंय हे महत्त्वाचं." विराटने हसून उत्तर दिलं.
___
लग्नाच्या पहिल्या रात्री, सोनाली आशिषच्या बाहुपाशात होती.
"किती स्मार्ट आहेस रे तू.." त्याच्या गालावर हात फिरवत सोनाली म्हणाली.
"तुझ्यासारख्या मुलीला मिळवण्यासाठी एवढा स्मार्टनेस दाखवावाच लागतो." आशिष हसून म्हणाला.. "सोना.. खरंतर, असं नाटक करून तुझ्या आई-वडलांना घाबरवणं पटत नव्हतं ; पण दुसरा पर्याय सुचत नव्हता. बरं झालं तुझ्या पपांनी त्या रात्री मला तुझ्यासोबत पाठवलं."
"हो ; पण तशी खात्री असल्यामुळेच तर हा night out चा plan ठरवल्यावर, आपल्याला आपला plqn बनवता आला." सोनाली म्हणाली.
"हो, आणि तुझ्या मैत्रिणीकडून परस्पर दुसऱ्या जागी जाता आलं. माझ्या मित्राचीही खूप मदत झाली. त्यानेच जागा दिली. त्यानेच kidnapper म्हणून तुझ्या पपांना कॉल केला." आशिषने म्हणाला.
"आमच्या P. A. काकांनीही आपल्याला मदतच केली. त्यांचं पपांवर लक्ष असल्यामुळे, पपांना पोलिसांना कळवताच आलं नाही." सोनालीने सांगितलं.
"आणि शेवटी आपला plan, successful झाला. तू माझी झालीस. I love you सोना.." भावविवश स्वरात, आशिष म्हणाला..
"Love you too आशु.." म्हणून, सोनालीने त्याचं चुंबन घेत, त्याला जवळ ओढलं.
___
"ग्रेट आहेस बाबा वीरू तू." अनिकेत हसत म्हणाला.
"दोन प्रेम करणाऱ्यांना मिळवण्यासाठी, असा gretness दाखवावाच लागतो बाबा. सोनालीच्या मैत्रिणीने तिचं आशिषशी affair असल्याचा संशय बोलून दाखवला, तेवढीच गोष्ट पुरेशी होती. आता हे सारं आशिषने घडवून आणलं म्हणायचं, तर कुणा मित्राची वैगेरे मदत लागणारच. आशिषच्या आईकडून त्याच्या मित्राचा address मिळाला. आपण योग्य जागी पोहोचलो. नकली किल्लीने, सावधपणे त्याच्या घरात घुसून पाहिलं. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून सारं समजलं. या आशिषला, सोनालीच्या आई वडिलांना दुखावल्याचं वाईट वाटत होतं. म्हणजे तो प्रांजळ होता. आणि त्याचं खरंच सोनालीवर प्रेम असल्याचं दिसत होतं. त्यामुळे ठरवलं, की आपण यातून बाजूला होऊन खरं प्रेम यशस्वी होऊ द्यायचं."
अनिकेत, कौतुकाने विराटकडे पाहत राहिला.
समाप्त
© प्रथमेश काटे
सोनालीच्या मैत्रिणीने तिचं
सोनालीच्या मैत्रिणीने तिचं आशुतोषशी affair असल्याचा संशय बोलून दाखवला, तेवढीच गोष्ट पुरेशी होती. >> आशुतोष चे आशिष करायला हवे.
बालिश
बालिश
@आसामी - लक्षात आणून
@आसामी - लक्षात आणून दिल्याबद्दल थॅंक्यू. सुधारणा केली आहे.
बालिश >> हम्म.. असाल ; पण हे आम्हाला का सांगताय ?