मंडेला (तमिळ;२०२१) हा चित्रपट पाहत असताना केलेली काही निरीक्षणे

Submitted by ब्लू कोलंबसे on 29 April, 2024 - 06:58

प्रसंग व निरीक्षणे :

१. मंडेला मागचे दार post ऑफिस साठी शोधतो.

२. post ऑफिसची दयनीय बिल्डींग व वाईट अवस्था

३.आधार – मतदान कार्ड – रेशन कार्ड मिळवण्यासाठी मंडेलाला गोल फिरावे लागणे

४. हागण्यापेक्षा मान महत्त्वाचा !

५. त्याचे (मंडेलाचे) गावाने केलेले नामाभिधान – smile /इरच्च/Bushy Hair/Dung Picker/Rice Sack. मात्र यातील एकही नाव पोस्टात बचत खाते काढताना उपयोगी पडत नसल्याने त्याची ओळख/नाव अस्तित्वात नाही.

६. Why मंडेला ? (मंडेला हेच नाव का सुचवते ती मुलगी ? – तो (चित्रपटातील मुख्य पात्र) ज्याप्रमाणे त्याच्या नावासाठी/अस्तित्वासाठी संघर्ष करतो, तसाच (नेल्सन मंडेला) यांनी केला म्हणून.

७. smile गाडीत बसता (नव्याने बांधलेले संडास साफ करण्यासाठी जाताना) त्याला त्यातून हाकलून बाहेर ढकलणे आणि मागून चालत येणास सांगणे.

८. sapien पुस्तक म्हणते त्याप्रमाणे people are voters > याचा अर्थ people are data sets !

९. जेव्हा मंडेला मत देण्याच्या सरावावेळी म्हणतो, ” या तिसऱ्या माणसाने मला अजून काहीच ‘चारले’ नाही!” (आमिष दाखवले नाही), तेव्हा शेजारचा म्हणतो, ” अरे, ते NOTA आहे!”

१०. मंडेलाच्या vote चा लिलाव प्रसंग :

” तुझ्या खिशात कितीयेत?”

“२ रुपये !”

“आपल्या म्होरक्याने कितीची बोली लावलीय?”

“४५ लाख!”

“तुझ्याकडे इतके पैसे का नाहीयेत?”

“ही विचार करण्याची वेळ नाहीये, जातीच्या अभिमानाचा प्रश्न आहे!”११. मंडेला आत्महत्या करण्याच्या विचारात असताना रात्री आडबाजूला शौचाला आलेली तरुण मुलगी गावातील स्त्रियांच्या दुखऱ्या वेदना सांगते आणि मग त्यातून पुरुषांच्या राजकारणातून जुने पाडलेले शौचालय महिलेच्या लज्जारक्षणासाठी किती महत्त्वाचे होते, हे मंडेलाला कळते तो क्षण.

mandela-movie-review-768x384-1374138781.jpg

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults