गडकरी - चित्रपट

Submitted by यक्ष on 17 October, 2023 - 04:18

काल यु-ट्युब वर ह्या चित्रपटाचे ट्रेलर पहावयास मिळाले. इतक्यात येतोय असे दिसते.

भारताच्या उत्तर-पूर्व भागात ऑफिस कामा निमित्ते प्रवास करतांन्ना ह्या व्यक्तीचे नांव बर्‍याच जणांकडून ऐकले तेंव्हा परराज्यात आपल्या मराठी व्यक्तीचे नांव ऐकल्याचा अभिमान वाटला होता. तेथील रस्त्यांच्या दर्जाच्या फरकाचा माझा पण अनुभव चांगलाच होता.
नागपुरचेही रस्त्यांचे स्थित्यंतर पाहून एक पुणेकर म्हणून हेवा वाटतो.

चित्रपट अवश्य पाहीन. तुर्तास वाट पाहतोय.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुलाची वाडी इथले थेटर चालू झाले तर तिकडे पाहीन हा चित्रपट.
फडणविसांवर सुद्धा लवकर चित्रपट यावा. यादी मोठी आहे.

पुढील काही दशकात शाळा फक्त चौथी पर्यंत लिहिणे वाचणे शिकण्याकरिता असतील. बाकी सगळे शिक्षण चित्रपटांतून दिले जाईल.

होय लंपन मला पण लेखक गडकरी वाटले , मग कळले कि नितीन गडकरी , माणूस चांगला आहे पण अगदी चित्रपट निघावा असा नाही , मानव यांचे म्हणते बरोबर आहे , चौथि पुढील शिक्षण चित्रपटातून देण्यात येईल Happy

चिपळूण चा प्रमोशनचा शो पाहिल्यावर सिनेमाला होणारी संभाव्य अलोट गर्दी आणि चेंगराचेंगरी पाहता पोलीस बंदोबस्त चोख ठेवावा असे वाटते. सिनेमाला जाणार्‍यांनी त्या वेळेपुरते शक्यतो फ्लायओव्हरच्या वरून किंवा खालून जाऊ नये. कधीही कुठेही प्रमोशन होऊ शकते.

येउद्याकी प्रत्येक नेत्यावर काढा कितपत खरं दाखवतायत ते तरी कळेल.>>>
चित्रपटाचे नाव जर नड्डा असेल तर कसे वाटेल ते वाचायला / ऐकायला/ बघायला.