तूच

Submitted by mi manasi on 19 April, 2022 - 07:54

तूच आकाश माझे सजतेस घेऊन रंग
उधळून ते सारे करतेस जीवा दंग !!

तू रंग उगवतीचे लावतेस गाली-गुलाबी
खुलते पहाट माझी होतो दिवस शराबी !!

मी आवारा बादल घुटमळतो पुढे मागे
करतो प्रेमवर्षा तरी तू कोरडी का गे??

एखादी स्मितरेषा पाहण्यास मी तरसतो
जातो दिवस खाली स्वप्नात वाट बघतो !!

येतेसही हवीशी दरवळतेस क्षणात
माझा न राहतो मी बोलताच तू मनात !!

माझ्या नभात तेव्हा चांदणे भरात असते
धरतात फेर तारे चंद्रास भान नसते !!

होताच स्वप्नभंग नसतात तुझे ते भाव
आभाळ रिते होते बुडतो स्वप्नांचा गाव !!

एक एक करुनी मावळतात रंग आता
नभ निरभ्र होते मी विरहगीत गाता !!

मी मानसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users