बी लाईक बिल - बाळू सारखे बना

Submitted by हर्पेन on 27 January, 2016 - 05:36

सध्या चेहरेपुस्तकावरच्या ह्या बिलने नेटभरात धुमाकुळ घालायला सुरुवात केली आहे.

त्यांचा बिल तो आपला बाळू , आणि आपला बाळू कसा बरे मागे राहील. जगासोबत चालावे तर लागतेच ना भाऊ!

तर

हा आहे बाळू
हा मनात असेल ते आणि खरे बोलतो.
ह्या सवयीपायी तो काहीवेळा अनेकांना आवडेनासा होतो.
पण तो कोणाचीच पर्वा करत नाही.
तो आपल्या मनाचे ऐकतो. तो स्मार्ट आहे.
बाळू सारखे बना !

ह्या धर्तीवर आपापल्या पसंतीच्या मायबोलीकर आयडींबद्दल लिहा बरं

उदा.

हे आहेत अशोक.
हे नेहेमीच संयमित आणि तटस्थ भुमिका घेतात.
ह्यांना कधीही कुठल्याही वादात पडताना पाहिले नाही
अशोक. स्मार्ट आहेत
अशोक. सारखे बना

किंवा

हा आहे ऋन्मेष
ह्याची लिहिण्याची हातोटी खुमासदार आहे.
ह्याच्या कडे लोकांना काय आवडणार नाही ते किती चांगले असे म्हणून धागा काढण्याची हातोटी आहे.
स्वतःच्या धाग्यांवर विक्रमी प्रतिसाद संख्या मिळवण्याचे कसब वाखाणण्याजोगे आहे.
इतरांशी प्रतिवाद करताना आपला पारा कधीही वर चढू देत नाही.
ऋन्मेष हुषार आहे .
ऋन्मेष सारखे बना

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे आहेत हर्पेन!
हे मॅरॉथॉनमध्ये धावतात.
हे कधी कुणाशी पंगे घेत नाहीत.
हे स्वतः सत्कृत्ये करतात आणि इतरांना करायला प्रवृत्त करतात.
हर्पेनसारखे बना!

फार फार वर्षांपूर्वी दूरदर्शन वर आणि थेटरात सिनेमा सुरु व्हायच्या आधी '.... याला आपलं म्हणा' प्रकारातल्या टीबी वगैर आजारावर माहितीपर लघुपट लागायचे.. वरचं सगळं वाचल्यावर त्याची आठवण झाली Happy

हा आहे बाळू
हा मनात असेल ते आणि खरे बोलतो.
ह्या सवयीपायी तो काहीवेळा अनेकांना आवडेनासा होतो.
पण तो कोणाचीच पर्वा करत नाही.
तो आपल्या मनाचे ऐकतो. तो स्मार्ट आहे.
बाळू सारखे बना ! >

आमचं बी येच्च आलेले बग्गा.
आमी बी कुनची परवा करित न्हायी

मंजूताई कुठे रु आणि राकू कुठे मी... ह्या बाबतीत्ली त्या दोघांची पातळी उच्च आहे

मित, हे वेगळं आहे पण ह्याला आपले म्हणा Wink

निनाद१ मग लिहा की तुम्हीपण चांगलं काहीतरी

या आहेत साती तै
हुषार आहेत, डॉक्टर आहेत,
माबोवर छान छान माहितीपुर्ण लेख पाडतात,
अधेमधे काहीच्या काही कविता पण करतात,
सगळ्यांना खूप मदत करतात,
यांच्या सारखे बना........

Light 1

ही आहे टीना .
रांगोळी काढते , क्विलिन्ग करते , सॅटीनची फुले बनवते .
वर्‍हाडी पदार्थ किन्वा डाळीचे बरेच काही बनवते .
अधीमधी वेळ मिळाला की लोणावळ्याला फिरायला जाते .
वेळात वेळ काढून रोमॅंटिक सिनेमे बघते.
ती कलाकार आहे , दिलखुलास आहे
तीच्या सारखे बना

हे आमचे दिनेशदा
मायबोलीचे शेफ
रुचिरेसाठी झटतो हा अवलिया
चालताबोलता एनसायक्लोपीडीया
माहीतीची खाण ही पहा
जणू अलिबाबाची गुहा
मदतीस नेहमी तत्पर
हसतमुख यांचा वावर
केल्याने देशाटन म्हणे
हे विश्वची माझे घर
यांचे गुण घ्या ना
सगळे त्यांच्यासारखे बना

ही आहे अवल
क्रोशा विणकाम करण्यात अव्वल
जगातील सर्वात मोठे विक्रमी आकाराचे ब्लँकेट बनवण्यात हिचा मोलाचा वाटा
अवल एक गुणी कलाकार आहे
अवल सारखे बना

हे आहेत शशांकजी,
बालकविता लिहीतात, अन तुकोबांची कीर्तनभक्ति, तत्त्वज्ञान सुद्धा !
चित्रे काढतात,
निसर्गाच्या गप्पा मारतात,
स्वताकडे असलेला माहितीचा प्रचंड साठा सर्वाना खुला करतात,
चांगल्या लेखनाला तितकाच छान प्रतिसाद देतात..

शशांकजी सारखे बना..

दिनेशदा आणि अवलसाठी आधीच नंबर लागले Happy Happy

हे आहेत मयुरेश,
म्हणतात लोक त्यांना कार्याध्यक्ष
वर्षानुवर्षे वविची धुरा,
पेलतात स्वतःच्या खान्द्यावर
समर्थपणे.....
जसे तेजोनिधी लोहगोलाशिवाय
नभीच्या अंगणाला प्रकाश नाही,
तसे मयुरेश कार्याध्यक्षांशिवाय,
वविच्या कल्लोळाला गती नाही,
मयुरेशसारखे कार्याध्यक्ष बना.... ! Happy

आहे हा हर्पेन, तिकडे तो केदार,
पलिकडे मनोज, आणि आशुच्याम्प
बहुत असे हे क्रिडाप्रेमी,
निष्ठा कष्ट त्यांचे दिसे दृष्टी,
आळशांस इन्स्पायर करीती,
आधी कृती, मग बोलती,
यांच्यासारखे बना, खेळाडू बना,
तब्येत तंदुरुस्त ठेवा..... Happy

हे आहेत कराण्णा पोचाण्णा चेट्टियाड स्वामी
आहेत ते अंतर्यामी...
आयडी त्यांचा बहुआयामी
हुरडा खा नैतर खा शिजवून मका
पण त्यांच्यासारखे बनू नका..

हा आहे कांदापोहे
ह्याची एकाच जागी तासंतास बसून राहण्याची चिकाटी अफाट आहे.
त्यामुळेच ह्याने काढलेले पक्ष्यांचे फोटो अप्रतिम येतात.
कांदापोहे उत्कृष्ट पक्षी निरिक्षक आहे
कांदापोह्या सारखे बना

हे आहेत Yo Rocks आणि जिप्सी
भरपूर भटकंती करतात
सुंदर सुंदर फोटो काढतात
फोटो ह्यांचे पाहून डोळे तृप्त होतात
ह्यांच्यासारखे बना

अरे वा.. माझ्याबद्दलही :-).. मस्तय !

हि आमची वर्षू,
खर्‍या अर्थाने जिप्सी,
देशोदेशी फिरली,
अनेक भाषा शिकली,
पण मराठी नाही विसरली,
उत्तम सुगरण, उत्तम लेखिका,
तितकीच उत्तम शिक्षिका,
आणि आमची अत्यंत प्रेमळ ताई,

हिच्यासारखे बना !!

Pages

Back to top