Submitted by -शाम on 6 November, 2013 - 23:02
का झेप पाखराची सांडी मुजोर वारा
आभाळल्या जिवाचा पंखात कोंडमारा
शतवार हारलेल्या इच्छा वळून येती
मातीत माखलेली येते फुलून छाती
गात्रातुनी तरारे बळ कोणते उदारा
लय साधता भिडावा वाटेवरील वैरी
घनघोर अंतराळी आकांत रानभैरी
येतो तुटून जैसा कोणी अनाम तारा
माझ्या मना तुझ्याही भाग्यात ना निराळे
स्वप्नेच पावसाळी मार्गावरी उन्हाळे
आहे प्रवास कैसा काळीज पोळणारा
....................................................शाम
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा ! शेवटचं कडवं अधिक छान.
व्वा ! शेवटचं कडवं अधिक छान.
धन्यवाद काका!
धन्यवाद काका!
फार सुरेख ...मला 'चंद्र दे
फार सुरेख ...मला 'चंद्र दे आणून माझा' चीच आठवण झाली .
अप्रतिम आशय आणि सुरेख
अप्रतिम आशय आणि सुरेख शब्दकळा. शेवटचे कडवे अगदी अहाहा करून गेले.
खूप आवडली कविता.
सुंदर गीत ओळन्ओळ बेहतरीन झाली
सुंदर गीत
ओळन्ओळ बेहतरीन झाली आहे
खूप आवडली
धन्स
जेंव्हा तुझ्या बटांना उधळी...ची चाल आप्सूक आठवली त्याच चालीत गुणगुणली कविता
thanku.. sushant.
thanku.. sushant. ameya..vaibhav.
वाह वाह!
वाह वाह!
माझ्या मना तुझ्याही भाग्यात
माझ्या मना तुझ्याही भाग्यात ना निराळे
स्वप्नेच पावसाळी मार्गावरी उन्हाळे
आहे प्रवास कैसा काळीज पोळणारा>> खासच
>>शतवार हारलेल्या इच्छा वळून
>>शतवार हारलेल्या इच्छा वळून येती
मातीत माखलेली येते फुलून छाती
गात्रातुनी तरारे बळ कोणते उदारा >>
खूप ऊर्जा देणारे शब्द.
धन्यवाद.. कविता, रिया,
धन्यवाद.. कविता, रिया, भारतीताई
वा, काय सुर्रेख जमलीये .....
वा, काय सुर्रेख जमलीये ..... जबरदस्त ....
अप्रतिम !
अप्रतिम !