मोडकळलेले

बदनूर!

Submitted by नीधप on 21 April, 2011 - 00:25

जुनीच. "आतल्यासहित माणूस" या प्रयोगात होती.
-----------------------------------------------------
मोडकळीला आलेल्या गावाचे
मोडकळलेले आकाश.
आकाशाचा कण्हता सूर,
आकाशाला इथे तिथे जखमा.
जखमांतून ओघळले
आकाशाचे जांभळे रक्त.
एकेका थेंबाने मोजून घेतली
स्व्तःच्या गळण्याची किंमत.

आकाशाचा कण्हता सूर.
आकाशाखालचा गाव बदनूर.
आकाशाचे जांभळे रक्त
समुद्रावर सांडले, गावावर सांडले.
"मारा, झोडा!" च्या आरोळ्या देत
तेही समुद्राला मिळाले.

आकाशाखालचा गाव बदनूर
आकाशाच्या कण्हत्या सुरात सूर मिसळू लागला
मोडकळत्या गावातल्या
मोडकळत्या घरांचे गंजलेले पत्रे
समुद्राच्या रक्ताने रंगले.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - मोडकळलेले