मनमथ

रात्र अमृताची

Submitted by Meghvalli on 21 February, 2026 - 03:32

मिठीत तुझ्या सख्या आले उमलून सर्व गात्र,
आठवते मज अजूनही ती अमृताची रात्र।

श्वास तुझा अलवार गुंजारला कानांत,
हृदयाचे स्पंदन तुझे थरथरले देहात।

गंध आपुला मिसळला अलवार एकमेकांत,
प्रणयसुख पसरले सखोल माझ्या देहविश्वात।

विरघळले तन-मन दोन्ही त्या एका आभासात,
जीवन हे कृतार्थ झाले, निवला गूढ एकांत।

हा क्षण चिरंजीव व्हावा गोठून या क्षणात,
प्रार्थना हीच मनमथाला माझ्या मनात।

शनिवार, २१/२/२६ , १२:२५ PM
अजय सरदेसाई -मेघ

Subscribe to RSS - मनमथ