पहिले ‘काव्य’ प्रसवताना . . .
Submitted by कुमार१ on 7 December, 2025 - 19:53
वयाचे एकविसावे वर्ष पूर्ण झालेलं होतं आणि नुकताच मतदानाचा अधिकार मिळाला होता (तेव्हा तो 21व्या वर्षी मिळायचा, 18व्या नव्हे). त्यामुळे झालो बाबा आपण एकदाचे प्रौढ, ही मनात सुखद भावना. पदवी शिक्षण शेवटच्या टप्प्यात आलेलं. त्याच दरम्यान लेखन उर्मी अगदी उफाळून आली. तशी ती त्यापूर्वीच्या काही वर्षांत मनात धुमसत होतीच परंतु लेखणीपर्यंत काही पोचत नव्हती. वसतिगृहाच्या एकंदरीत सामाजिक वातावरणातून लेखनाची ठिणगी पडायला चांगली मदत झाली. मग सुरुवातीस वहीतच काही खरडकामे झाली आणि त्यानंतर सार्वजनिक लेखनात पदार्पण केले ते वृत्तपत्रातील वाचकांच्या पत्रांमधून.
विषय:
शब्दखुणा: