अपुल्या हाती नसे

इतकेच ओळखीचे

Submitted by चंद्रहास शास्त्री on 26 April, 2024 - 11:49

इतकेच ओळखीचे
© चन्द्रहास शास्त्री

इतकेच ओळखीचे, आपुले नाते असे.
काही सारखे नसे, पण पारखेही नसे

कोणी कसे पहावे, अपुल्या हाती नसे
म्हणावे काय कोणी, अपुल्या ओठी नसे.

हसणेच गुन्हा असे, सवय हीच जात नसे
मूर्खांच्या स्वर्गी या, कधी पारिजात नसे

मोकळ्या आकाशी, ढग हे पाहती कसे
स्वच्छ चांदणे यांना, पाहताच येत नसे

रागवेल निसर्गही, जिभेला हाडच नसे
देवाच्या काठीला, म्हणे आवाजच नसे

Subscribe to RSS - अपुल्या हाती नसे