आलबेल

काळीज लपवते आहे

Submitted by वेडोबा on 21 September, 2018 - 09:45

वरवर दिसते आलबेल सगळे।
मनात सतत काय हे जळते आहे।

तू नाहीस माझ्यासाठी, नव्हतास कधीही
कळते मला तरीही न कळते आहे।

खोल उरात दडलेले गुपित माझे,
न जाणो जगाला कसे कळते आहे।

नजरेत तुझ्या उमलते फूल प्रेमाचे
बघून जग सारे जळते आहे।

नाही रे इतकी कठोर मी प्रिया पण,
वेदनेच्या भीतीने काळीज लपवते आहे।

शब्दखुणा: 

आलबेल

Submitted by माणक्या on 15 October, 2010 - 03:13

आजही मनाप्रमाणे मन वागेलच असं नाही
आजही पूर्वीप्रमाणे आलबेल आहे सगळं काही

माझ्या प्रश्नातच होती तशी सारीच उत्तरेही
मी खरं तर वाचायलाच नको होतं दुसरं काही

मला वाटले दिशा मिळाली पण चकवा होता
मी मलाच विचारले की माझंच का चुकलं काही

घडायचं ते घडतच हे खूप उशीरा कळले
जेव्हा घडायला नको होतं तेच ते घडलं काही

ती भेटली, तसं तिनेच जगवलं असं काही
आताही पूर्वीप्रमाणे, आलबेल आहे सगळं काही

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - आलबेल