संजय विटेकर

माघार घेत नाही..

Submitted by sanjay vitekar on 7 November, 2019 - 05:59

हरतो पुन्हा पुन्हा पण माघार घेत नाही
जगण्यास मी कुणाचा आधार घेत नाही

घेवून टाक आता वापस मिठी तुझी तू
ठेवून मी कुणाचे उपकार घेत नाही

पाठीत एकदा तर खंजीर मार ना तू
छातीवरीच सारे मी वार घेत नाही

हासून दुःख येते माझ्या समोर जेंव्हा
खपवून लाड त्याचे मी फार घेत नाही

हिस्सा कधीच नाही मागून घेत.. कारण
वाटून मी कधीही अंधार घेत नाही

सादर कुणी कुणाची केली असेल कविता
त्याची जबाबदारी दरबार घेत नाही

माझ्याकडे कशाला बघतेस सारखे तू
मी ओढवून तसला आजार घेत नाही

$___ संजय विटेकर

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - संजय विटेकर