राजेश खन्ना

It's just happened..

Submitted by अजय चव्हाण on 17 November, 2018 - 00:52

शरद ऋतुतली प्रसन्न सकाळ.मस्त गोड गुलाबी थंडी.
कुठलासा हिरवाईने नटलेला वळणावळणाचा सुंदर घाट.चहुकडे पुसटसे धुके आणि धुक्यांतुन नागमोडी वळण घेत हलकेच धावणारी लांबलचक ट्रेन.रूळांच्या अगदी बाजुलाच असलेला चकचकीत डांबरी रस्ता आणि त्या डांबरी रस्त्यावर एक जुनाट जीप ट्रेनच्या स्पीडला मॅच करत चाललीय...गाडीमधल्या एम्प्लीफायरमध्ये किशोरचं जुन राॅमंटीक गाणं चालू आहे..आणि मी ही त्याच्या आवाजाला ठेका देत मस्त मुडमध्ये मोठ्याने राजेश खन्ना स्टाईलने गातोय.

विषय: 

ओ मेरे दिलके चैन

Submitted by स्वप्ना_राज on 21 July, 2012 - 10:54

'काय ग कुठे मारामारी करून आलीस की काय? काय ते केसांचं टोपलं झालंय' मी घरात शिरल्या शिरल्या माझा अवतार बघून भ्राताश्री उद्गारले. 'ए, गप् बस हं' मी आरश्यासमोर उभी राहून टोपलं निरखत म्हणाले. 'काय पण देवाने केस दिलेत. बसमधून येताना जरा वारा लागला की चहूदिशांना पांगतात.'. 'पण ती अरुणा काय खुश होती तुझ्या जावळावर.' इति आईसाहेब. हा संवाद आमच्या घरात वर्षातून किमान ३ वेळा होतो. त्यामुळे आम्ही दोघांनीही 'कोण अरुणा' हा प्रश्न विचारला नाही. अरुणा माझ्या जन्माच्या वेळी मॅटर्निटी होममध्ये असलेली एक नर्स. ती राजेश खन्नाची जाम चाहती होती.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - राजेश खन्ना