सणांवरची गाणी आणि कविता

Submitted by टवणे सर on 6 October, 2026 - 20:57

माबोकरांनी सुचवलेल्या कविता गाण्यांमुळे आमचा मागचा कविता-गाणी कार्यक्रम यशस्वी झाला. https://www.maayboli.com/node/86945

आता पुन्हा तुमची मदत मागत आहे. दिवाळीच्या दिवशी सणांवरच्या कविता व गाणी अशी थीम घेऊन कार्यक्रम करण्याचे मनात आहे. तेव्हा पुन्हा तुम्हाला मदतीचे आवाहन करत आहे.

उदा. बहिणाबाईंची पोळ्यावरची कविता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धामणस्करांची हस्तांतर इतक्यातच आठवली होती.

चल गं सये वारुळाला (नागपंचमी)

सोनियाच्या ताटी (भाऊबीज)

रुणझुणत्या पाखरा (गौरी)

भोंडल्याच्या गाण्यांचा स्वतंत्र धागाच होता मायबोलीवर.

गणपतीची गाणी... चिक मोत्याची माळ, सनईचा सूर कसा
मंगळागौरीची गाणी...पोरी पिंगा गं पोरी पिंगा.
गोविंदा रे गोपाळा...
अंजनीच्या सुता....
ऐलमा पैलमा गणेश देवा...

गणपतीची गाणी... चिक मोत्याची माळ, सनईचा सूर कसा
मंगळागौरीची गाणी...पोरी पिंगा गं पोरी पिंगा.
गोविंदा रे गोपाळा...
अंजनीच्या सुता....
ऐलमा पैलमा गणेश देवा...

पैठणी बिलगुन म्हणते मला गाण्यात ‘प्रीतिचा दिवाळसण तो आला’ अशी ओळ येते. चित्रपटात दिवाळीच्याच प्रसंगी आहे.

राम जन्मला गं सखी (रामनवमी)

खेळताना रंग बाई होळीचा होळीचा... अश्या कार्यक्रमात एखादी लावणी लागतेच. Happy

सन आलाय गो आलाय गो नारली पुनवेचा .. कोळीगीत

झुलतो बाई रास झुला,
नभ निळे, रात निळे, कान्हाही निळा.

कृष्ण जन्म

नवरात्रात हल्ली दोन तीन वर्षे एक गाणं फेमस झालंय

सावर सावर अंबाबाई, पैठणीचा घोळ गं
पैठणीचा घोळ गं, कपाळी कुंकु लाल गं.

तिळगुळ घ्या हो गोड गोड बोला - आशाची लावणी

बोला अमृत बोला - ज्योत्स्ना भोळे - हे आकाशवाणीवर संक्रांतीला लावायचे

पतंग उडवत होते

आले रे आले रंगवाले

धागा जुळला जीव फुलला
वेड्या बहिणीला भाऊ मिळाला
- सुमन कल्याणपूर

नवरात्रीला नव रूपे तू घेउनिया येशी - उषा मंगेशकर

आली दिवाळी दिवाळी - माणिक वर्मा- वाहतो ही दुर्वांची जुडी

भाऊबीजेला आला माझा भाऊ घरी

ओव्या

बारा महिन्यांचे सण येती सव सवडीनं - कृष्णा शिंदे

ज्ञानेश्वरांची दिवाळीबद्दल एक ओवी आहे.

तुकोबांच्या भेटीलागी जीवा मध्ये - दिवाळीच्या मुळा लेकी आसावली.

मूळ म्हणजे सासुरवाशीण मुलीला माहेरी आणायला पाठवलेलं माणूस

ज्ञानेश्वरांच्या २ तरी आहेत बहुतेक. एक आहे ती दिवाळीत फिरत असते त्यामुळे पुसट लक्षात आहे

सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा राणीव दे प्रकाशाची,
तैशी श्रोतया ज्ञानाची, दिवाळी करी.

दुस्री एक - मी अविवेकाची काजळी, फेडुनी (काहीतरी) उजळी … त्यातही दिवाळी शब्द आहे.

शब्द नीट आठवत नाहीयेत, कृपया क्षमा करा.

पण ह्या दोन्हींत दिवाळी हे रूपक म्हणून आहे. दिवाळीबद्दल आहे असं नाही म्हणता येणार.

ता.क. बर्‍याच आहेत ज्ञानेश्वरांच्या. इथे त्यावर लेखच सापडला.

मूळ म्हणजे सासुरवाशीण मुलीला माहेरी आणायला पाठवलेलं माणूस>>>>> त्याला "मुराळी" असेही म्हणतात सातारा सांगली कोल्हापूर भागात.

धन्यवाद चेराज - तुमच्या रिस्पॉन्सची वाटच पाहत होतो. अजूनही काही आठवत असतील कविता तर प्लीज द्या इथे.

गद्यामध्ये उद्धव शेळकेंची धग ही कादंबरी - यात त्या कादंबरीच्या नायकाच्या आयुष्याची फरपट दर दिवाळीगणिक होणार्‍या घसरणीवर दाखावली आहे

टवणे सर, आम्हालाही शाळेत तो धडा होता.
नंतर ती कादंबरी वाचली. फारच अंगावर येतो त्यातील शेवटचा प्रसंग.

टवणे सर, ह्या विषयावर जास्त कविता आठवत नाहीत. माझ्याकडची काही पुस्तके चाळली, त्यांतही जास्त काही गावले नाही. गडकऱ्यांची दसरा (तसेच बालकवींची धर्मवीर) केशवसुतांच्या तुतारी वरून प्रेरणा घेऊन लिहिली होती, म्हणून लक्षात राहिली. गडकऱ्यांच्या "वागवैजयंती" मध्ये दिवाळी (page 191) आणि लक्ष्मीपूजन ह्या दोन अपूर्ण कविता आहेत, त्याही पाहू शकता. तिथे दसरा कविता ही सविस्तर आहे.

मूळ आमच्याकडे सर्रास वापरतात. भाऊ, काका किंवा वडील सासरी मूळ घेऊन आल्यावरच सुनेला माहेरी पाठवायचे जुन्या काळी.
मामंजी मामंजी मायमूळ आलं, आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा. हे भुलाबाईचं गाणं.

बहिणाबाईंच्या कविता मध्ये पोळ्याबरोबरच दसर्‍याची पण आहे कविता. अजूनही एक दोन सणांच्या मिळाल्या त्यात.