गायत्री: मम मग्नं त्वयि ( गायत्री: तुझ्यात मग्न मी)

Submitted by Meghvalli on 28 September, 2026 - 04:21

हृदयं मम लीनं हि प्रेम्णा त्वयि,
नयनं मम मग्नं हि स्वप्ने त्वयि।

(हृदय माझे लीन आहे तुझ्याच प्रेमात,
डोळेही माझे मग्न आहेत तुझ्याच स्वप्नांत।)

न कदापि मया त्वां विस्मर्तुं शक्यते,
मम प्राणगतिः सर्वदा त्वयि।

(तुला विसरणे मला कधीच शक्य नाही,
माझ्या श्वासांची प्रत्येक लय तुझ्याच ठायी।)

मृदुगन्धवहः स्नेहवायुः स्पृशन्,
मम चेतसि जागर्ति कामो त्वयि।

(तुझ्या स्नेहाचा मंद सुगंधी वारा जेव्हा स्पर्शून जातो,
मनात माझ्या तुझ्यासाठीचा प्रेमभाव जागा होतो।)

वियुक्ते त्वया शून्यमेवाम्बरं,
निशा दीर्घतरा याति नित्यं त्वयि।

(तुझ्याविना आभाळही वाटते अगदी रिते,
तुझ्या विरहात रात्रही संपत नाही कधीच रे।)

न शब्दैर्न गीतैर्न मौनैरपि,
मम प्रेम्णः सीमा हि ज्ञाता त्वयि।

(शब्दांनी ना गीतांनी, ना अबोल मौनांनी,
माझ्या प्रेमाची व्याप्ती कळेल कशी तुला सांगूनही?)

त्वमेव मम स्वप्नमस्ति प्रिये,
त्वमेव मम जीवनं च त्वयि।

(तूच माझे स्वप्न आहेस ग प्रिये,
तुच माझे जीवन आहेस ग सारे।)

यदि जन्म पुनर्जन्म वा प्राप्नुयां,
मम प्रेम पुनः स्यात् तदेव त्वयि।

(जन्म पुन्हा मिळो, पुनर्जन्म कितीही येऊ दे,
माझे प्रेम प्रत्येक जन्मी तुझ्यावरच राहू दे।)

मेघ इव स्नेहं वर्षति सर्वदा,
हृदि तस्य वासः केवलं त्वयि।

(मेघासम प्रेमाची बरसात होत राहते,
माझ्या हृदयात केवळ तुझाच वास आहे।)

रवीवार, २७/९/२६, ०१:२५ PM
अजय सरदेसाई - मेघ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संस्कृत गझल! भारीच. अगदी गझल शब्दाला कुणी आक्षेप घेतला तरी कविता म्हणून छान आहे. ए आय वाप्रून लिहिली आहे की पूर्णपणे स्वतःची आहे?

संस्कृत गझल कळली. म्हणजे शाळेत शिकलेलं लक्षात आहे.

ह.पा. - शीर्षकात अहम् ची विभक्ती काय हवी?

शीर्षक सगळंच व्याकरणात चुकलेलं दिसतंय. (मम मग्नं त्वयि याचा शब्दशः अर्थ माझं तुझ्यात मग्न आहे... पण माझं काय तुझ्यात मग्न आहे ते ह्यात कळत नाही. पहिल्या कडव्यात माझं डोळं (संस्कृतात नयन नपुंसकलिंगी आहे) तुझ्यात मग्न आहे अशी पूर्ण ओळ आहे. त्यातला नयनं शब्द गाळून शीर्षकात चुकीचा अर्थ लावलेला आहे)

गायत्री: >> "गायत्री" (गाय् + त्र शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ङीप् प्रत्यय वापरून तयार झालेले असल्याने) हा ईकारान्त स्त्रीलिंगी शब्द देवी, नदी वगैरे शब्दांप्रमाणे चालवावा, त्यामुळे गायत्री: असा विसर्ग यायला नको पुढे. उलट तिथे संबोधन एकवचन असल्यामुळे गायत्रि अशी पहिली वेलांटी यायला हवी.

मम >> इथे "मी" हा अर्थ अभिप्रेत असल्याने प्रथमा एकवचन 'अहम्' हवे.

मग्नं >> हा कवी स्वतःबद्दल हे म्हणतो आहे आणि इथे कवी 'मेघ' यांची रचना असल्याने तो शब्द पुल्लिंगी हवा. मग्नः पाहिजे. पहिल्या कडव्यात मात्र 'नयन' (तुझ्या स्वप्नात) मग्न आहे असे म्हटल्यामुळे तिथे नयनं (नपुंसकलिंगी एकवचन) शब्दाचे विशेषण 'मग्नं' हे देखिल नपुंसकलिंगी एकवचनी होते व त्यामुळे तिथे मग्नं बरोबर आहे. अगदी काटेकोरपणेच बघायचे झाल्यास एकच डोळा मग्न असणार नाही, त्यांच्या मराठी ओळीतही 'डोळे माझे मग्न आहेत' अशी सयुक्तिक ओळ आहे. संस्कृत मात्र एकवचनी नयनं आल्यामुळे जरा विनोदी वाटते आहे. 'नयने मम मग्ने हि स्वप्ने त्वयि' असे द्विवचन केल्यास अर्थ जुळेल व छंदही मोडणार नाही.

त्वयि >> ठीक आहे.

गायत्री, तुझ्यात मग्न मी >> असा अर्थ लावायचा झाल्यास 'गायत्रि, त्वयि मग्नः अहम्' किंवा 'गायत्रि, मग्नोऽहम् त्वयि' असे शीर्षक लिहावे लागेल.

वा वा! ४६ वर्षे मागे गेल्यासारखे वाटले.

गायत्रि, मग्नोऽहम् त्वयि - हे ओळखीचं आहे.

वर्ग घ्या संस्कृतचे. मी येईन.

__/\__