शशक स्पर्धा - प्राचीन - विषाणू

Submitted by प्राचीन on 20 September, 2026 - 13:56

आजारांचे विषाणू वावदूकपणे बढाया मारीत होते.
फ्लू. - "मी किती जुन्या काळापासून हैदोस घालत आलोय. अश्शी पटापट माणसं मरायची.."
कांजण्या - "आम्ही भारी चिवट .. एक जरी पुटकुळी दिसली तरी लोक घाबरतात आणि बरं होत असतानाही खाजेने करतो बेजार नि मिळत नाही शेजार.."
गोवर गर्विष्ठपणे बोलला , "तुमची मजल किती दिवस असते ? मी बघा..अंगभर पुरळ नि ताप मुदतीचा, माझा मुक्काम म्हणजे
ऱ्हास शक्तीचा"
गालगुंडाने गाल फुगवून निषेध व्यक्त केला.
एड्स आपल्या निवडक प्रभावक्षमतेच्या जाणिवेने आणि नैतिक निकषाच्या नेणिवेने निमूटपणे बसलेला.
सर्दी, कावीळ, डेंग्यू आणि काही स्थानिक मंडळींनाही बोलायचे होते. पण..
तो येताना दिसला! सर्वांचे 'श्वास रोखले' गेले, नकळतपणे 'हात जोडले' गेले.. "नमस्कार! कोविडजी!"

रस-बीभत्स, भयानक
अलंकार - अनुप्रास

Group content visibility: 
Public - accessible to all site users