शशक स्पर्धा – सामो - भूपाळी

Submitted by सामो on 20 September, 2026 - 05:57

पूर्वेच्या गालावर चढला लाल रंग देवा
तुझ्या पूजेस्तव बहरुनी आला जास्वंदी ताटवा

खग निघाले दिगंतरी या स्वच्छंदी मोकळे
तुझ्या पूजेस्तव उमलले जणू हे कमळांचे कळे

हरिता धरती, तृणही डोलती इवली बीजांकुरे
तुझ्या पूजेस्तव करपल्लव जोडूनी दुर्वांकुर उभे

शीतल वारा सुगंध उधळे दहा दिशांतरी
तुझ्या पूजेस्तव धूप जणु ओवाळीते सृष्टी सारी

गणगंधर्व मनुष्य, देवता, पशुपक्षी किन्नर
गाती तुजला उठवायासी सुस्वर, मोरेश्वर!

झणकरी उठुनी दे दर्शन, ते त्यासाठी थांबले
तुझे कोमल चरण पहावया ऋषीमुनी पातले

जगन्माता तिलाच ठावे अमोघ अशी युगती
म्हणे उठ रे बाळा ते बघ मोदक गारठती

'मोदक' ऐकुनी तत्पर उठशी लंबोदर विघ्नहरा
डोळे भरुनी सृष्टी पाही मग हा कौतुकसोहळा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

शीतल वारा सुगंध उधळे दहा दिशांना जरी
तुझ्या पूजेस्तव धूप जणु ओवाळीते सृष्टी सारी

>>
ह्या ओळीत जरी शब्द तेवढा योग्य नाही वाटला .

छान!

'मोदक' ऐकुनी तत्पर उठशी लंबोदर विघ्नहरा
डोळे भरुनी सृष्टी पाही मग हा कौतुकसोहळा

मोदक या अशक्त बिंदुवर भुपाळीचा केलेला शेवट सार्थ आहे Lol

शब्दश्रीमंतीने ओतप्रोत, छंदोबद्ध भूपाळी आहे.
ज्यांच्याकडे अशी क्रिएटिव्हिटी असते त्यांच्याकडेच रसग्रहणाची दृष्टी असते.
खूप आवडली.

Pages