Submitted by प्राचीन on 19 September, 2026 - 13:45
भणाणणारा वारा, सोबतीला तिचा लडिवाळ लपंडाव.. सभोवताली सुरम्य सृष्टी..
"छे! बायनॉक्युलर आणायला हवी होती.."
"कशाला ?"
"दूरच्या डोंगरावरची साईटसीईंग करायला गं!"
"मग मोबाईल आहे ना.."
"नाही.. तूच मगाशी काढून बाजूला ठेवलास ना, दोघांत तिसरा नको म्हणून?"
"हो तर.. इथे दूरदर्शन करायला आलायस का.. जवळ ही प्रिया असताना.."
तिचा आवाज मध्येच लांबून आल्यासारखा वाटला .. म्हणून वळला तर ती दिसेचना.. तो तिसरा मात्र आलेला.. आणि.. आणि तीही.. पण त्याक्षणी ती प्रिया नव्हती कि सिया नव्हती..तिच्या मधाळ नजरेत आता कृतांंतकळा उमटली होती.. बायनॉक्युलरने त्याला जवळची घातकी घसट कशी बरं दिसणार होती..
"केव्हा, कुठे, का, कुणाला.."
चित्रगुप्ताने विचारले. झरणीतून शब्द झरू लागले - लोहगड...
रस - भयानक
अलंकार - अनन्वय
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
छान, आवडली.. जमलीय
छान, आवडली.. जमलीय
अर्र.
अर्र.
सियापति घाबरती एकांताला
सियापति घाबरती एकांताला 🙂
थोडी high context आहे, पण समजली (असे वाटतेय)
कृतांतकळा !
कृतांतकळा !
कितीतरी वर्षांनी हा शब्द वाचनात आला.
एकदम “कृतांतकटकामलध्वजजरा दिसो लागली” वगैरे आठवले 😀
जमलीय
जमलीय
खरंय, जिथे विश्वासघात असतो तो दिसेलच कसा आणि कोणत्या उपकरणाने.
खरंच भयानक! कृतांतकळा शब्द
खरंच भयानक! कृतांतकळा शब्द आवडला
होय कृतांतकळा मस्त शब्द
होय कृतांतकळा मस्त शब्द वापरलायस.
जमलीय... इफेक्ट जाणवतो शेवटी!
जमलीय... इफेक्ट जाणवतो शेवटी!
जमलीये.. जो पर्यंत त्या
जमलीये.. जो पर्यंत त्या चेटकीणी ला शिक्षा होत नाही तोवर जिवाला चैन पडणार नाही. नाव काय तर सिया
जमली. कृतांतकळा शब्द आवडला
जमली. कृतांतकळा शब्द आवडला
जमलीय.
जमलीय.
जबरदस्त
जबरदस्त