Submitted by चीकू on 17 September, 2026 - 10:09
वाड्याच्या दरवाज्यापाशी ती सडासंमार्जन करत होती.
'अन्नदान दे माई. भलं होईल.' तिने दचकून वर बघितलं. लाल आलवणातील एक गलितगात्र म्हातारी पदर पसरून उभी होती. सकाळी सकाळीच विधवेचं दर्शन झाल्याने ती वैतागली पण दारातील याचकाला परत पाठवायचं नसतं.
म्हातारीच्या पदरात तांदूळ रिते करताना ती स्वतःशीच म्हणाली, 'काय भलं होईल? पुत्र एकुलता एवढा ऐतखाऊ, ऐशारामी, ऐदी!'
'पुत्र जवळ आहे ही भली गोष्ट समज!'
तिने चमकून वर पाहिलं पण म्हातारी पुढे निघालीही होती. मागे दाराशी आलेली तिची नणंद कुतूहलाने बाहेर डोकावली.
'गोपिकाबाई?' नणंद चमकून उद्गारली 'मुलांच्या निधनाने डोक्यावर परिणाम होऊन भिक्षा मागत फिरतात असं ऐकलं होतं पण आज प्रत्यक्ष पाहिलं तेव्हाच विश्वास बसला!'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख. Spot on.
सुरेख. Spot on.
आवडली. खरच फार करुण आहे.
आवडली. खरच फार करुण आहे.
आवडली
आवडली
आवडली.
आवडली.
>>>>एकुलता एवढा ऐतखाऊ,
>>>>एकुलता एवढा ऐतखाऊ, ऐशारामी, ऐदी
बरोबर अनुप्रास आहे.
छान गोष्ट.
छान गोष्ट.
ह्या गोपिकाबाईंबद्दल मला फार कुतूहल आहे!
कसली करारी बाई!
धन्यवाद सर्वांचे!
धन्यवाद सर्वांचे!
वाह! शंभर शब्दांत खूप मोठा
वाह! शंभर शब्दांत खूप मोठा संदेश.