Submitted by शर्मिला. on 16 September, 2026 - 09:16
रात्रिची झाकपाक झाल्यावर मोठीनं अंथरूण घातलं.
"छोटे.... आत..." मोठीनं आवाज दिला.
उकड्याचं छोटीला अजून थोडावेळ बाहेर बसायचं होतं.
ती मुकाट्याने खाटेवर कुबट मच्छरदाणीमधे गेली.
मोठी खाटेवर लांबलचक दोरी घेऊन बसली होती.
छोटी आल्याबरोबर मोठीने मच्छरदाणीच्या काठांच्या अन् बाजेच्या भोकांतुन दोरी घालून कडेकोट बंदोबस्त करणं सुरू केलं.
छोटीने डोळे मिटले.
"काय गं... ती बह्याड काय म्हंते ... तो हात घालतो म्हनं राती...? " मायनं कुजबुजत इचारल होतं एकदा.
"नाई नाई..." छोटी तंतरली होती मायला.
तो किळसवणा गिळगिळीत हात आठवून आताही तिला कसंस झालं.
तरी बरं, मोठी आता रोज सगळीकडून घट्ट बांधून घेते...
आधीच घामेजल्या तिने भितिने पांघरुण आणखीन घट्ट केलं...
*******
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाप रे!! कळली नाही विशेष पण
बाप रे!! कळली नाही विशेष पण कळवुन घ्यायची इच्छा नाही
काहीतरी भयानक आहे खरं.
Child abuse! भयंकर
Child abuse!
भयंकर
(No subject)
कळवुन घ्यायची इच्छा नाही.
कळवुन घ्यायची इच्छा नाही. खरंच.
नेमकं काय घडलंय हे न सांगताही
नेमकं काय घडलंय हे न सांगताही एखाद्या भयानक अनुभवाची चाहूल लागतेय.
नेमकं काय घडलंय हे न सांगताही
नेमकं काय घडलंय हे न सांगताही एखाद्या भयानक अनुभवाची चाहूल लागतेय.
>>>> +१
समजल्यासारखी वाटली, पण 'रोज
समजल्यासारखी वाटली, पण 'रोज सगळी कडून शिवून घेते' भाग नाही समजला. मच्छरदाणीचा 'पटापट' दोरी घालून बंदोबस्त का इतका ठळक करुन लिहिलाय? त्यात काहीतरी दडलेलं असावं.
पण कथा जमली आहे.
रोज सगळी कडून शिवून घेते >>
रोज सगळी कडून शिवून घेते >> आता बांधून शब्द वापरला आहे.
शर्मिला नकळत तुझी व माझी
.
बरोबर आहे सामो तुझं.
बरोबर आहे सामो तुझं.
म्हणूनच ही शशक लिहायला मन होत नव्हतं आधी.
ओके. बांधुनने बांधिव झाली आता
ओके. बांधुनने बांधिव झाली आता.
जमली आहे. आवडली.
:|
:|
जमलीये.
जमलीये.
जमलेय
जमलेय
बापरे.
बापरे.
ओह
ओह
(No subject)