
जास्वंद डाळिंब ज्युस
हा पाककृती स्पर्धेचा इशय लई हार्ड हाय.
. पण असो. एकदा भाग घ्यायचा म्हटलं की काहीतरी करावं लागतच. वाचता क्षणी एकमेव मनात आला तो गोकर्णीचा चहा . पण मीच तो धागा काढलेला असल्याने आणि दोन तीन वर्षांपूर्वी एका गणेशोत्सवात ही तोच रिपीट झाल्याने तो बाद करावा लागला.
हल्ली जास्वंद म्हणजे जपा कुसुम किंवा हिब्सकस हर्ब म्हणून इन आहे. नशिबाने टीचभर गॅलरीतल्या बागेत फुलतं झाड ही आहे जास्वंदीच. त्यामुळे ते वापरून काहीतरी करायचं ठरवलं. त्या लाल रंगाला पूरक म्हणून डाळिंब निवडलं आणि हे जास्वंद डाळिंब सरबत तयार केलं. दोन्हीची आद्याक्षरं घेऊन नाव देणार होते पण नाव वाचून लोक पाकृ न वाचताच पळून जातील म्हणून ते बाद केलं. तर आता प्रत्यक्ष पाककृतीकडे वळू या.
साहित्य
जास्वंदीची फुले, डाळिंबाचे दाणे, मीठ ,मिरपूड
कृती
जास्वंद फुलाच्या पाकळ्या पाण्यात उकळत ठेवल्या. फुल गुलाबी रंगाचं होतं पण उकळल्यावर त्याला तो रंग न येता काळपट/ करडा रंग आला. रंग बघून निराशच झाले कारण मस्त गुलाबी रंग येईल असं वाटलं होतं. असो. डाळिंब मात्र चांगलं लाल होतं . त्याचा मिक्सर मध्ये न घालता रस काढून तो गाळून घेतला. त्यात जास्वंद अर्क घातला . तो काळपट रंग ओव्हर पॉवर न होता मस्त लाल रंग आला त्यामुळे छान वाटलं. मग त्यात चवीप्रमाणे पाणी,मीठ, मिरपूड घातली आणि तयार झाला जास्वंद डाळिंब ज्युस. थोडावेळ फ्रिज मध्ये ठेवला आणि मग मीच प्यायला.

अधिक टिपा
१) रंग छान आला होता पण आम्हा कोकणातल्या लोकांना लाल बुंद कोकम सरबत पाहायची सवय असल्याने फार काही ग्रेट वाटलं नाही. जास्वंदीचा काळपट नाही आला हे मात्र ग्रेट वाटलं.
२) चव जास्वंदीची लागत नव्हती फार . डाळिंब सरबत प्यायल्या सारखच लागत होतं
३) दोनच फुलं असल्याने एक सजावटी साठी ठेवलं आणि एक वापरलं त्यामुळे एकच ग्लास झाला. त्यावर “ हा रस प्यायच्या शिक्षेतून मी वाचलो “
ही मुलाची प्रतिक्रिया.
४) घरात हिरव्या माठाची देठी होती ती आणि डाळिंबाचे दाणे वापरून सजावट केली. मजा आली.
५) ह्यात साखर, पुदिना वगैरे ही घालू शकता.
काय सुंदर दिसतंय!! आणि काय
काय सुंदर दिसतंय!! आणि काय मस्त सजावट!!
फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये हेल्थ बूस्टर म्हणून विका 500 रु ला.
थँक्यु अनु..
थँक्यु अनु..
छान दिसतंय.
छान दिसतंय.
सजावट, रंग अफलातून
सजावट, रंग अफलातून
फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये
फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये हेल्थ बूस्टर म्हणून विका 500 रु ला.>>> हो आणि बाकी काहीही सांगू नका... काहीतरी एकदम फॅन्सी नाव The Ruby Reserve किंवा "द रॉयल क्रिम्जन" असंच काहीतरी... देऊन टाका याला!
(बेसिक शंका - हा क्रिम्जन रेड आहे ना? मला कळत नाही, अंदाज. सॉरी ममोताई भलतंच अवांतर झालं.)
आह्हा! मस्त दिसतंय.
आह्हा! मस्त दिसतंय.
हेच कॉम्बो सुचलं होतं, आता मला जरा वेगळा विचार करावा लागणार.
थँक्यु सर्वांना.
थँक्यु सर्वांना.
फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये हेल्थ बूस्टर म्हणून विका 500 रु ला. >> आफ्टर रिटायरमेंट बिझनेस चांगला होईल हा.
हेच कॉम्बो सुचलं होतं, आता मला जरा वेगळा विचार करावा लागणार. >> अरे रे.. सो सॉरी मॅगी..
प्रद्न्या , थँक्यु सो मच. हेडिंग मध्ये बदलता आलं तर बदलू का , कॉपी राईट म्हणून तुला हा ज्यूस देते एक ग्लास. हाहाहा
the Ruby reserve फारच आवडलं आहे .
the Ruby reserve खरच मस्त आहे
the Ruby reserve खरच मस्त आहे नाव!
हेच कॉम्बो सुचलं होतं, आता
छान आहे पाककृती!
हेच कॉम्बो सुचलं होतं, आता मला जरा वेगळा विचार करावा लागणार.>>>> अगदी अगदी. मी विकेंडला टाकणार होते. लिहून पण ठेवलेल. फक्त जास्वंद ऐवजी गुलाब वापरणार होते. मला रुबिना ए अनार हे नाव सुचलेले
रंग मस्त आलाय. सजावट पण छान.
रंग मस्त आलाय. सजावट पण छान.
फाईव्ह स्टार हेल्थ बुस्टर पेय म्हणून विका + १
सुंदर सजावट, पेल्याहून प्लेट
सुंदर सजावट, पेल्याहून प्लेट भारी
सुंदर रंग आला आहे.
सुंदर रंग आला आहे.

पण जास्वंदीची कडवट चव नाही ना आली?
कॉपी राईट म्हणून तुला हा
कॉपी राईट म्हणून तुला हा ज्यूस देते एक ग्लास. >>

त्यापेक्षा मलाच दत्तक घ्या.
खतरनाक!
खतरनाक!
खरेच फाईव्ह स्टार लेव्हल प्रेझेंटेशन आहे!
आधी फक्त फोटो पाहिले. मग
आधी फक्त फोटो पाहिले. मग कृती वाचली.
तुमचा कीबोर्ड कोणी बदलला की काय?
आता पाककृती लेखन स्पर्धेत तुमच्या एंट्रीची वाट पाहतो.
मस्त दिसतेय अनारकली!
मस्त दिसतेय अनारकली!
प्रतिसादाबद्दल सर्वांना
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.
जाई, अरे रे,.. बाकी रुबीना ए अनार हे ही छानच आहे नाव.
मॅगी आणि तू आता डोकं चालवा आणि एखाद आणखी छान पेय बनवून इथे दिमाखात एंट्री करा.
पेल्याहून प्लेट भारी >> हे भारी आहे.
पण जास्वंदीची कडवट चव नाही ना आली? >> नाही अजिबात lकारण फुल एकच घातलं होतं, आणि तसं ही एकुणात दोनच फुलं असल्याने जास्त घालायला स्कोप ही नव्हताच.
त्यापेक्षा मलाच दत्तक घ्या. Proud >> आनंदाने.. एक छान हसरी मोकळी मुलगी मिळेल मला.
तुमचा कीबोर्ड कोणी बदलला की काय? >> Good observation भरत.
स्वाती, अनारकली नाव ही छानच.
वा ! मस्त दिसतंय , रंग काय
वा ! मस्त दिसतंय , रंग काय सुरेख आलाय, सजावटही आवडली.
आशिका, धन्यवाद.
आशिका, धन्यवाद.
मोहक दिसतंय, सुरेख सजावट.
मोहक दिसतंय, सुरेख सजावट. छान आहे, करून बघायला हवं.