Submitted by Sanketatedu on 5 September, 2026 - 00:05
रोज रोज तीच वेळ गारव्यात नाहते
तोच खेल रोज रात चांदण्यात खेळते
वागते खट्याळ अन मधाळ गोड बोलते
एक पोर घालमेल का उरास लावते
माळते सुगंध वास कस्तुरी समान गं
पाहतो तुला जगास ओरडून सांगते
चालतात बोलतात मज सवे किती जनीं
या मनात वात एक लावण्यास धावते
टाळले जरी मला तरी मनात भाव गं
कोरले उरात नाव खोडण्यास पाहते
- संकेत महाजन (८२०८२७५७९८)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रोज रोज तीच वेळ गारव्यात
रोज रोज तीच वेळ गारव्यात नाहते >> ही ओळ बेहद्द आवडली. रोज रोज आंखो तले ची आठवण झाली.
खेलचं खेळ करा. '
खूपच मधाळ गझल आहे. आवडली.
काय बोलावे! थक्क झालो.
काय बोलावे!
थक्क झालो.
>>>>>चालतात बोलतात मज सवे
>>>>>चालतात बोलतात मज सवे किती जनीं
या मनात वात एक लावण्यास धावते
.
टाळले जरी मला तरी मनात भाव गं
कोरले उरात नाव खोडण्यास पाहते
या ओळी विशेष आवडल्या. जनी म्हणजे जनाबाई असा अर्थ आहे ना? बहुधा नसेलही.
खूप धन्यवाद ..
खूप धन्यवाद ..
प्रसन्न मूड आहे सर्वच शेरांचा
प्रसन्न मूड आहे सर्वच शेरांचा. गोडवनजाकत, नजाकत आहे.
आवडली.
भाव गं >> हे बदलता येईल का?
हो नक्कीच
हो नक्कीच