Submitted by Madan Hunkare on 18 August, 2026 - 06:34
पुण्याजवळ असलेल्या सिंहगडावर पर्यटक येतात पण ते गडाचे पावित्र्य राखत नाहीत अशी तक्रार गडाची देखभाल करणाऱ्या गडकिल्ले संस्कृती श्रीवर्धन संस्थेचे लोक नेहमी करत असतात.
गडावर मांसाहार, दारू बंद करण्यात आली. पण लोकांनी पावित्र्य राखण्यासाठी आता समस्त हिंदू बांधव समितीमार्फत खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याबाबत आपल्याला काय वाटते?

Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नक्की ड्रेस कोड काय?कसा
नक्की ड्रेस कोड काय?कसा ठरवणार?गड किल्ले यावर तरुण कप्रि बर्म्युडा घालून पाहिलेले आहेत.यामागे पायऱ्या चढणे, आरामदायी कपडे, त्यातल्या त्यात वर चढताना गरम व्हायला नको अशी अनेक कारणं असतील.नक्की ड्रेस कोड काय याची नीट माहिती गड चालू होण्यापूर्वी खालीच दिली तर लोक नक्की नियम पाळून गडावर येतील.(लहान मुलं मुली तर सर्रास बर्म्युडा, हाफ पॅन्ट घालतात. त्यांच्या डोक्यातही येत नाही की हे अस्वीकार्य ड्रेस कोड असू शकेल.अगदी साधा शॉर्ट कुर्ता जीन्स हे सणावाराचं एथनिक झालंय.) दक्षिणेकडच्यान काही मंदिरात बायांनी पॅन्ट सदृश कपडे किंवा पुरुषांनी शर्ट चढवून पॅन्ट सहित येणे मनाई असते.पण ते या ड्रेस मध्ये आलेल्याना मारहाण करत नाहीत,त्यांना 50किंवा 100 रुपयात रेंटल पंचा विकतात तो जीन्स वर गुंडाळून आत जाऊ देतात.
बरं हे सर्व गडावर चालत नाही, अगदी पट्टी बॅक ची स्लीव्हलेस ब्लाउज आणि साडी चालेल का?असे अनेक प्रश्न आले.भीतीही वाटली.पहिल्यांदाच असं वाटलं की (स्वतःच्या, माझ्यापुरते विचार) मुलाबाळांना बाहेर वावरताना थोडे सोबर लॉंग कुर्ते घालायची सवय लावावी.उगीच कोणाशी पंगा नको.
खरे म्हणजे गडावर येणार्या
खरे म्हणजे गडावर येणार्या लोकांनी ऐतिहासिक मावळ्यांचा नाहीतर मावळिणीच्या वेषातच आले पाहिजे. डोक्यावर मुंडासे, शेला, पगडी, खाली धोतर, अंगरखा. बायकांनी नऊवारी आणि डोक्यावर पदर आणि चोळी.
मोटरसायकल, कार , बस वगैरे बंदी घातली जावी. चालत, पालखीतून किंवा घोड्यावर बसूनच आले पाहिजे.
मोबाईल वगैरेवरही पूर्ण बंदी घालावी. फोटोग्राफीवरही बंदी हवी.
दारू सिगरेट बरोबर चहा कॉफीवरही बंदी घालावी. महाराजांनी कधी चहा कॉफी प्यायल्याचे ऐकलेले नाही.
शिवछत्रपती महाराजांच्या गडाचे पावित्र्य टिकवणे म्हणजे काय चेष्टा वाटली काय?
लोकमत मधे आलेली बातमी वाचून
लोकमत मधे आलेली बातमी वाचून धकाच बसला आणि वाईटही वाटले. एव्हढ्या झपाट्याने बदल होत आहेत ?
बर्म्युडा घातल्याने गडाचे पावित्र्य कसे भंग पावते हे कळाले नाही. गडावर जाण्यासाठीचा काही ड्रेसकोड असतो का ? कुणी ठरविला आहे? आठ वर्षांच्या मुलीने काय कपडे घालावे हे ठरविण्याचा अधिकार तिला आणि तिच्या पालकांना आहे. कपडे काय घालावे याचे स्वातंत्र्य आठ वर्षाच्या मुलीला नसावे?
सरकारने सर्व नियम एका
सरकारने सर्व नियम एका गॅझेटमध्ये प्रसिद्ध करावेत. राजगड हासुद्धा पिकनिकचे ठिकाण आहे. असंख्य किलो प्लास्टिक कचरा तिथे टाकतात. तो साफ करण्यासाठी शालेय मुलांना का वेठीस धरतात? गडाचा वरचा भाग केंद्र सरकारच्या पुरातत्त्व खात्याकडे आहे. तिथला त्यांचा कर्मचारी सांगतो की मी सर्व कचरा साफ करुन घेतो.
गडावर येणारे शिवप्रेमी असतात ना मग कचरा कोण करतो? गडाखाली जिथे पीमटी बस उभी राहते तिथे काही हॉटेल्स _ रेस्टॉरंट्स आहेत त्यांचा कचरा मागच्या बाजूला टाकतात. त्यांचं काय? इकडे कोण पाहात नाही आणि कुणी कोणते कपडे घातले याकडे मात्र पूर्ण लक्ष असतं.
असले काहीतरी नियम
असले काहीतरी नियम बनवणाऱ्यांना असे नियम बनवायची परवानगीच नाही.
दुसरे असे, की गडावर शिवछत्रपती ह्यांचे एक मंदिरवजा चांगले ठिकाण ठेवावे व तेथे असे नियम लागू केलेले असावेत. संपूर्ण गडावर ड्रेस कोड वा अन्य नियम नसावेत. अगदी खुलेआम मद्यप्राशन वा धूम्रपान नकोच, पण मांसाहार बंदी वगैरे अतीच आहे. दही, ताक, भजी, झुणका भाकर विकणारे पार पोचलेले असतात व मुळीच भाबडे नसतात. त्यांच्या संख्येवर नियंत्रण असणे आवश्यक आहे. त्यावरूनही आंदोलन हे होईलच. चांगली शौचालये वगैरे फारच भयंकर अपेक्षा वाटाव्यात अशी अवस्था आहे.
आणि मुलीने बर्म्युडा घातली म्हणून दोन गटांमध्ये हाणामारी हे कैच्याकै आहे.
फक्त स्त्रियांच्याच असे कपडे
फक्त स्त्रियांच्याच असे कपडे घालण्यावर आक्षेप घेतला,
असं वाचलं. खरंय का?
स्वयंघोषित संस्कृतीरक्षक
स्वयंघोषित संस्कृतीरक्षक असतात हे
कडक कारवाई होत उदाहरण सेट केले जाईल अशी अपेक्षा.
कडक यासाठी की असे प्रकार इतर पुन्हा कोणी करायची हिंमत दाखवणार नाही. आणि लोकांनाही अशांची भीती वाटणार नाही. हे होणे गरजेचे. अन्यथा उद्या त्या जागी माझीही मुलगी असू शकती हाच पहिला विचार मनात आला.
तरी एखाद्या ठिकाणी गड असो किंवा धार्मिक स्थळ, ठराविक ड्रेसकोड लावणे किंवा कुठलीही बंधने घालणं योग्य ठरत असेल तर ते प्रशासनातर्फे योग्य पद्धतीने नियम बनवून लावावेत. त्याची अंमलबजावणी देखील प्रशासनच करेल आणि लोकांना त्याची पूर्वकल्पना सुद्धा राहील.
या विषयावर पूर्वी एका
या विषयावर पूर्वी एका धाग्यावर जे लिहीले होते तेच कॉपी करतोय. ते आजही लागू आहे.
पण यावरून नेहमीच्या यशस्वी कलाकारांचे जे बॅशिंग झाले त्यांचा इथे काही संबंध नाही. इथले कलाकार वेगळे आहेत. मला पूर्वी अनेक माहीत होते. खूप कट्टर असतात - अशा अर्थाने, की जी कामे करतात त्यात झोकून देउन करतात. दिवसरात्र गडावर जाउन बसतात. अनेक चांगली कामे करतात, जी सरकारनेच करायला हवीत. यातले अनेकजण एरव्ही "खाणारे" असतात. पण कोठे आणि कधी खायचे यांचे त्यांचे कट्टर लॉजिक असते, आणि ते इतरांनीही फॉलो करावे असा त्यांचा हट्ट असतो. यांना कंट्रोल मधे ठेवले नाही तर यांची न्यूसन्स व्हॅल्यू प्रचंड असते. पण हे केवळ गुंड टाइप नसतात. वैयक्तिकरीत्या नॉर्मल, शिकणारी, नोकरी करणारी मुलेच असतात बरीचशी. फक्त इतिहास, शिवराय/संभाजी, गड किल्ले यांचे ऑब्सेशन असते. तेथे अनेक चांगली कामे करतात, पण त्यातूनच एक "ओनरशिप" वाटते त्यांना व त्यातून ते असले काहीतरी चमत्कारिक निर्णय घेतात व त्याचा सर्वसामान्य लोकांना त्रास होउ शकतो. तसेच यातील बहुतेकांना कोणतेही व्यक्तिस्वातंत्र, स्त्रीस्वातंत्र्य वगैरेंचे वावडे असते. किंवा समजतच नाही (अनेक तेवढे वयाने मोठेही नसतात समजण्याइतके). "नाही म्हणजे नाही. विषय संपला" टाइप असतात हे. याबाबतीत कट्टर/हौशी पण घटनेची सुद्धा नीट माहिती नसलेले देशप्रेमी असतात त्याचीच ही जरा वेगळी आवृती.
याबाबतीत कट्टर/हौशी पण घटनेची
याबाबतीत कट्टर/हौशी पण घटनेची सुद्धा नीट माहिती नसलेले देशप्रेमी असतात त्याचीच ही जरा वेगळी आवृती.>>
"प्रत्येक गोष्टीला स्थळ-काळाचे बंधन असते" हा विचार शाळांमधे खरं तर अधिक फोड करुन "प्रत्येक गोष्टीला स्थळ+काळाचे बंधन असते" असा शिकवला जायला हवा इतका या मार्गदर्शक तत्त्वातील 'काळ' या शब्दाचा मतितार्थ दुर्लक्षीला गेला आहे.
मला असे वाटते की पर्यटन स्थळे
मला असे वाटते की पर्यटन स्थळे व ज्या महापुरुषांशी ती स्थळे निगडित आहेत ह्या दोहोंना वेगळे ठेवले गेले पाहिजे.
त्या महापुरुषांच्या वा वंदनीय महिलांच्या स्थानाचा पूर्ण आदर ठेवला जाईल व ते स्थळ सोडून इतर भाग हा सहल रंजक करण्यासाठी सहाय्यकारक ठरावा.
अगदी प्रामाणिकपणे किंवा जरासे धीटपणे लिहायचे म्हंटले तर:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदराखातर कोणीच सिंहगड, राजगड, तोरणा, रायगड येथे जात नाही.
पाऊस, पावसाळी हवा, वारा, संस्मरणीय निसर्गाचा अनुभव ह्यासाठी लोक तिथे जातात.
आदर प्रदर्शित करण्याची स्थाने सुशोभित, संरक्षित ठेवून इतर भाग हा लोकांना सहलीचे वातावरण अनुभवण्यासाठी मोकळा ठेवावा.
मुख्य म्हणजे असल्या नियमावल्या ह्या शासनाकडून आल्या तरच पाळल्या जायला हव्यात. उगाच कोणीही महाराजांच्या नावाचा धाक दाखवून काहीही नियम लागू करू पाहत असेल तर पहिले त्यांचाच घाटातील नाक्यावरचा प्रवेश बंद करावा.
इथे ओशाळला विवेक
इथे ओशाळला विवेक
हे मुलींच्या ड्रेसकोडवरुन जे
हे मुलींच्या ड्रेसकोडवरुन जे प्रतिगामित्व दाखवलं जातय ते जास्त भयानक आहे. कुठे मागे मागे चाललाय तुम्ही?
महाराजांना मानणारे कोट्यवधी
महाराजांना मानणारे कोट्यवधी लोक आहेत. त्यांचा आणि या गडकिल्लेवाल्यांचा काहीही संबंध नाही. मारहाण करणारे भाबडे बिनडोक हिंसक लोक आहेत ही भलावण होऊ शकते. मुळात त्यांच्या मागे कुणी झुरळछाप मिशीवाला आहे का हे बघितलं पाहीजे.
महाराष्ट्राची दोन मानस दैवतं आहेत. एक पंढरपूरचं तर दुसरं म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज.
पंढरपूरच्या दैवताबद्दल ज्या मंडळींना आकस आहे, भागवत धर्माबाबत आकस आहे त्यांनी मग दुसर्या दैवताकडे मोर्चा वळवला. त्यावर मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी पोवाडे, गडकिल्ले या माध्यमातून घुसखोरी झाली आणि लोकांना आपण महाराजांचे काही तरी करतोय असे भासवून त्यांना आपल्या अजेण्ड्यावर नेले जात आहे. नव्याने धर्मांतरित झालेला मुसलमान हा मुल्ला पैक्षा जास्त कट्टर असतो असे म्हणतात. तसेच या संघटनेत सामील झालेले मग शाबासकीसाठी जास्त कट्टर असल्याचे दाखवतात.
आठ वर्षाच्या मुलीची बर्म्युडा खटकणे हे त्याचेच लक्षण आहे. गड किल्ले मोहीमा आखणार्यांपासून सावध राहण्याची गरज आहे,
सिंहगड परीसरात पर्यटकांचा उपद्रव असतो हे ही नाकारता येत नाही. मुलं मुली या भागात झाडी झुडपात किंवा बॅकवॉटरच्या बाजूला खडकावर बसतात. त्यांच्या चाळ्यांमुले स्थानिक नाराज असतात. या नाराजीचा फायदा कुणी कसा उचलला हे बघण्यात आहे. गळ्यात भगवे गमछे घातलेले लोक आधी पाट्या घेऊन उभे रहायचे. कधी पर्यावरण, कधी पावित्र्य राखा असे. एकदा रस्ता बंद केला होता. पोलीस येणार्या जाणार्या वाहनांना खेकसत होते.
त्या वेळी कचरा होतो असे कारण होते.
त्यानंतर पंधरा दिवसात इथे काम करणार्या एका निवृत्त कर्नलने पुढाकार घेऊन विक्रेत्यांना एक एक कचर्यासाठी ड्रम दिला. ग्राहकांना यातच कचरा टाका हे सांगायला सांगितले. आता दोन्हीही ठिकाणी लोक कचरा त्यातच टाकतात. व्यवस्था लावून दिली, सोय निर्माण केली कि स्वच्छता होते. लोकांना फटकावून नाही.
हे मुलींच्या ड्रेसकोडवरुन जे
हे मुलींच्या ड्रेसकोडवरुन जे प्रतिगामित्व दाखवलं जातय ते जास्त भयानक आहे. कुठे मागे मागे चाललाय तुम्ही?>>> कुठल्या विचारसरणीच्या लोकांना तुम्ही हात पाय पसरायला दिले आहेत आणि त्यांच्या या आधीच्या कृत्यांकडे जाणीवपुर्वक काणाडोळा करून त्यांना सोकावायला दिले आहे, याची कल्पना पिढ्यानपिढ्या आपल्या मनात एक विवक्षित असुरक्षिततेची ठिणगी जिवंत ठेवणार्यांना तोवर येणार नाही जोवर या ठिणगीवरच्या सुखावणाऱ्या फुंकरी चे परिणाम त्यांना स्वतःलाच होरपळवत नाहीत.
तो क्या एक हिंदू अपना ड्रेस
तो क्या एक हिंदू अपना ड्रेस कोड भी नही लगा सकता?
आमच्या मंदिराचं पावित्र्य जप ण्याचा प्रयत्न करणार्या आमच्या धर्मबंधूंबद्दल इथले दिमागी नक्षल जे बरळताहेत, मागे गुरुतुल्य आदर्णीय संभाजी भिडे यांनी एका महिला चायबिस्कुट कुत्रकारीला नुसतं टिकली लावून ये असं पितृभावाने सांगितलं त्यावरून त्यांना फुरोगाम्यांनी ट्रोल केलं. नो बिंदी नो बिझिनेस म्हणणार्या सौभाग्यवती शेफालीताई वैद्यजींना लिंब्रांडूंनी गलिच्छ शिव्या दिल्या , हे पाहून एक हिंदू म्हणून माझी घुसमट होते आहे.
सिंहगडावर पर्यटकासाठी जाताना
सिंहगडावर पर्यटकासाठी जाताना आता पाळावे लागणार नियम, अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
https://zeenews.india.com/marathi/maharashtra/tourists-visiting-sinhagad...
आरोपी विशाळगड प्रकरणात पण
आरोपी विशाळगड प्रकरणात पण सहभागी?
https://www.youtube.com/watch?v=BvYuaaa2OKc
पण गडकिल्ल्यांवरच का, संपूर्ण
पण गडकिल्ल्यांवरच का, संपूर्ण भारत हीच पुण्यभूमी आहे! युगानुयुगं जिथे वारंवार
धर्माला ग्लानी येते, आणि ती आल्यावरस्वयं श्रीकृष्ण अवतार घेतात असा भूभाग! संतांचा देश! तिथे कुठल्याच स्त्रीने कुठल्याच वयात कुठल्याच कारणाने कधीच अंगभर कपडे आणि कपाळभर कुंकवाशिवाय वावरता कामा नये. मुळात त्यांना स्वयंपाकघराबाहेर पाऊल टाकायची मुभा फक्त बाळंतिणीच्या खोलीत जाण्यापुरतीच असावी. आठ वर्षांची होईपर्यंत मुलगी आईवडिलांबरोबर का राहात होती, तिचं एखाद्या जख्ख म्हातार्याशी लग्न का लावून दिलेलं नव्हतं, याचाही तपास व्हावा. त्यासाठी वेगळी मारहाण करावी.फाविदडि आणि भरत +१
फाविदडि आणि भरत +१
मुलींकडून ठसठशीत कुंकू, सौभाग्यालंकार, अंगभर कपडे, डोईवर पदर घेण्याची अपेक्षा केली तर त्यात नक्की काय गैर आहे? आणि हे पाळलं जातय का नाही हे बघण्याची तिच्या वडिलांची जबाबदारी आहे की नाही?
आपल्या रीतीरिवाज परंपरांचा आपण आदर ठेवला नाही तर आपण असेच नामशेष होणार! उत्तिष्ठत जाग्रत!
दर्ग्यात डोकं न झाकता, पाय उघडे टाकुन जाऊन दाखवा. हे गड किल्ले आमच्या छत्रपतींचे मंदीरच आहे. त्याचा मान हा राखला गेलाच पाहिजे. हुकमावरुन!!!
ग्रेमा!
(No subject)
अमित, स्वाती तुमचे प्रतिसाद
अमित, स्वाती तुमचे प्रतिसाद वाचून बरं वाटलं. नाहीतर फार एकटं वाटत होतं.
भरत
भरत

घुसमटायची एवढी मोठी संधी आम्ही कशी घालवू?! हो की नाही, अमित?
त्यासाठी वेगळी मारहाण करावी.>
त्यासाठी वेगळी मारहाण करावी.>>> देवा
शरम वाटते ह्या असल्या बातम्या वाचून..शी ..८ वर्षाच्या मुलीने काय घालावे हे ठरवतोय समाज..
शिवाय दुसरीकडे मायनर्स वर अ त्याचार वाढत चाललेत.. परत मुलींचे गर्भ निदान्/हत्या कडे वळतोय का काय समाज!
गौतमी पाटील आणि अन्य काही
गौतमी पाटील आणि अन्य काही नर्तकींचे कार्यक्रम ठेवण्याआधी आता आयोजकांना शासनाकडून प्रमाणपत्र घ्यावे लागणार. त्यासाठी आयोजकांना शासनाच्या नियम व अटींचे पालन करणार असल्याचे शपथपत्र द्यावे लागणार आहे. यात प्रामुख्याने सदर न्रुत्याच्या कार्यक्रमामुळे संस्क्रुतीला धक्का पोहोचणार नाही, अश्लीलता नसेल व कुणाच्याही भावना
चाळवल्यादुखावल्या जाणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असे मान्य करायचे आहे. जर या नियम व अटींचा भंग झाला तर आयोजकांना तुरूंगाची हवा खावी लागेल व जबरी दंड सोसावा लागेल.सन्माननीय नृत्यांगना श्रीमती
सन्माननीय नृत्यांगना श्रीमती गौतमी पाटील ह्यांच्या प्रतिभा-प्रदर्शन सोहळ्यात असंख्यवेळा हाणामाऱ्या झाल्या आहेत. त्या आयोजकांच्या हाताबाहेर गेल्या आहेत. नेत्रसुखद कलाविष्काराची अनुभूती घेणाऱ्यांच्या शुभहस्ते एखादा मुडदा पडू नये ह्या काळजीस्तव असे काही करण्यात आले असू शकेल.
त्या गळाभेटी असतात. नवख्या
त्या गळाभेटी असतात. नवख्या माणसाला हाणामारी वाटत असेल.
सिंहगडावर जायला बुकींग करावे
सिंहगडावर जायला बुकींग करावे लागणार आहे का?
https://www.mypunepulse.com/pune-now-visit-sinhagad-fort-only-with-mobil...
माझा उपाय सोपा आहे. एकही गाडी
माझा उपाय सोपा आहे. एकही गाडी पायथ्यापासून वर सोडायची नाही. ना दुचाकी ना चारचाकी. महाराज, निसर्ग आणि गडकिल्ले प्रेम असेल तर चालत जा. झक मारत 80 टक्के जनता येणारच नाही.
Sharadg, हे म्हणजे हात दुखतोय
Sharadg, हे म्हणजे हात दुखतोय म्हणून हात तोडून टाकण्यासारखे आहे. सार्वजनिक गोष्टींचा , स्थळांचा नीट उपयोग करायला शिकवणे हे जास्त चांगले आहे माझ्या मते.
त्या छोट्या मुलीच्या कपड्यांबाबत जे काही झाले ते पटले नाहीच अजिबात कारण एकतर तो तिचा आणि ती लहान आहे म्हणून तिच्या पालकांचा प्रश्न आहे. आणि जेट युगात उगा बैलगाडीने जाण्याचा अट्टाहास का हवा ? जग कुठे जातंय आणि आपण कुठे जातोय ?
Pages