(आंतरराष्ट्रीय राजकारण असा विषय दिलेला नाही. त्यामुळे राजकारण हा विषय सिलेक्ट करावा लागला आहे.)
"चीन कि लांल आंखों मे आंख डालकर देखने कि जरूरत है."
"ये नया भारत है, घर मे घुसकर मारता है."
ही वाक्यं ऐकल्याला खूप काळ नसेल लोटला. कदाचित सत्तापरिवर्तन झाल्यानंतर अनेक लोक विसरून गेले असतील. पण काही जणांनी ही वाक्यं कोरून ठेवली असतील.
अधून मधून पाकिस्तानमधे हल्ले केल्यानंतर यह नया भारत है चा गजर ऐकू आला. यावरच खूष होणारी जनता आहे. मात्र जसा चीनचा विषय येतो , त्या वेळी सगळीकडे सामसूम असते. एक भयाण शांतता जाणवू लागते.
अरूणाचल प्रदेश मधे चीनने घुसखोरी केल्याच्या बातम्या येत आहेत. त्या अर्थातच सरकारच्या आधीच समर्थक नाकारत आहेत. या बातम्या अरूणाचल मधल्या सिटीझन फोरमने सरकारला पाठवलेल्या अहवालावर येत आहेत. त्यामुळं नाकारायचं काय आणि स्विकारायचं काय हा गहन प्रश्न आहे. युट्यूब इन्फ्युएंसर्सचे दावे इथे देणार नाही. कारण ते प्रसिद्धीसाठी आहेत म्हणून फेटाळले जात आहेत. किंवा ते चीनच्या फंडींगवर असे व्हिडीओज बनवत आहेत किंवा विरोधी पक्षांची चाल आहे असे म्हणून ते खारिज केले जाऊ शकतात. अर्थात कमेण्ट मधे कुणाला त्यावर चर्चा करायची तर ना नाही.
प्रत्यक्षात चीनचा वेढा केव्हढा भयकारी आहे त्याची कल्पना भारतातल्या जनतेला आहे काय? याकडे आपण शेवटच्या भागात जाऊयात. सुरूवातीला या विषयावर (अरूणाचल) खबरगावच्या रिपोर्ताजबद्द्ल बोलूयात. लिंक शेवटी देण्यात येईल, मजकूर स्वरूपात या रिपोर्टचा संक्षिप्त सारांश इथे. टायमिंग सुद्धा देत आहे.
१. अरूणाचल प्रदेशा व भूतानमधे घुसखोरी : मुद्दा,वस्तुस्थिती व वास्तव
LAC ची अस्पष्टता : भारत आणि चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) जमिनीवर चिन्हांकित केलेली नाही. यामुळे दोन्ही देशांचे सीमेबाबतचे दावे वेगळे आहेत आणि दोन्ही सैन्यांचे गस्त घालण्याचे भाग एकमेकांवर ओव्हरलॅप होतात.
सलामी स्लायसिंग : चीन युद्धाऐवजी सलामी स्लायसिंग धोरणाचा वापर करतो. म्हणजे हळूहळू, टप्प्याटप्प्याने मोकळ्या किंवा बिगर सैनिकी भागात (ग्रे झोन्स) रस्ते, पूल आणि 'झांगनान' (दक्षिण तिबेट) नावाखाली नागरी गावे (Siaoshan villages) उभारून ताबा निश्चित करणे. गावाकडे बांध हळूहळू सरकवत नेतात तसं. काही वर्षांनी बांध आपल्या शेतात खूप अलिकडं आल्याचं दिसतं तसंच आहे हे. याला सलामी स्लायसिंग म्हणतात. इंच इंच सरकण्याचा काही वर्षात शेकडो किलोमीटर सीमेवर मोठा परिणाम होत असतो.
बफर झोन आणि पेट्रोलिंग हक्क : २०२० च्या लडाख (गलवान) संघर्षानंतर अनेक ठिकाणी बफर झोन तयार करण्यात आले, ज्यामुळे भारतीय सैन्याच्या पारंपारिक गस्त घालण्याच्या काही पॉईंट्सवर मर्यादा आल्या आहेत.
भारतीय पायाभूत सुविधांमधील वाढ,"भारतानेही अलिकडच्या वर्षांत बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन द्वारे अतिशय वेगाने सीमावर्ती रस्ते, बोगदे (उदा. सेला टनेल) आणि फॉरवर्ड एअरबेस विकसित केले आहेत. सेला टनेल वर प्रतिसादात बोलूयात.
हे खबरगावच्या व्हिडीओचे सार आहे. या फॅक्टस आहेत. या व्हिडीओच्या निमित्ताने अन्य गोष्टीवर चर्चा होणे आवश्यक आहे.
२. गांभीर्य
चीनचा उपद्रव खरा आहे: चीन सातत्याने अरुणाचल प्रदेश व भूतानच्या सीमेवर पायाभूत सुविधा उभारून भारतीय सीमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारचा दृष्टिकोन हा नेहमी संशयास्पद असतो. सरकार किंवा लष्कर रणनीतिक कारणांमुळे सीमेवरील सर्व लहान-मोठ्या चकमकी किंवा तात्पुरती घुसखोरी जाहीरपणे स्वीकारत नाही; त्याला दृष्टीकोनातील फरक म्हटले जाते.
भूतानची हतबलता: भूतान स्वतःचे रक्षण लष्करीदृष्ट्या करू शकत नसल्याने आणि चीनच्या आक्रमक धोरणामुळे भारतावरील आपले पूर्ण अवलंबित्व कमी करून चीनशी सीमा प्रश्न निकाली काढण्याच्या प्रयत्नात आहे. भूतानला स्वतःचे सैन्य ठेवता येत नाही. असा करार ब्रिटीशांच्या काळात झालेला आहे. पण भूतानमधे चीनने घुसखोरी दोन ठिकाणी केली आहे. हे सयामी स्लायसिंग आज प्रचंड झालेले आहे. भारताने भूतानचे रक्षण न केल्याने भूतान आता भारताचे अवलंबित्व नको असे म्हणत आहे. मनमोहनसिंगच्या काळात या दृष्टीने पावले पडली होती. आता मात्र भूतान चीनशी राजनैतिक करार करण्याच्या मनःस्थितीत आहे.
याचे गांभीर्य भारतातल्या जनतेला ठाऊक आहे का
हा करार कसा असेल हे आता सांगता येत नाही. पण जर भूतान चीनच्या कह्यात गेला तर भूतान चिकन नेकला लागून आहे. भूतानमुळे चिकन नेक सुरक्षित आहे.
३. भूतानशिवाय अन्य संवेदनशील शेजारी देशातलीचीनची घुसखोरी आणि उपस्थिती व तिचे गांभीर्य
भारत, त्याचे शेजारी देश आणि आपल्या मुख्य भूप्रदेशाशी निगडित चिनी विस्तारवाद व हस्तक्षेपाचे स्वरूप केवळ अरुणाचल किंवा भूतानपुरते मर्यादित नसून संपूर्ण भारतीय उपखंडाला वेढणारे आहे.
चीन थेट 'लष्करी घुसखोरी आणि हळूवारपणे प्रभाव पाडणारी सामरिक घेराबंदी या दोन्ही धोरणांचा वापर करतो.
१. ब्रह्मदेश (म्यानमार) आणि पूर्वोत्तर भारताची सुरक्षा
म्यानमारमध्ये चीनची थेट सीमावर्ती जमीन हडपण्याची हालचाल नसली, तरी तिथे चीनचा हस्तक्षेप भारताच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे:
चीन-म्यानमार आर्थिक कॉरिडॉर (CMEC): चीनने म्यानमारच्या 'क्यॉकफ्यू' (Kyaukphyu) बंदरापर्यंत रस्ते व रेल्वेचे जाळे उभारले आहे. यामुळे चीनला थेट बंगालच्या उपसागरात प्रवेश मिळाला आहे, जो भारताच्या सागरी सुरक्षेसाठी मोठा धक्का आहे.
बंडखोर संघटनांना खतपाणी: ईशान्य भारतातील (नागालँड, मणिपूर, आसाम) अनेक बंडखोर गट म्यानमारच्या सीमेवरील घनदाट जंगलात आश्रय घेतात. म्यानमारमधील चिनी प्रभाव असलेल्या स्थानिक सशस्त्र गटांचा (उदा. UWSA) वापर करून या बंडखोरांना चिनी बनावटीची शस्त्रे पुरवली जातात, ज्यामुळे मणिपूर आणि पूर्वोत्तर भारतात अशांतता टिकून राहते. म्यानमारच्या सीमा भारताच्या पूर्वेत्तर राज्यांना भिडतात. त्यामुळे हा गंभीर धोका आहे.
कोको आयलंड्स : अंदमान आणि निकोबार बेटांच्या अगदी जवळ असलेल्या म्यानमारच्या 'कोको आयलंड्स'वर चीनने गुप्तचर/राडार स्टेशन आणि हवाई पट्टी विकसित केल्याचा संशय भारतीय यंत्रणांना आहे.
२. अक्साई चीन - भारताचा बळकावलेला भाग
अक्साई चीन हा लडाखचा आणि ऐतिहासिकदृष्ट्या भारताचा भाग आहे, ज्यावर चीनने १९५० च्या दशकात अनधिकृत कब्जा केला आणि १९६२ च्या युद्धानंतर तो पूर्णपणे स्वतःच्या नियंत्रणात ठेवला. हा सामरिक महत्वाचा भाग तिबेट आणि शिनजियांग (Xinjiang) या चीनच्या दोन संवेदनशील प्रांतांना जोडतो.
चीनने अक्साई चीनमधून थेट नॅशनल हायवे २१९ हा महामार्ग बांधला आहे.
सध्याची स्थिती: २०२० च्या गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चीनने अक्साई चीनमध्ये भूमिगत बंकर्स, पक्की लष्करी ठाणी, क्षेपणास्त्र प्रणाली आणि थेट लष्करी हवाई तळ (उदा. होतान, रुतोग) वेगाने उभारले आहेत.
३. पाकव्याप्त काश्मीर (PoK) आणि चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) मधील चिनी उपस्थिती
पाकव्याप्त काश्मीर (PoK) हा भारताचा कायदेशीर भाग आहे, ज्यावर पाकिस्तानने बेकायदेशीर ताबा मिळवला आहे. मात्र, तिथे चीनची लष्करी व आर्थिक उपस्थिती भारताच्या सार्वभौमत्वाला थेट आव्हान देते:
CPEC (चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर): ६० अब्ज डॉलरचा हा प्रकल्प थेट गिलगिट-बाल्टिस्तान (PoK) मधून जातो. भारताचा मुख्य विरोध हाच आहे की, भारताच्या दाव्याच्या प्रदेशातून भारताची परवानगी न घेता चीनने हा रस्ता बांधला आहे.
शक्सगाम खोरे : १९६३ मध्ये पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील ५,१८० चौ. किमीचा'शक्सगाम खोरे हा भारतीय भूभाग चीनला बेकायदेशीरपणे भेट म्हणून दिला. तिथे आता चीनने पक्के रस्ते बांधले आहेत.
सैन्याची उपस्थिती: CPEC प्रकल्पांच्या सुरक्षेच्या नावाखाली PoK मध्ये चिनी पीएलएचे सैनिक, इंजिनिअर्स आणि 'प्रायव्हेट सिक्युरिटी कंपन्या तैनात आहेत. यामुळे लडाखच्या सीमेवर भारत एकाच वेळी पाकिस्तान आणि चीन या दोन्ही आव्हानांना तोंड देतो.
४. इतर शेजारी देशांमधील चिनी वेढा

याला String of Pearls असे नाव आहे. भारत या विरोधात डायमंड नेकलेसचा प्लान बनवत होता, मात्र इराण युद्धानंतर अमेरिकेने चाबहारमधे तो उद्ध्वस्त केला आहे. सध्या भारतासोबत ना अमेरिका आहे, ना चीन ना रशिया. इस्त्राएलशी दोस्ती केल्याने अरब जगात संशय आहे.
एक एक देश आणि चिनी घुसखोरी / हस्तक्षेपाचे स्वरूप या पद्धतीने पुढे जाऊयात.
श्रीलंका : कर्जाच्या जाळ्यात अडकवून हंबनटोटा बंदर ९९ वर्षांच्या लीजवर घेतले. तिथे चिनी हेरगिरी जहाजे येऊन थांबतात.
नेपाळ : नेपाळच्या उत्तरेकडील सीमाभागांत (उदा. हुम्ला जिल्हा) चीनने अतिक्रमण केल्याचे दावे झाले आहेत. तसेच नेपाळमधील पायाभूत सुविधा आणि राजकारणात चीनचा प्रभाव वाढला आहे. याशिवाय नेपाळमधे चीनला अनुकूल सत्ताधारी येत जा त आहेत. नेपाळमधे भारतविरोधी जनमत वाढत आहे. यामागे चीन असल्याच्या वार्ता येत असतात.
मालदीव: मालदीवमधील राजकीय समीकरणांचा वापर करून तिथून भारतीय लष्करी तुकड्यांना बाहेर काढणे आणि चिनी संशोधन जहाजांना किनारपट्टीवर प्रवेश मिळवणे. या घटना ताज्या आहेत.
थोडक्यात , , चीन भारताला केवळ जमिनी सीमेवर नाही, तर सागरी सीमेवर (String of Pearls) आणि राजकीय व सामरिकदृष्ट्या सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करत आहे. अक्साई चीन आणि PoK मधील चिनी उपस्थिती ही या दीर्घकालीन रणनीतीचाच भाग आहे.
५. नकाशे
भारताची सुरक्षा, चीनचा दबाव आणि भौगोलिक संदर्भांची अचूक कल्पना येण्यासाठी हे नकाशे आणि त्यांची भौगोलिक रचना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे:
१. भूतान, डोकलाम आणि चिकन नेक (सिलीगुडी कॉरिडॉर)
भारताची सुरक्षा, चीनचा दबाव आणि भौगोलिक संदर्भांची अचूक कल्पना येण्यासाठी हे नकाशे आणि त्यांची भौगोलिक रचना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे:
भूतान आणि डोकलामचे स्थान: या चिकन नेकच्या अगदी उत्तरेला भूतान आणि तिबेट/चीनची सीमा (डोकलाम पठार) आहे.
जर चीनने डोकलाम किंवा भूतानच्या दक्षिण-पश्चिम भागात रस्ता/सैन्य पुढे आणले, तर ते थेट या 'चिकन नेकवर तोफांचा किंवा क्षेपणास्त्रांचा मारा करू शकतात. ही पट्टी कापली गेल्यास उर्वरित भारताचा ईशान्येकडील ८ राज्यांशी म्हणजे अरुणाचल, आसाम, नागालँड इ. असलेला मुख्य भूमार्गाचा संपर्क पूर्णपणे तुटू शकतो.
२. म्यानमार आणि ईशान्य (पूर्वोत्तर) भारताची घेराबंदी

नकाशाची रचना: म्यानमारची सीमा भारताच्या चार पूर्वोत्तर राज्यांना (मिझोरम, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश) लागून आहे.
क्यॉकफ्यू बंदर : म्यानमारच्या पश्चिमेला बंगालच्या उपसागरात हे बंदर आहे. चीनने शिनजियांग/युन्नान प्रांतापासून थेट क्यॉकफ्यू बंदरापर्यंत महामार्ग व पाईपलाईन (CMEC) बांधली आहे. यामुळे चीनला थेट बंगालच्या उपसागरात (भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ) सागरी मार्ग मिळाला आहे. याशिवाय म्यानमारमधील सीमावर्ती भागातून पूर्वोत्तर भारतातील बंडखोर संघटनांना (उदा. मणिपूर/नागालँडमधील गट) शस्त्रास्त्रांची रसद पुरवणे सोपे जाते, ज्यामुळे पूर्वोत्तर भारत अशांत राहू शकतो.
३. 'स्ट्रिंग ऑफ पर्ल्स' आणि हंबनटोटा बंदर (श्रीलंका)
नकाशाची रचना: भारताच्या दक्षिणेला हिंद महासागरात श्रीलंका वसलेला आहे. श्रीलंकेच्या अगदी दक्षिणेकडील टोकावर हंबनटोटा बंदर आहे. कर्जाच्या जाळ्यात अडकवून चीनने हे बंदर ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेतले आहे. चीनचे हेरगिरी जहाजे आणि पाणबुड्या इथे येऊन थांबतात, ज्यामुळे संपूर्ण दक्षिण भारत आणि हिंदी महासागरातील भारतीय नौदलाच्या हालचालींवर चीनला बारकाईने लक्ष ठेवता येते.
४. सेला टनेल (अरुणाचल प्रदेश)
नकाशाची रचना: अरुणाचल प्रदेशच्या पश्चिमेकडील भागात तवांग जिल्हा आहे, जो चीनच्या सीमेला LACला लागून आहे. गुवाहाटी/तेजपूरकडून तवांगकडे जाताना मध्ये अतिउंच सेला पास लागतो. या पासच्या खाली सेला टनेल बांधल्यामुळे हिवाळ्यातील बर्फवृष्टीचा अडथळा दूर झाला आहे आणि भारतीय सैन्य तेजपूरवरून थेट तवांगच्या सीमेपर्यंत काही तासांत पोहोचू शकते.
(वरील नकाशा कार्डमध्ये सिलीगुडी कॉरिडॉर, हंबनटोटा बंदर, सेला पास आणि क्यॉकफ्यू या सर्व महत्त्वाच्या स्थानांचे भौगोलिक स्थान तुम्ही थेट पाहू शकता.)
संदर्भ :
१. https://www.facebook.com/reel/27110198131945378
२. खबरगांव https://www.youtube.com/watch?v=FpcbwUu6UCA
३. गुगल मॅप्स
छान माहितीपूर्ण लेख आहे.
छान माहितीपूर्ण लेख आहे.
नरवणे यांच्या पुस्तकाला प्रसिद्ध करण्याची परवानगी का मिळत नाही? अनेक तास शांत राहिल्यावर “ उचित समझे वो करो…” असा आदेश? फार गंभीर बाब आहे.
चीन बांगलादेश हे दोन देश जवळ येत आहे.
चीनला धडकी भरवणारं हेच ते
चीनला धडकी भरवणारं हेच ते भाषण
https://www.youtube.com/watch?v=OESZXKbNsDs
https://youtu.be/UeJHtCfx-g0?t=256
चीनच्या कारवायांबद्दल पीएमना
चीनच्या कारवायांबद्दल पीएमना खडे बोल सुनावणारा हा धाडसी ईसम कोण?
https://www.youtube.com/watch?v=d27wNOnF-Tg
लाल आंखेhttps://www.youtube
लाल आंखे
https://www.youtube.com/shorts/rx-IKKd0jDo
डूब मरो
https://www.youtube.com/shorts/RDOx2T1bQ1g
नन्तर लिहितो.
नन्तर लिहितो.
या धाग्याशी अवांतर : विषय चीन
या धाग्याशी अवांतर : विषय चीन आणि तिबेटचा आहे.
मित्रांनो,
चीनने तिबेटवर कब्जा केला आहे हे सर्वांना ठाऊक आहे. दलाई लामांनंतर त्यांचा वारस कोण होईल हे ठरवण्याची प्रोसेस असते तिला गोल्डन चाईल्ड म्हणतात. चीनने या प्रक्रियेला आक्षेप घेतला आहे. चीनची कम्युनिस्ट पार्टीच गोल्डन चाईल्ड शोधेल, ते ज्याला पकडून आणतील तेच नेक्स्ट दलाई लामा असतील असे चीनचे म्हणणे. या नवीन सरकारी लामांना चीन नियम आणि शर्ती मान्य करायला लावणार आहे.
या विरोधात तिबेटच्या धर्मशाला निर्वासित संस्थेने जागतिक समुदायाकडे मदत मागितलेली आहे.
https://savetibet.org/why-tibet/
अमेरिकेने तिबेटच्या संदर्भात US Senate Tibet Bill 2026 हा नवीन कायदा बनवला आहे/ बनत आहे. या कायद्यान्वये चीनला तिबेटबाबत एकतर्फी निर्णय घेता येणार नाही, तिबेटचे लोकच निर्णय घेतील.
जर तिबेटच्या नागरिकांबद्दल संवेदना व्यक्त करायच्या असतील तर वरच्या संंकेतस्थळाला भेट द्या. १६ ऑगस्ट रोजी कदाचित तिबेटी लोकांना पाथिंबा देण्यासाठी सोशल मीडीयावर नेटकरी मोहीम चालवण्याची शक्यता आहे. अशा संभाव्य मोहीमेत सहभागी होऊयात.
श्रीलंका सरकारने हंबनटोटा
श्रीलंका सरकारने हंबनटोटा बंदराच्या विकसासाठी आगोदर भारत सरकारकडे विनंती केली होती पण आपण ती नाकारली आणि मग लंका चीन कडे गेली आणि चीन ने ती संधी नकाराली,आणि सध्या हंबनटोटाचीन कडे आहे.
एवढंच नाही तर जेंव्हा Commonwealth Heads of Government च्या मिटिंग साठी तेंव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी श्रीलंकेला भेट नकाराली का तर देशातील तामिळ राजकारण.
पण 2017 आणि 2024 साली लंकेने जाफना आणि कोलोम्बो येथील पोर्टचं काम भरातला देऊन थोडाफार समतोल साधला आहे.
लंके मध्ये जे आर्थिक संकट आलेल त्यावेळी भारताने Neighbourhood First धोरणनानुसार मदत केलेली, त्यात करन्सी swap, औषधंचा पुरवठा, कर्ज परत फेडीला सवलत इत्यादी बरीच मदत केलेली. श्रीलंकेचे तत्कालीन पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनी सार्वजनिकरीत्या विधान केलं होत की, "भारताने संकटकाळात दिलेल्या मदतीमुळेच श्रीलंका पूर्णपणे कोलमडण्यापासून वाचला.
बांगलादेश : शेख हसीनाचा अवामी लीग सत्तेत असला की भारताला प्राधान्य आणि BNP सत्तेत असला की भारत विरोध हेच बंगलादेशाचं राजकारण आहे. ह्याला धार्मिक अँगल पण आहे. 2024 साली अवामी लीग सत्ते बाहेर गेला की फक्त भारत विरोधच वाढला नाही तर हिंदू विरोधही वाढला. हा भारत विरोध कुठं पर्यंत वाढतोय त्यावर बरच काही अवलंबून आहे. कारण पूर्वी (2001 - 2006) BNP सत्तेत असताना आपल्या फुटीरतावाद्याना आश्रय धायचं धोरण अवलंवलं होत.बांगलादेशांत सत्तेत कोणी का असेना तेथील जनतेचा कल मात्र भारत विरोधीच असणार हे नक्की.
चांदणेबुवा. आपण नया भारतात
चांदणेबुवा. आपण नया भारतात नाहीत का?
Commonwealth Heads of Government च्या मिटिंग साठी तेंव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी श्रीलंकेला भेट नकाराली का तर देशातील तामिळ राजकारण. >> हे जुन्या भारतातले आहे. आणि जुन्या भारतात झालेल्या या घटनेच्या वेळी भारतीय जनता पक्षानेही श्रीलंकेत उपस्थित राहण्याला विरोध केला होता. या वेळी भाजपसोबत डीएमके आणि एआइडीमके दोन्ही पक्ष नव्हते. त्यांना खूष करण्यासाठी भाजपने विरोध केला होता.
त्याच जुन्या भारतात (घर मे घुसकर न मारनेवाला, लाल आंखो मे आंखे डालकर नदेखनेवाला_) परदेशात गुंतवणुकीचे धोरण नव्हते. खासगी उद्योगांची गुंतवणूक सुरू झाली होती, पण ती स्वतःच्या बळावर. म्हणजे टाटाने एक कंपनी खरेदी केली अशा स्वरूपात.
हंबनटोटा बंदर हे जाफनापासून दूर आणि जहाजांची वाहतूक नसलेल्या ठिकाणी होते. या ठिकाणी पैसा गुंतवल्यास नुकसान दिसत होते. त्यामुळे जाफना किंवा अन्य बंदरांबाबत चर्चा चालू होत्या. श्रीलंकेने अनपेक्षितपणे चीनकडून कर्ज घेतले. हंबनटोटा बंदर नुकसानीत गेल्याने चीनने ते ९९ वर्षांच्या कराराने घेतले.
या जुन्या भारतातल्या गोष्टी इथे उगाळून काय मिळणार?
त्या वेळचे पंतप्रधान उठ म्हटले कि उठत. बस म्हटले कि बसत. ते मौनी होते. चीनला घाबरत होते. हे आपण कैक वेळा ऐकून ते पाठ झालेले आहे कि नाही? म्हणूनच आपण नव्या भारतासाठी नवे नेतृत्व निवडून दिले कि नाही? आता तरीही जुन्याच भारतात का रमायचेय?
राज - मोँगला पोर्ट वर पण
राज - मोँगला पोर्ट वर पण लिहा. आधी भारतासोबत करार झाला होता, आता पोर्टलगतच्या स्पेशल इकॉनॉमिक झोनचा विकास करण्याची जबाबदारी चीन कम्पनीकडे दिली आहे. हे पोर्ट कोलकतापासून १८८ किमी अंतरावर आहे , सीमे पासून केवळ ८० किमी.
भारताकडे येणारा प्रकल्प चीनने आपल्याकडे खेचला .
https://youtu.be/ut4oez8acjw
https://youtu.be/fdbKtV2dInk
घ्या. तुम्ही इथे उठता बसता
घ्या. तुम्ही इथे उठता बसता कार्य करिता बांग्ला देशींच्या नावाने बोंबलणार , बांग्लादेशींना हाकलायला सी ए ए - एन आर सी आणणार , तुमच्या निवडणूक प्रचारात बांग्ला देशी म्हणून बोंबलणार आणि बांग्लादेशींना तुमच्याबद्दल प्रेम वाटलं पाहिजे होय?
बरं त्या शेख हसीना घुसखोर आहेत की नाहीत? त्यांना कधी परत पाठवणार? भारतीय करदात्यांच्या पैशावर त्यांना का पोसायचं?
निखिल नाज या क्रीडा पत्रकाराने बांग्लादेशने ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्रिकेटचा कसोटी सामना पहिल्यांदा जिंकला, त्याबद्दल लिहिताना भारताला आणि बांग्लादेशला किती सामने खेळावे लागले अशी तुलना केली तर त्याला शिव्या पडल्या ( दिमागी नक्षल झाला का तो?)
रात्रीच्या चांदण्यात चीन कुठे दिसत नाही. मोदींचं चीनशी कुठून कुठून नातं आहे आणि क्षीशी केम्सिट्री आहे. म्हणून की कॉय?
तसंच त्या प्रतिसादात मी भाजपचा समर्थक नाही, हे लिहायचं राहिलं की कॉय?
तुमचा प्रॉब्लेम हा आहे की
तुमचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही नेहमी काँग्रेस भाजप, मोदी गांधी ह्या मोड मध्ये राहता.
हो. मी मुखवटे वापरत नाही.
हो. मी मुखवटे वापरत नाही.
मोदींनी दिमागी नक्षल म्हटलेच
मोदींनी दिमागी नक्षल म्हटलेच नाही.
माओइसम चीनचा, चिनी लोक नूडल्स खातात, म्हणुन चीनला उद्देशून The Maggi Naxal म्हटले. हा चीनला दिलेला स्पष्ट इशारा आहे,चीनचे धाबे दणाणले आहे.
The Maggi Naxal >>>
The Maggi Naxal >>>
मानव
मानव
मानव
मानव
मानव
मानव
(No subject)
मानव २१ तोफांची सलामी
मानव २१ तोफांची सलामी स्वीकारा.
दि मॅगी नक्षल.
मानव, ओह्ह पन !!
मानव, ओह्ह पन !!
बेस्ट वर्ड प्ले!
ज्याxx हागणारा राहिला बाजूला
ज्याxx हागणारा राहिला बाजूला धुणारा दोषी ??
लेखकाच्या नावाला साजेस लेखन
या सगळया माहितीची आणि हल्लीच्या म्हणजेच 2013 नंतर चिनी कब्ज्याच्या नोंदीची ( सरकार दरबारी नोंद, चीन च्याही चालेल ) महिती लिंक द्या
संघटीत स्वस्त नशा, अंधभक्ती,
संघटीत स्वस्त नशा, अंधभक्ती, गंडलेल्या लॉजिकसह असंबद्ध लोडेड प्रश्न यामुळे आयडीचा एक्सरे रिपोर्ट तयार होत असतो. तो रुसून बसलेल्या ओरिजिनलशी जुळला कि ट्रीटमेंट सुरू करता येते.
अरेरे ! काय ही भाषा? अशाने
अरेरे ! काय ही भाषा? अशाने आपल्या लाडक्या पंतप्रधानांना आणखी एक कल्चरल शॉक बसेल ना? त्यांच्या या वयात त्यांना वरचेवर असे शॉक देणं चांगलं का?
मोदींचे माजी मंत्री आणि भारताचे माजी गृहसचिव आर पी सिंग काय म्हणतात पहा
https://theprint.in/politics/how-many-patrol-points-has-india-given-up-t...
Former Union Minister R.K.Singh asked the Modi government to clarify which posts, besides Shera Point 5 in Arunachal Pradesh’s Taksing area, the Chinese army has occupied, preventing Indian troops from accessing them.
In a video made in Hindi and posted Thursday on X, Singh sought these details from Prime Minister Narendra Modi and Defence Minister Rajnath Singh, stating that it could not have been done without the PM’s approval.
“are there other patrolling points which were given up by this government.”
“Patrolling points which were being patrolled, where our patrols used to go before 2014?”
And this also gives a message about how pusillanimous, I will call it, this government is—that it can’t stand up for even its claims, even the claim of the country. Let the government come clean on this issue. And let the government come clean on how many patrolling points they have abandoned since 2014.”
*Pusillanimous means showing a weak and cowardly fear
आपले लेजर आइज एस जयशंकर यांनी सांगितलं "Look, they are the bigger economy. What am I going to do? As a smaller economy, am I going to pick up a fight with the bigger economy? It is not a question of being reactionary, it's a question of common sense
तिकडे बावळट इराण जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेशी पंगा घेतो.
<< तिकडे बावळट इराण जगातली
<< तिकडे बावळट इराण जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेशी पंगा घेतो. >>
----- मस्त सहा महिने झाले महासत्तेला सळो का पळो करुन सोडले आहे.
भाषेत कुठेही नरमाई नाही. अपेक्षित असलेले सत्तांतर राहिले बाजूला. आज सहा महिन्यानंतर (आधी मोकळी असलेली ) होर्मुझ समुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठीच्या क्लिष्ट अटी समोर ठेवत आहे. इराणाच्या अस्तित्वाची लढाई आहे, आणि महासत्तेला जेरीला आणले आहे, याला पंगा म्हणता येत नाही.
एवढं चांगल मेहनती ने लिहिलेलं
एवढं चांगल मेहनती ने लिहिलेलं अभ्यासपूर्ण लिखाण कोणता तरी अजेंडा सेट करण्यासाठी गाढवाच्या गाडीत भरलात वरती
"संघटीत स्वस्त नशा, अंधभक्ती, गंडलेल्या लॉजिकसह असंबद्ध लोडेड प्रश्न यामुळे आयडीचा एक्सरे रिपोर्ट तयार होत असतो. तो रुसून बसलेल्या ओरिजिनलशी जुळला कि ट्रीटमेंट सुरू करता येते." अशी बालिश धमकी ? पुन्हा नावाला साजेस वर्तन! तुम्ही लिंक द्या हो treatment च बघु पुढे
तुझ्या गाडीत इथेनॉल चालतंय
तुझ्या गाडीत इथेनॉल चालतंय ना? मग ओरिजिनल आयडीने ये.
राज - अनाहूत सल्ला. तुम्ही
राज - अनाहूत सल्ला. तुम्ही विषय अगदी छान प्रकारे मांडलेला आहे. वाद नाही.
मुद्द्यांचा प्रतिवाद करता येत नसेल तर विषय दुसरीकडे वळविणे या मोडस ऑपरेंडीला बळी पडू नका.
होय.
होय.
ही भाषा चालवून घेतली गेली याचं वैषम्य आहे.