१९८० पासून राम मंदिर प्रश्न आपल्या सर्वांच्याच कानावर सतत पडत असतो. राम मंदिर विषय निघाल्यावर संबंधित घटनाक्रम ( १९८६ कुलूप उघडणे, रथयात्रा, दंगली, ढाचा पाडणे, अनेक दंगली, रक्तपांत, मंदिराचे निर्माण कार्य, भूमीपूजन, जोशांत उद्घाटन) माझ्या डोळ्यासमोर येतो. मंदिर निर्माण होण्याच्या अगोदरच्या काळांत, अनेक दशके, देणग्या गोळा करण्याचे काम सातत्याने सुरु होते, आणि पुढेही ते सुरुच रहाणार आहे.
आज वर्षाला ५ कोटी ते २० कोटी लोक भेटी देत आहेत. प्रत्येक भक्त आपल्या आर्थिक कुवती नुसार मंदिराच्या दानपेटीत भक्तीभावाने, श्रद्धेने आणि मुख्य म्हणजे विश्वासाने पैसे दान करत असतो. या पैशांचा विनीयोग मंदिराशी संबंधीत कामासाठीच होत असतो अशी श्रद्धा असते, भरवसा असतो. रामाच्या नावाने गोळा होत असलेल्या दानपेटी वर व्यक्त झालेला हा फार मोठा विश्वास आहे.
राममंदिर दानपेटी मधे होत असलेल्या गैर व्यावहारा संबंधीच्या बातम्यांनी माझे लक्ष वेधले गेले. या आधी सोने आणि चांदीच्या विटांबद्दल बातमी आली होती. दानपेटीमधे जमा होत असलेल्या पैशांपैकी ( रोख पैसा, सोने, चांदी, हिरे, जडजवाहीर, माणिक, मोती) काही भाग मंदिर कर्मचार्यांच्या खासगी खिशांत जात असेल तर हा कोट्यावधी राम भक्तांचा फार मोठा विश्वासघांत आहे.
या संबंधांत आठ लोकांवर FIR दाखल करण्यांत आला आहे. सुरवातीला ट्रस्टच्या लोकांनी आर्थिक गैरव्यावहार झाल्याचे नकारले होते. पण अखिलेश यादव यांच्या ट्विट ने लक्ष देण्यास भाग पाडले.
https://x.com/yadavakhilesh/status/2063567792733831463
FIR मधे नावे असणारे आरोपी - अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, रामशंकर मिश्रा, रमाशंकर यादव, मनीष यादव, सुभाषचंद्र श्रीवास्तव आणि करुणेश पांडे. पैकी सहा आरोपी मंदिरातील कर्मचारी असून ते रोख रक्कम मोजण्याचे काम करायचे.
पैसे अपहाराचे फुटेज CCTV मधे कैद झाले आहे. या प्रकरणाची माहिती असलेली अनेक लोक भितीपोटी बोलत नाही. कधी पासून हे अपहार प्रकरण सुरु होते ? एकंदर किती कोटी रुपये हडप झाले ? हा पैसा कुठे गेला ? या प्रश्नांची उत्तरे यथावकाश मिळतील आणि खर्या दोषींना कायद्यानुसार कडक शिक्षा मिळेल अशी अपेक्षा. पण दानपेट्या भक्त लोकांचा गमावलेला विश्वास पुन्हा संपादन करतील का ?
गेले काही आठवडे अपहार संबंधित बातम्यांनी मला अस्वस्थ केले आहे. या विषयावर आपली मते जाणून घ्यायला आवडेल.
ज्या मुद्द्यावरून देशाचे
ज्या मुद्द्यावरून देशाचे वातावरण गढूळ झाले, ज्यावरून देशात मोठ्या कष्टाने रूजवलेले एकमेकांच्या धर्माप्रती सहीष्णुतेचे वातावरण नष्ट झाले, त्यावरून बांधलेल्या राममंदीरात भ्रष्टाचार झाला या भावना व्यक्त करायला शब्दच नाहीत.
अक्षरशः मूठभर लोक आहेत ज्यांना लोक एकमेकांच्या धर्माचा आदर करून गुण्यागोविंदाने राहतात हे आवडत नव्हते. सिनेमात दाखवलेले एखादे चांगले मुस्लीम पात्र, त्यामागचा उदार दृष्टीकोण ज्यांना हास्यास्पद वाटत आले आहे, त्यामागची कारणे उघड आहेत. त्याऐवजी द्वेष दाखवलेला यांना आवडतो. कारण प्रत्यक्ष अशा द्वेषाच्या उघड संघटनात सामील असो किंवा त्याचे बाहेरून सुरक्षित अंतरावरून समर्थन असो, यांच्या ड्डोक्यात विष भिनलेले आहे. हा द्वेषाचा सनातन डीएनए आहे त्यांना गंगाजमना तहजीब हास्यास्पद वाटते. अशा लोकांकडे राममंदीर मुद्द्यावरून सत्ता मिळाली. कितीतरी सामान्य लोक अयोध्येत शहीद झाले. पण ट्रस्टवर ना कुणी ओबीसी, ना आदिवासी घेतलेत. सगळे उच्चजातीचे लोक घेतले. तर मग हा सर्व खटाटोप सामान्य जनतेने का केला?
फक्त भ्रष्टाचारापुरतेच बघावे तर ही वरवरची मलमपट्टी होईल. या आंदोलनाने मंडलवादी कमंडलवादी झाले. पण त्यांच्या हातात कमंडल सुद्धा आले नाही. अशा बोगस आंदोलनात जीव देऊन त्यांना काय मिळालं याचा विचार होत असेल तरच अशा मंथनाला अर्थ आहे.
https://www.youtube.com/watch?v=oau6esRlLy4
नाहीतर हा पक्षांतर्गत चेकमेटचा मामला बनून राहील. पंतप्रधान पदाच्या रेस मधून या आधी पूर्ती घोटाळा बाहेर काढून गडकरींना बाहेर काढले होते. सीडी बाहेर काढून संजय जोशींना बाहेर काढले होते. निवडणुकीत पाडून जेटलींचा गेम झाला होता. आता या घोटाळ्याने योगी आदित्यनाथ यांना केंद्रात येण्याचा रस्ता अवघड होईल. कदाचित उत्तर प्रदेशचे राज्य संघाच्या दुसर्या खेळाडूकडे म्हणजे अरविंद केजरीवालकडे दिला जाईल. शेवटी घोटाळ्ञाचे मास्टरमाईंड तसेच राहतील. फक्त त्या वरवरच्या प्रश्नाकडे पाहिले तर हेच होत राहील.
दुर्दैवाची गोष्ट ही कि राममंदीर ट्रस्टवरच्या नेमणुकांबाबत बसप, सप, काँग्रेस, राष्ट्रीय लोकदल, जाट महापंचायत, अखिल भारतीय किसान दल, खाप पंचायती यापैकी कुणीही आवाज उठवला नाही. हे जास्त उद्वेगजनक आहे.
म्हणजे घोटाळे पण तेव्हांच बाहेर येतील जेव्हां भाजपमधे अंतर्गत लाथाळ्या होतील.
हे बदलणे केवळ अशक्य आहे. आपण
हे बदलणे केवळ अशक्य आहे. आपण आपले पैसे कुठे देतोय हे लोकांना समजत नसेल तर सगळाच आनंद!
लोक दानपेटीत पैसे आणि सोनं टाकणं बंद करतील तशी ताबडतोब चोरी थांबेल. धंदा आहे हा, हा कसा बंद होईल?
ज्यांचे पैसे गेले त्यांना अक्कल नाही आणि त्याचं काही वाटत नाही. इथे लिहिणाऱ्या पैकी कोणी तिकडे पैसे देत नसेल असं हे त्रांगडं आहे.
एक प्रश्न विचारतो. कोणीही
एक प्रश्न विचारतो. कोणीही उत्तर द्या. बेसिक प्रश्न वाटेल पण मी हे प्रकरण डिटेल मध्ये वाचले नाही.
तर प्रश्न असा की यात जो घोटाळा झाला आहे तो फक्त लोकांनी दान केलेल्या पैशांचा झाला आहे की टॅक्सपेयरचा पैसा किंवा राष्ट्रीय संपत्तीची देखील चोरी झाली आहे.
मागे एक जण मला म्हणाला की तू तर नास्तिक आहेस. कधी कुठल्याच मंदिरात जात नाहीस आणि तिथल्या पेटीत पैसे टाकत नाहीस तर तुला काय पडले आहे. आमचे आम्ही बघून घेऊ
प्रत्यक्षात मी देवधर्मावर खर्च करत नसलो तरी आमच्या घरी मी सोडून इतर सर्व धार्मिक जनता आहे. आणि कमावणारा मी एकटाच असल्याने टेक्निकली देवाच्या पेटीत माझ्याच खिशातले पैसे जातात. पण ज्यांना समजूनच घ्यायचे नसते त्यांना हे कुठे समजावत बसू.. म्हणून वरचा प्रश्न विचारला आहे. तसे असेल तर नास्तिक असलो तरी एक भारतीय नागरिक म्हणून या चोरीवर काही बोलायचा हक्क राहील.
मंदिर दानपेटी मधे सरासरी ५००
मंदिर दानपेटी मधे सरासरी ५०० - १००० रु धरले तर वर्षाला १० ते २० हजार कोटी रु सहज जमा होत असावेत. अनेक देशभक्त NRI लोकांच्या लिस्ट मधे अयोध्या भेट आवर्जून असतेच. मोठे अर्थकरण आहे.
https://www.youtube.com/watch?v=d4myxayUXjE&list=PLbi6MdGKgCAfwC-fh4FHOw...
या आधी जमिन खरेदी - विक्री प्रकारांत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले आहेत. २ कोटी रु किमतीची जमिन काही मिनीटांत १८ कोटी रु विकल्या गेली. रातोरात काही लोक करोडपती झाले आहेत.
गझनीचा मुहम्मद, अल्लाउद्दिन खिलजी यांनी मंदिरे लुटली होती असे इतिहासांत वाचले होते. आता रामाच्या नावाने या नाही त्या प्रकारे लुटणारे हे तर आपल्याच परिवारांतले लोक आहेत.
ऋन्मेऽऽष - भारतीय आयकर
ऋन्मेऽऽष - भारतीय आयकर खात्याच्या Section no. 80 G नुसार देणगीच्या ५० % रक्कमेवर टॅक्स लागणार नाही ( कमाल मर्यादा काय आहे हे माहित नाही). देणगी रक्कम २००० रु रोख पेक्षा जास्त असेल तर कर सवलती साठी पात्र नाही.
https://www.incometaxindia.gov.in/documents/20117/6507196/Notification_2...
जेव्हा एखादी व्यक्ती कर सवलत घेत आहे तेव्हा अप्रत्यक्षपणे प्रत्येक भारतीय व्यक्तीचे त्या कार्यासाठी ( अप्रत्यक्ष) योगदान असतेच.
मंदिरांत विश्वासाने दिलेल्या देणगी मधे अपहार होत असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने आवाज उठवायलाच हवा. टिप्पणी करण्यासाठी देणगी दिलेली असणे हा क्रायटेरिया नको. राम मंदिर उभारणीसाठी सार्या भारतीयांनी किंमत मोजली आहे. रामाचे नाव तोंडात घेत झालेला रक्तपात, टोकाचा धार्मिक द्वेष माझ्या पिढीने पाहिलेला आहे आणि त्याची चांगली / वाईट फळे पुढेही भोगणार आहोतच.
<<< जेव्हा एखादी व्यक्ती कर
<<< जेव्हा एखादी व्यक्ती कर सवलत घेत आहे तेव्हा अप्रत्यक्षपणे प्रत्येक भारतीय व्यक्तीचे त्या कार्यासाठी ( अप्रत्यक्ष) योगदान असतेच.
>>>>
ओके. हा मुद्दा टेक्निकली योग्य आहे.
बाबरी पडल्यावर उसळलेल्या धार्मिक दंगली ही देखील मंदिरासाठी देशाने मोजलेली किंमत आहे असा विचार कधी केला नव्हता.
आपल्या देशात जाती धर्म भाषिक अस्मिता अश्या गोष्टींचे राजकारण कमी अधिक प्रमाणात प्रत्येक पक्षाने केले आहे. पण त्या दंगली फार वाईट प्रकार होता. कोवळ्या वयात फार जवळून पाहिल्या आहेत.
नुकतेच एका भाजप समर्थकाने मला म्हटलेले की हे कॉकरोच पार्टी आणि जेन झी देशात अराजक माजवत आहेत तेव्हाही उत्तरादाखल मी त्या दंगलीची आठवण काढली होती. निवडणुकीचा एक मुद्दा मिळवायला जे केले ते अराजक माजवणे होते.
अर्थात जे 90 च्या दशकात झाले त्यावरून मी या सरकारला जबाबदार ठरवत कधी नावे ठेवत बसलो नाही.
पण त्याच मंदिरात आज जर घोटाळा होत असेल तर मात्र हा मुद्दाही लागू आहे. या कारणास्तव सुद्धा मला किंवा कोणालाही बोलायचा हक्क आहे.
आणखी एक भावनिक मुद्दा...
आणखी एक भावनिक मुद्दा...
गँग रेप/ रेपिस्ट विरुद्ध आंदोलन करायला स्वतः किंवा जवळचे कोणी व्हिक्टीम असायची गरज नसते. तसेच..
गेल्या सहा ते आठ वर्षात
गेल्या सहा ते आठ वर्षात अयोध्या, वाराणसी, प्रयागराज, हरिव्दार, ऋषिकेश, कतरा, सोमनाथ ( मी एवढाच ठिकाणी गेलो होतो ) येथे आमूलाग्र बदल झाला आहे. आणि हे बदल सोपे नव्हते. एकदा तिकडे गेले की समजून येईल.. फक मंदिर, त्याच्या परिसर नाहीतर पूर्ण शहर परिसर बसडेपो, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट बदलेले आहे. कारणे अनेक आहेत, शहरांचे सुसज्जीकरण, यात्रीकरांचे नियोजन, जीडीपी वाढवणे..
विरोधी पक्षाचे लोक दुःखी (नकाश्रू) झालेले दिसत आहे, याच्यात किती लोकांनी राममंदिर होण्यासाठी कारसेवक झालेले होते, देव जाणे. ते सोडू द्या.. किती लोकांनी राममंदिरात किंवा इतर देवस्थानांत जाऊन आले, ते सांगा.
मी हरिव्दारला श्रीमानसा देवीच्या मंदिरात गेलो होतो.. तिकडे मुख्य मंदिरा शिवाय खूप खाजगी मंदिरे होती आणि त्या मंदिरातील लोक भक्तांना दान करायला सांगायचे.. अजून एक.. मुख्य मंदिरात दानपेटीच नव्हती.. पुजाराच्या हातात पैसे द्या... आपल्या पेक्षा खूप भारतीय भाविक आहेत त्यामुळे या सर्व मंदिरात किंवा गुरुव्दार, मस्जिद, चर्च मध्ये दान जमत असणारच.. आणि त्याचा काही अंशी चोरी होतच असणार..
माणूस प्राणी हा सगळीकडे सारखाच... तो परिस्थितीनुसार वागतो... हे पूर्णपणे चुकीचे आहे आणि मला वाटत ही परिस्थिती सुधारले. इतक्या वर्षात आता बदल सुरु झालेले आहेत.. आणि ते पुढे नक्कीच परिपक्व होतील...
एखाद्याने खून केला असेल तरच
एखाद्याने खून केला असेल तरच त्याला खूनाच्या केसवर बोलायचा अधिकार असतो का?
>>>गेल्या सहा ते आठ वर्षात
>>>गेल्या सहा ते आठ वर्षात अयोध्या, वाराणसी, प्रयागराज, हरिव्दार, ऋषिकेश, कतरा, सोमनाथ ( मी एवढाच ठिकाणी गेलो होतो ) येथे आमूलाग्र बदल झाला आहे. आणि हे बदल सोपे नव्हते. एकदा तिकडे गेले की समजून येईल.. फक मंदिर, त्याच्या परिसर नाहीतर पूर्ण शहर परिसर बसडेपो, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट बदलेले आहे. कारणे अनेक आहेत, शहरांचे सुसज्जीकरण, यात्रीकरांचे नियोजन, जीडीपी वाढवणे..>>> भपका आणि व्यावसायिकीकरण, नितीशून्य विकास म्हणजे आमूलाग्र बदल का?
शहराचे सिमेंटीकरण, जागोजागी लुटालूट आणि बकालपणा, या शहरीकरणात झालेला भ्र्ष्टाचार, आमच्या नाशिकचेच उदाहरण देतो ... पुढील वर्षी येणार्^या कुंभमेळ्याच्या नावाने काढलेल्या टेंडर मधून २०% परस्पर लाच... याला तुम्ही आमूलाग्र बदल म्हणता का आणि हो काँग्रेसचे किंवा अन्य कोणत्याही पक्षाचे उदाहरण देत whataboutery करू नका....
या बातमीवर कुणी बोलू नये याची
या बातमीवर कुणी बोलू नये याची यादी दिली तर बरं होईल.

नाशिकचेच उदाहरण देतो ...
नाशिकचेच उदाहरण देतो ... पुढील वर्षी येणार्^या कुंभमेळ्याच्या नावाने काढलेल्या टेंडर मधून २०% परस्पर लाच..>> भष्टाचार ही समाजाला लागलेली मोठी कीड आहे.. जोपर्यंत प्रत्येकजण स्वतः नेहमीच्या व्यवहारात यात हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत ही सिस्टीम बदलणार नाही. सरकार प्रयत्न करतच असते पण तेवढ पुरेसे नाही. काही ठिकाणी फरक दिसत आहे.
भपका आणि व्यावसायिकीकरण, नितीशून्य विकास म्हणजे आमूलाग्र बदल का >> हे बदल प्रत्येकाला आवडणार नाही आणि आवडेल असा अट्टाहास नाही. पण, नक्कीच यात नियोजन आहे कारण मानांकित कंपनीने ही कामे केलेली आहे.
दिव्य विचार आहेत.
दिव्य विचार आहेत.
मग भाजपने इतरांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करू नये. इतर पक्षांना निधी कुठून आला हे विचारू नये, कारण भाजप्ये इतर पक्षांना निधी देत नाहीत.
माझे हे माझेच आणि तुझे तेही
माझे हे माझेच आणि तुझे तेही माझेच असा तोरा गाजवणाऱ्याना CJP, अयोध्याची जागा, बिहार मधील प्रशांत किशोरचे जिंकणे असे ठळक मुद्दे अजून त्वेषाने त्यांच्या चाणक्य नीतीवर काम करायला भाग पाडतात, कारण ह्यांना देवाशी (राम मंदिर), विदयार्थी (NEET). खेळाडू (ब्रिजभूषण) यांच्याशी काहीही घेणे देणे नाही.
अंधभक्तांच्या लक्षात एक गोष्ट येत नाही ते गेल्या ७० वर्षात विविध क्षेत्रात पाया रचला नसता तर आज जगात ज्या कुठल्या स्थानावर भारत देश आहे, तो काही गेल्या १२ वर्षात पोहोचला नाही, कदाचित खालीच आला असेल.
उत्तर प्रदेशातील चित्रकूट
उत्तर प्रदेशातील चित्रकूट परिसरात घडलेले हे मंदिर चोरीचे प्रकरण अत्यंत धक्कादायक आणि अजब आहे, ज्याचा खुलासा पोलिसांनी एप्रिल २०२६ मध्ये केला. या संपूर्ण गुन्हेगारी रॅकेटचा मुख्य सूत्रधार विजय कुमार शुक्ला नावाचा गुन्हेगार होता, जो मूळचा चित्रकूटच्या राजापूरचा रहिवासी आहे. तो स्वतः दिवसभर रामनामाचा जप करत देशातील वेगवेगळ्या प्रतिष्ठित मंदिरांमध्ये जायचा आणि तेथील मौल्यवान मूर्ती, सोन्या-चांदीचे दागिने व मुकुट यांची पूर्ण रेकी करायचा.
सगळ्यात मज्जा म्हणजे, विजय शुक्ला हा स्वतःला धार्मिक मानत असल्याने त्याला भीती होती की जर त्याने स्वतः देवाच्या मूर्तीला हात लावून चोरी केली, तर त्याला 'पाप' लागेल. या देवाच्या पापापासून वाचण्यासाठी त्याने एक अनोखी युक्ती शोधली; त्याने मंदिरातील प्रत्यक्ष चोरी करण्यासाठी आणि मूर्तींचे मुकुट व दागिने हाताने ओरबाडून काढण्यासाठी बिजनौर येथील बाबर शाह नावाच्या एका मुस्लिम चोराला आपल्या टोळीत सामील केले होते. विजय शुक्ला केवळ चोरीचे प्लॅनिंग करायचा आणि प्रत्यक्ष मंदिरात घुसून मूर्ती विद्रूप करण्याचे किंवा दागिने काढण्याचे काम बाबर शाहकडून करून घ्यायचा.
हा भक्तीचा अनोखा संगम तर इतका बहारदार आहे की काय बोलावं यावर
धमाल म्हणजे पहिले बाबर पकडला गेला आणि लगेच कोल्हेकुई सुरू झाली आणि मग मास्टरमाइंड चे नाव आल्यावर दातखीळ बसली
गेल्या ७० वर्षात विविध
गेल्या ७० वर्षात विविध क्षेत्रात पाया रचला नसता>> हे वाक्य वाचून पुढे काय बोलावे....
दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र
दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करून मूळ मुद्दा झाकून टाकायचा ही पद्धत देशात अरविंद केजरीवाल आणि भाजपने रूढ केली.
इथे मुद्दा काय आहे?
१. लोकांच्या धार्मिक भावना चेतावून त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करून त्यांना स्वप्नं दाखवून देणग्या वसूल करायच्या आणि त्या पैशांचा अपहार करायचा.
२. या स्वप्नाच्या आडून लोकांच्या मनात धार्मिक विद्वेष भिनवायचा आणि त्यांच्यातल्या सहीष्णूतेची भावना नष्ट करायची. सहीष्णू असण्यावर सतत प्रश्नचिन्हं उपस्थित करायचं.
३. यातून देशात उफाळलेला प्रचंड हिंसाचार, दंगली , दहशतवाद ही किंमत मोजून बांधलेल्या मंदीरात शेवटी ज्यांच्या जिवावर हे मंदीर बनले त्यातल्या कुणालाही ट्रस्टमधे स्थान न देता फक्त ब्राह्मणांना आणि कायद्याच्या नाईलाजाने एका डमी दलिताला घेऊन मनमानी कारभाराने मंदीर चालवणे. हे मंदीर जर रामराज्याचे प्रतिक होते, हिंदू राष्ट्राचे प्रतिक होते तर त्यात समाजातल्या सर्व थरातले भक्त का नकोत? शेवटी हा ब्राह्मणांचाच धंदा झाला तर त्यांनी एकट्याच्या जिवावर लढा का नाही दिला?
४. या पार्श्वभूमीवर त्यात भ्रष्टाचार होतो. हे गंभीर नाही का?
यात विकासाचा मुद्दा कसा काय आणला? विकासावर वेगळा धागा काढा. त्याच्या आडून भ्रष्टाचार समर्थनीय कसा ठरतो? पब्लीकच्या पैशातून झालेला भ्रष्टाचार देणग्या कुणी दिल्या अन नाही दिल्या असल्या पांचट आणि फुटकळ मुद्द्यांनी झाकता येईल का?
हेरॉल्ड ग्रूप हा काँग्रेसचा अंतर्गत मामला आहे. भाजपने सुरूवातीलाच हेरॉल्ड ग्रुपमधल्या अपहार प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत. हा जर काँग्रेसचा अंतर्गत मामला असेल तर भाजपने गुन्हे का दाखल केले?
जरांडेश्वर सहकारी साखर कारखान्याप्रकरणी अजित पवारांवर गुन्हे दाखल झाले. वास्तविक हा सहकाराचा अंतर्गत मामला आहे. शेतकर्यांचा मामला आहे. भाजपाचा शेतकर्यांशी संबंध नाही. त्यामुळे त्यांनी या बाबतीत गुन्हे दाखल करायला नकोत.
बसपाचे कार्यकर्ते पक्षाला निधी देतात. त्यांना उद्योगपती देणग्या देत नाहीत. त्याचे ऑडीट करणे न करणे हा त्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे. त्यावरून भाजपाने ईडी आणि सिबीआयची चौकशी करण्याची गरज नाही.
अशी हजारो लाखो उदाहरणे आहेत ज्यात भाजप्ये कारवाई झाली म्हणून नाचत होते आणि आता नकाश्रू आहेत म्हणून भोकाड पसरू लागलेत.
राजू ७६ यांच्या लॉजिकप्रमाणे भाजपने केलेली ही कृती बेकायदेशीर आहे. कायदा कशाला म्हणतात, पब्लीकच्या निधीचा अपहार याचं लॉजिक कशाशी खातात याची त्यांना सुतराम कल्पना नसावी किंवा त्यांचा मेंदू फॉरमॅट झालेला असावा किंवा ते सोंग घेत असावेत. काहीही असो, विकृती आहे ही,
गेल्या ७० वर्षात विविध
गेल्या ७० वर्षात विविध क्षेत्रात पाया रचला नसता>> हे वाक्य वाचून पुढे काय बोलावे.... >>> अरे हो, देशाला स्वातंत्र्य २०१४ नंतर मिळाले आणि इसरो आणि इतर सगळे पायाभूत प्रकल्प २०१४ नंतरच उभारले गेले. त्यापूर्वी वेस्टर्न मीडिया दाखवतो त्याप्रमाणे भारतीय लोकं गळ्यात साप, रस्त्यावर गाई - म्हशी (तशा हल्ली पण सोडून दिलेल्या गाई दिसतात पण लक्षात कोण घेतो). फिरत होत्या. २०१४ नंतर एकदम जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे भारताचा वारू चौखूर उधळला की त्याला आवर घालायला ट्रम्पने १००% टॅरिफ लावायची धमकी देऊन प्रत्यक्षात आणली.
<कारण मानांकित कंपनीने ही
<कारण मानांकित कंपनीने ही कामे केलेली आहे> ज्यांनी भाजपला चंदा म्हणजे निवडणूक रोखे दिले अशा कंपन्यांनी का?
<भष्टाचार ही समाजाला लागलेली मोठी कीड आहे.. जोपर्यंत प्रत्येकजण स्वतः नेहमीच्या व्यवहारात यात हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत ही सिस्टीम बदलणार नाही. सरकार प्रयत्न करतच असते पण तेवढ पुरेसे नाही. काही ठिकाणी फरक दिसत आहे.> शेवटी भ्रष्टाचारासाठी जनताच जबाबदार. त्यामुळे राजकीय पक्षांचा नाइलाज होतो आणि ते लाडकी बहीण योजना आणि भ्रष्टाचाराला राजरोस मान्यता देतात. निवडणूक रोखे आहेतच.
विकासका मांच्या नावाखाली किती कट घेतला जातो?
धार्मिक स्थळांचे सुसज्जीकरण आणि जीडीपी वाढवणे - तिथे जे लहान व्यावसायिक काही दशके किंवा काही पिढ्या राहत होते, धंदा करत होते, त्यांना विस्थापित केलं. त्यांना त्या वेळच्या - दराने भ रपाई दिली गेली. त्या पैशांत त्यांना त्या भागांत नवा व्यवसाय सुरू करणे अशक्य आहे. म्हणजे फायदा कोणाचा? ज्यांच्याकडे ओतायला आधीच पैसा आहे. या लहान व्यावसायिकांना विकासात सहभाग का दिला नाही?
मुळात तीर्थक्षेत्र् देवळे आणि आधुनिकीकरण हा oxymoron नाही का? म्हणजे कपडे आधुनिक पण देह आणि मन पारंपरिक?
मला पडलेला प्रश्न -
मला पडलेला प्रश्न - भारतवारीत सगळीकडे ते डिजिटल पेमेंटचे एवढं ऐकले की बस्स! अजून तुम्ही कॅशच वापरता म्हणून बर्याच जणांनी हसूनही घेतले. मग राम मंदीरात दानपेटी ऐवजी ते QR code वाला sticker का नाही लावला? सगळा व्यवहार डिजीटल आणि पारदर्शक! दान पेटी उघडा, नोटा मोजा वगैरे भानगडच नाही.
हो! आमच्याकडे स्टोअर मधून
हो! आमच्याकडे स्टोअर मधून बाहेर पडताना कॅन्सर/ मुलांचे शिक्षण/ अंध किंवा इतर कुठल्या चॅरिटी साठी पैसे गोळा करतात तिकडे हल्ली टॅप करून पैसे देता येतात. कॅश कोणी ठेवत नाही त्यावर उपाय. गेल्यावर्षी ख्रिसमस परेड मध्ये फायरफायटर किड्स टॉय ड्राईव्हसाठी पण टॅप करता येईल असा पोल घेऊन फिरत होते. डिफॉल्ट १०डॉलर डोनेशनला तो सेट केलेला होता.
>>> भारतवारीत सगळीकडे ते
>>> भारतवारीत सगळीकडे ते डिजिटल पेमेंटचे एवढं ऐकले
पुढची मजा ऐकली नाही का? डिजिटल पेमेन्ट चुकतं झाल्यावर 'XXX रुपये अदा हुए, जय श्रीराम!' असा मेसेज ऐकला अनेक ठिकाणी.
मी आईस्क्रीम घेणार आणि पैसे देणार, यात श्रीराम कुठून आला? पण येतो.
ओह्ह! हे जय श्रीराम नाही ऐकलं
ओह्ह! हे जय श्रीराम नाही ऐकलं मी. पेटीएम पे क्ष्क्ष्क्ष रुपये अदा हुए इतकंच ऐकलं
योग्य ठिकाणी आईस्क्रीम नाही खाल्लं मी. अर्थात मी पेटीएम वापरत न्हवतोच. आजुबाजूच्या लोकांचंच सांगतोय.
राममंदिरात ठेवण्यासाठी
राममंदिरात ठेवण्यासाठी बनवलेले असे रेकॉर्डेड इंस्ट्रुमेंट त्यांनी विकत घेतले नाही म्हणुन इतरत्र विकली असतील.
पुढची मजा ऐकली नाही का?
पुढची मजा ऐकली नाही का? डिजिटल पेमेन्ट चुकतं झाल्यावर 'XXX रुपये अदा हुए, जय श्रीराम!' असा मेसेज ऐकला अनेक ठिकाणी.>>>>
हे अजुन कुठेही ऐकले नाही. जे मेसेज ऐकले ते सगळे एंग्रजीत होते.
हे मेसेज कस्टमाईज करता येतात. कोणी गुड डे करेल कोणी जय श्रीराम करेल. आणि हा मेसेज त्या दुकानदारासाठी असतो, तो कस्टमाईज करतो. कस्टमरला बँक एसेमेस पाठवते. त्यात जय श्रीराम किंवा गुड डे अजुन तरी वाचले नाही.
कावडिगा म्हणजे काय? कावड
कावडिगा म्हणजे काय? कावड कशाची असते?
ही प्रथा कुणी आणि कधी सुरू केली? श्रावणबाळाने आईवडिलांना कावडमधे बसवलं त्याचा संबंध आहे का?
ही यात्रा विश्वशांतीसाठी आहे का?
जय श्री राम मी सुद्धा ऐकले
जय श्री राम मी सुद्धा ऐकले नाही कुठे.
हिंदी, इंग्लिश आणि मराठी तिन्ही भाषेत ऐकले आहेत. पण कधी पैशाचे सोडून एकही अवांतर शब्द ऐकला नाही.
बाकी खाजगी दुकानात कोण काय मेसेज वाजवतात, गाणी लावतात, कुठल्या देवांचे फोटो लावतात, हा ज्याचा त्याचा प्रश्न.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=TF-ABsmuNRk
Paytm SoundBox - How to set Jai shree ram announcement in paytm sound box
मग राम मंदीरात दानपेटी ऐवजी
मग राम मंदीरात दानपेटी ऐवजी ते QR code वाला sticker का नाही लावला? सगळा व्यवहार डिजीटल आणि पारदर्शक! दान पेटी उघडा, नोटा मोजा वगैरे भानगडच नाही. >> यात पण घोटाळा आहे. काही लोक स्वतःचे QR कोड लावतात, पैसे परस्पर त्यांच्या खात्यात. मंदिरामध्ये काही स्पीकर नसतो पैसे मिळाले सांगणारा. आणि नाव अगदी त्या देवस्थानाशी जुळते ठेवतात, म्हणजे शंका देखील येणार नाही. उगाच पैसे लपवून छपवून बाहेर नेण्याची पण गरज नाही.
कावडिगा म्हणजे काय? कावड
कावडिगा म्हणजे काय? कावड कशाची असते?>> कावडीया यात्रा म्हणजे गंगेचे पाणी भरलेले कलश आप आपल्या गावी नेऊन गंगाजलाने शंकराच्या पिंडीला अभिषेक करणे. या प्रवासात ते कलश जमिनीवर ठेवायचे नसतात आणि विश्रांती घेत नाहीत, त्यामुळे बरेच जण यात सामील होतात ती कावड उचलण्याकरता. प्रचंड दहशत माजवली आहे या मंडळींनी. पोलीस पण हतबल असतात त्यांच्यासमोर इतकी यांची दहशत आहे. दरवर्षी काही नवीन नवीन उद्योग समोर येत असतात यांचे. आजच सकाळी लखनौ, उत्तर प्रदेश मध्ये एका स्कूल वॅन वर हल्ला चढवला आणि काचा तोडल्या. गाडीत काही मुली होत्या.
Pages