रखुमाईचा विठुराया

Submitted by अविकुमार on 25 July, 2026 - 15:50

टाळ-चिपळ्यांचा नाद, बघ आभाळा गेला
पांडुरंग-वारकरी, आज एकरूप झाला

मोहमायेचे रिंगण, लांघूनी या वारी आलो
तूच माय, बाप तूच, सखा तूच विठ्ठला

धावती पाउले धरूनी, मनी दर्शनाची आस
नामघोषि देवा तुझीया, हा रोम रोम न्हाला

चंद्रभागा वाळवंट, काठ शरयूचा भासे!
रखुमाईचा विठुराया, कौसल्येचा राम झाला..!

-अविनाश पेठकर
25 जुलै 2026

Group content visibility: 
Use group defaults