रूप कंवर – जिवंत जळाली, न्याय मात्र कधीच मिळाला नाही!
१९८७, राजस्थानातील देवराला गाव. १८ वर्षीय रूप कंवरचा पती माल सिंग यांचा लग्नाच्या आठ महिन्यांतच मृत्यू झाला. ४ सप्टेंबर १९८७ रोजी, तिला सोलह शृंगार करून पतीच्या जळत्या चितेवर बसवण्यात आले. अफूच्या नशेत असलेली, जळताना आरडाओरड करणारी ही मुलगी ‘जय सती माता’च्या गजरात बुडवली गेली, आणि हजारो लोक हा क्रूर प्रेक्षणीय प्रकार पाहत होते. घटनेनंतर देशभर आक्रोश उसळला; मुख्यमंत्री हरिदेव जोशी यांना राजीनामा द्यावा लागला, आणि केंद्र सरकारने ‘सती (प्रतिबंध) कायदा, १९८७’ लागू केला. पण न्याय काय? रूप कंवरचे वडील बलसिंग राठोड, ज्यांना बातमी वृत्तपत्रांतून कळली, ते घटनास्थळीच नव्हते आणि त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही – उलट काही अहवालांनुसार ते आयोजकांपैकी होते. प्रकरणी ४५ आरोपींपैकी २५ जण २००४ मध्ये, आणि उर्वरित ८ जण ऑक्टोबर २०२४ मध्ये ‘पुराव्याअभावी’ निर्दोष सुटले – याचा अर्थ एकालाही तुरुंगवास झाला नाही! आजही देवराला गावात तिचे मंदिर/स्मारक उभे आहे, तेथे दररोज पूजा होते, दरवर्षी लाखो भाविक ‘सती माता’ म्हणून तिला वंदन करतात, आणि २०२१ मध्ये राजस्थान सरकारने न्यायालयात म्हटले की हे धार्मिक स्थळ असल्याने ते पाडणे शक्य नाही. कायदा आहे, पण राजकारण, जातीय अभिमान आणि स्थानिक अर्थव्यवस्था या क्रूर प्रथेला जिवंत ठेवून आहेत. ही ‘श्रद्धा’ नसून १८ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या आहे – तिचा न्याय अजूनही प्रलंबित आहे.
सतीप्रथा अजूनही चालू आहे
सतीप्रथा अजूनही चालू आहे भारतात? नाही तर सती मंदिरे का आहेत? सरकार बंद का करत नाही? सती प्रथेचे पुनरिज्जीवन होईल का भविष्यात?
१९८७ मधे रुपकंवरची, अवघ्या १८
थोर समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांच्या अथक परिश्रमाने आणि त्यावेळचे ब्रिटिश GG विल्यम बेंटिंग यांच्या काळांत १८२९ मधेच कायद्याने प्रथा बंद झाली होती. तब्बल १५० वर्षानंतरही अशा घटना घडत रहातात हे लाजिरवाणे आहे.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला म्हणजे गाजलेले प्रकरण असावे पण याबद्दल काही माहीत नव्हते.
जुनी घटना आहे पण मंदीर आजही आहे आणि पूजले जाते हे वाचून खेद वाटला.
धार्मिक भावनिक मूर्खांची कमी नाही या देशात/जगात असे या बातम्या वाचून वाटते.
पण कदाचित काही लोकं वेगळ्याच जगात राहतात आणि आपण वेगळ्या असेही वाटते.
तरी कठोर कारवाई करून कायदे आणून अश्या विचारांना प्रतिबंध घालायलाच हवा नाहीतर हे पुढच्या पिढीत झिरपणार..
"सती प्रथा अशी काही नव्हती.
"सती प्रथा अशी काही नव्हती. काही तुरळक स्त्रिया स्वेच्छेने सती जात. राजा राम मोहन राय हे तेव्हाच्या डीप स्टेटचे हस्तक होते. हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी त्यांनी सती प्रथा आहे, खूप स्त्रियांना पतिनिधनानंतर जिवंत जाळतात असा कांगावा केला. हिंदूंना आपल्या धर्माबद्दल न्यूनगंड, अपराधभाव वाटावा यासाठी ब्रिटिशांनी सतीबंदीचा कायदा केला."
"मुगल , इस्लामी आक्रमकांपासून आपले रक्षण व्हावे यासाठी त्या सती जात."
आमच्या मालाड मध्ये सुद्धा राणी सती मंदिर आहे आणि तिथल्या रस्त्याला राणी सती मार्ग असे नाव आहे.
https://www.facebook.com/satibhavanmalad/
भरत ह्यांनी मांडलेली टिपिकल
भरत ह्यांनी मांडलेली टिपिकल मनगट वापरून नाक पुसणारी उजवी विचारधारा मंडळी वजा करता पण सती "प्रथा" म्हणून qualified होती का अन् किती होती ह्यावर विचार केला गेला पाहिजे.
राजा राममोहन रॉय ह्यांनी जेव्हा इतके उत्तुंग काम केले तेव्हा एकूण बंगाल सुभ्यात किंवा कंपनी शासनात तीनही प्रेसिडेन्सी मिळून किती वर्षात किती बायका सती गेल्या, त्यांचे सरासरी वय काय होते, त्या कुठल्या सामाजिक आर्थिक स्तरातील होत्या, कुठल्या जातीच्या होत्या ? ह्याचा काय डेटा कलेक्ट केला असेल तर तो कुठे वाचायला मिळेल ?
त्या वेळी अशिक्षित लोक
त्या वेळी अशिक्षित लोक डॉक्युमेंटेशन करत होते का?
हल्ली तर अस्पृश्यता नव्हतीच. पाणी मिळत नव्हते तर जिवंत कसे राहीले असे प्रश्न विचारले जातात. चवदार तळ्याचा लढा हा प्रपोगंडा आहे हे वाचले. तरी त्या वेळी हल्ला झाल्याने ब्रिटीशांच्या दरबारी नोंद आहे.
डॉक्युमेंतेशन केले नाही हा दोष कुणाचा असाही प्रश्न विचारला जाईल. लोकांना शिकण्याचा अधिकार नव्हता हा प्रश्नच येत नाही मग. कारण ते ही खोटं.
त्या वेळी अशिक्षित लोक
त्या वेळी अशिक्षित लोक डॉक्युमेंटेशन करत होते का?
नेटीव लोकांनी केले नाही डॉक्युमेंट, साहेब बहाद्दर कुंपणी सरकार तर प्रत्येक गोष्ट दस्तऐवज करतच असे की, इतकी भयानक प्रथा डॉक्युमेंट केली नसेल ? किंवा विल्यम बेंटिकने त्याच्या नोंदी निरीक्षणे राजा राममोहन रॉय ह्यांना शेअर केली नसतील ? किंबहुना बेंटिक किंवा तत्कालीन यंत्रणेने जर हे डॉक्युमेंटेशन केले नसते तर त्यांनी ही प्रथा आहे ती क्रूर आहे अन् ती सार्वत्रिक समाजात अक्रॉस कास्ट लाईन बोकाळलेली आहे/ नाही म्हणून आपण राजा राममोहन राय करतोय त्या प्रयत्नांना सरकारी पाठबळ दिले पाहिजे हे कसे ठरवले असेल ? छोट्यात छोट्या गोष्टींचे कागद करणे हे ब्रिटिश व्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण होते ना ? (तीच सवय आपल्या महान नोकरशाहीला अजून लागली आहे अन् ते समग्र नागरिकांच्या अवयवात शिरले आहे ते एक असो) . त्या शिवाय हा १८५७ पूर्वीचा काळ होता त्यामुळे ब्रिटिश भारतीयांच्या धार्मिक बाबींत दाबून लक्ष देत हे तर अध्याहृत आहेच.
हल्ली तर अस्पृश्यता नव्हतीच. पाणी मिळत नव्हते तर जिवंत कसे राहीले असे प्रश्न विचारले जातात. चवदार तळ्याचा लढा हा प्रपोगंडा आहे हे वाचले. तरी त्या वेळी हल्ला झाल्याने ब्रिटीशांच्या दरबारी नोंद आहे.
Social Media वर प्रत्येकाला व्यक्त व्हायचे असते, व्यक्त होणे नागवे होण्यासारखे असते, कोणी शी लागल्यासारखे कामापुरते होतात, कोणी नजाकतीने प्रणयाची पहिली रात असावे तसे, तर कोणी कामातूर श्वान असल्यागत social media वर striptease क्लब उघडतात ! तुम्ही म्हणता ते लोक कामातूर लोक असावेत तसे असतात, त्यात २००० च्या नंतर लीगल लॉजिकला तिलांजली मिळाली आहे अन् बायनरी लॉजिक (तेच ते 0 & 1) पुढे आले आहे, असे कैक बायनरी बंडू आपल्या कंडू शमनार्थ social media वर "पाणी नव्हते देत तर तहान कुठून भागवत" इत्यादी घेऊन कोलांट्या मारतात,
पण ते मेन्स्ट्रीम नसते त्यामुळे किमान तुम्ही सोयीस्कर मांडणी करायला हा सूर्य अन् हा जयद्रथ मोमेंटसाठी त्यांचा विदा घेणे काही पटत नाही. बाकी तुमची मर्जी, व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य.
डॉक्युमेंतेशन केले नाही हा दोष कुणाचा असाही प्रश्न विचारला जाईल. लोकांना शिकण्याचा अधिकार नव्हता हा प्रश्नच येत नाही मग. कारण ते ही खोटं.
हा टोटली वेगळा प्रश्न आहे अन् त्यातही स्पेक्युलेटीव टोन bearing आहे त्यामुळे ह्यावर परत कधीतरी निरुपण करतो !
जालावर बोलताना एक किमान आदर उपचार ठेवून बोलावे ह्यातून थोडा लांबच झाला आहे रिप्लाय पण बेअर विथ ईट
असेल किंवा नसेल वर काय बोलणार
असेल किंवा नसेल वर काय बोलणार?
आणि मर्जीचा इथे काय संबंध? तुम्हाला प्रतिसाद समजला आहे असं समजतो.
Exactly ! मला तुमचा प्रतिसाद
Exactly ! मला तुमचा प्रतिसाद समजला आहे. उर्फाट्या लॉजिकला मेन्स्ट्रीम केले जाऊ शकते तर माफक स्पेक्युलेशन ने काय घोडे मारले आहे. तरीही I cede you this point, चांगली चालना मिळाली डोक्यास, बघतो तत्कालीन भारतात किती डेटा सेट सापडतात झालेल्या सती प्रसंगांवर. त्यांचे ऑथेंटिकेशन अन् सबमिसिबिलिटी पुढे बघू !
ईस्ट इंडिया कंपनीने इ.स. १८१५
ईस्ट इंडिया कंपनीने इ.स. १८१५ ते १८२८ या १४ वर्षांत बंगाल प्रेसिडेन्सीत एकूण ८,१३५ सतींची नोंद केली (सरासरी दरवर्षी ३७८ ते ८३९), त्यापैकी ७५% सती एकट्या बंगालमध्येच झाल्या. वयाचा विचार करता, इ.स. १८२३ मधील ५७५ सतींपैकी २४० महिला ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या होत्या.
इ.स. १८२३ मध्ये बंगालमध्ये झालेल्या ५७५ सतींची नोंद पाहता:
३२ बायका २० वर्षांखालील होत्या.
२०८ बायका २० ते ३० वयोगटातील होत्या.
उर्वरित ३३५ बायका ३० वर्षांपेक्षा मोठ्या होत्या.
कारण: कुलीन ब्राह्मणांमधील बहुपत्नीत्व प्रथा आणि लहान वयातील बालविवाह यामुळे अनेक स्त्रिया लवकर विधवा होत असत
जातीच्या बाबतीत, ब्राह्मण व राजपूत यांचे प्रमाण सर्वाधिक होते, तर सामाजिक-आर्थिक स्तरात मध्यमवर्गीय जमीनदार वर्गातील विधवांच्या मालमत्तेच्या हक्कामुळेही ही प्रथा टिकून होती. ही आकडेवारी बंगाल गॅझेट्स, बिनॉय भुषण रॉय यांचे 'Socioeconomic impact of Sati in Bengal', डी. सुब्रमण्यम रेड्डी यांचे 'Social and Cultural Awakening in India' तसेच विकिपीडियावरील 'Sati (practice)' या लेखात तपशिलाने वाचायला मिळेल.
स्वातंत्र्योत्तर भारतात १९४७
स्वातंत्र्योत्तर भारतात १९४७ ते १९८७ दरम्यान अधिकृतपणे सुमारे ४० सतीप्रकरणांची नोंद आहे, त्यापैकी एकट्या राजस्थानात २९ घटना घडल्या. या काळातील पहिली नोंदलेली घटना १९७९ मध्ये उत्तर प्रदेशातील बंदा जिल्ह्यात जावित्री तिवारी हिची होती. त्यानंतर सोना कंवर (१९८१, राजस्थान, वय ६२), वैजयंत्री (वय २०), जानकरानी (२००२, मध्य प्रदेश, वय ४०) आणि लालमती वर्मा (२००८, छत्तीसगढ, वय ७५) या घटना घडल्या. मात्र, या सर्वांपेक्षा सर्वाधिक चर्चित आणि केंद्र सरकारला कठोर कायदा करण्यास भाग पाडणारी घटना म्हणजे ४ सप्टेंबर १९८७ रोजी राजस्थानातील देवराला गावात घडलेली १८ वर्षीय रूप कंवर हिची सती होती. तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिला तिच्या पतीच्या जळत्या चितेवर बसवण्यात आले; ती विवाहित वस्त्रे परिधान करून होती आणि हजारो लोकांनी हा प्रकार पाहिला. या घटनेनंतर देशभर मोठा आक्रोश झाला. याचा परिणाम म्हणून सरकारने 'सती (प्रतिबंध) अधिनियम, १९८७' लागू केला. या नवीन कायद्याने केवळ सती करणेच नव्हे, तर तिचा 'महिमा गायन' (ग्लोरिफिकेशन) करणेही प्रथमच गुन्हा ठरवले. रूप कंवर ही भारतातील शेवटची नोंदलेली सती मानली जाते; तथापि, अधिकृत आकडेवारीनुसार १९८७ नंतर कोणतीही यशस्वी सती झाली नसली, तरीही २००८ मध्ये छत्तीसगढमध्ये लालमती वर्माचा मृत्यू ही शेवटची घटना मानली जाते.
सती प्रथा सर्वत्र अस्तित्वात
सती प्रथा सर्वत्र अस्तित्वात होती. शिवरायांमागे पुतळाबाई तर माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर रमाबाई स्वेच्छेने सती गेल्या ही महाराष्ट्रातील ठळक डॉक्युमेंटेड उदाहरणे. तर शिवरायांनीच जिजाबाईंना सती जाण्यापासून रोखले हे ठळक विरोधी उदाहरण.
बंगालमध्ये मात्र विशेषतः जमिनदार/भद्र लोकांत सती जाणे हा जवळजवळ अलिखित कायदा होता. कारण दायभाग प्रथा. तिथे पती जिवंत असताना त्याने निपुत्रिक पत्नीला दत्तक घेण्याची अनुमती दिली तर त्याच्या मृत्यूनंतर सासर कुटुंबाच्या सहमतीने विधवा स्त्री दत्तक घेऊ शकत होती. दत्तक पुत्राला संपत्तीचा वारसा मिळायचा. याला विरोध करता यायचा नाही कारण दत्तक पुत्राकरवी पित्याचे मृत्यूपश्चात विधी करून त्याचा मार्ग सुकर करावा ही त्यामागची धारणा होती. त्यापेक्षा बाईला सहगमन करवलं की विषय संपला.
नवऱ्याच्या दुःखात बुडालेल्या बाईला प्रसंगी अफुमिश्रीत दूध पाजून कन्विन्स करून, साजशृंगार करवून, घरात उलुक व शंखध्वनी करत तर बाहेर ढोल ताशांच्या गजरात तिची विचारशक्ती संपवून आगीत ढकलणं, आगीच्या झळा बसल्यावर तिने चितेतून बाहेर पडू नये म्हणून तिला बांबूने आत ढोसणे वगैरे पराक्रम करण्यात कुटुंबिय व तथाकथित समाजधुरीण आघाडीवर असायचे.
राजा राममोहन रॉय यांच्या १७ वर्षाच्या भावजयीला अशी प्रकारे सती जावे लागले होते.
वर कुणीतरी लिहिल्याप्रमाणे बालविवाह, जरठबाला विवाह इ. कारणेही होतीच. बंगाली कुलीन वर्गात गंगा आणि पद्मेच्या काठावरील तथाकथित कुलीन वर्गात लग्न करण्याचे स्वघोषित बंधन होते. त्यात मग कोवळ्या बालिकांचे मध्यमवयीन प्रसंगी म्हाताऱ्या, व्यसनी माणसांशी लग्न करणे हे काही आक्षेपार्ह नव्हते. परीणामी लहान वयात वैधव्य व नंतरची परवड मुलींच्या नशिबी यायची.
गरीब घरांत तर काशी किंवा वृंदावनात विधवांना आणून टाकले की कुटुंबियांची जबाबदारी संपायची.
फारच नालायक लोक म्हणायचे!
फारच नालायक लोक म्हणायचे!
भारतात त्याकाळी विधवा
भारतात त्याकाळी विधवा महिलांची स्थिती वाईट होती असे वाचले आहे. केशवपन करणे, आलवण नेसायला भाग पाडणे, धार्मिक समारंभात स्थान नसणे वगैरे विविध प्रकारे त्यांच्यावर अन्याय केला जात असे.
जर नवरा मेल्यास बायकोला सती जाणे जवळपास सक्तीचे होते तर इतक्या मोठ्या प्रमाणात विधवा महिला कशा काय होत्या?
आपापल्या मराठी कुटुंबात आजी, पणजी यांना विचारुन पहा कुणी नातलग महिला सती गेल्याचे ऐकले आहे का.
इंग्रज काळात बऱ्याच प्रमाणात
इंग्रज काळात बऱ्याच प्रमाणात बंदी आली होती, तुमच्या आजी पणजीचा काळ फार अलीकडचा! बाकी प्रचंड प्रमाणात सती गेल्या हे काही खोटे नाही. पुरोहिताना दागिने मिळायचे म्हणून ते ह्या प्रथेला प्रोत्साहन द्यायचे.
फ्रान्स्वा बर्नियर (१६२०-१६८८) यांनी खालील वर्णन दिले:
“लाहोरमध्ये मी एका अत्यंत सुंदर तरुण विधवेचा बळी दिला जाताना पाहिला, जी माझ्या मते, बारा वर्षांपेक्षा जास्त वयाची नसावी. ती बिचारी लहानगी जेव्हा त्या भयंकर खड्ड्याजवळ गेली, तेव्हा ती जिवंत असण्यापेक्षा मेलेलीच जास्त दिसत होती: तिच्या मनातील यातनांचे वर्णन करता येत नाही; ती थरथर कापत होती आणि जोरजोरात रडत होती; पण तीन-चार ब्राह्मणांनी , तिला बगलेत धरलेल्या एका वृद्ध स्त्रीच्या मदतीने, त्या अनिच्छुक बळीला त्या प्राणघातक जागेकडे ढकलले, तिला लाकडावर बसवले, ती पळून जाऊ नये म्हणून तिचे हातपाय बांधले, आणि त्याच स्थितीत त्या निष्पाप जीवाला जिवंत जाळण्यात आले. “
विकी वरून
सुपरचार्ज,
सुपरचार्ज,
तुम्ही दिलेल्या आकडेवारीचा अभ्यास केला आणि ती तत्कालीन बंगाल प्रेसिडेन्सीच्या लोकसंख्येशी तुलना करता खालील आकडे मिळाले.
१८२३ सालची बंगाल सुभ्याची लोकसंख्या ५ कोटी ७० लाख (उपलब्ध ब्रिटिश सेन्सस डेटा नुसार). तुम्ही दिलेल्या आकड्यानुसार एकूण सती ५७५ म्हणजे एकूण लोकसंख्येच्या ०.०१%
आता बहुसंख्य सती ह्या ब्राह्मण, वैद्य, कायस्थ आणि जमीनदार होत्या, त्यांची लोकसंख्या १८२३ साली अंदाजे ६% म्हणजे २८ लाख ५० हजार इतकी होती. म्हणजे डेटा अजून रिफाईन केल्यास ०.०२% आहे.
आता माझा मुद्दा - मला हे जाणून घ्यायचे होते की सांख्यिकी दृष्टिकोनातून सती प्रथा ही बंगाल / भारतात proliferate झाली होती का नाही, तर टक्केवारीच्या आकड्यानुसार तसे दिसत नाही.
आता ह्यात आपण एक वेगळा विचार करून पाहू, कितीही समाजशास्त्रीय सांख्यिकी पृथक्करण करण्याचा आव आणला तरी रॅडिकल ह्युमनिजम हे कायम निर्जीव आकडेवारी व समाजशास्त्राच्या रुक्ष ठोकताळे मांडण्यापेक्षा वरचढ ठरावा. (सामाजिक दृष्ट्या संवेदनशील असण्याचा दंडक आहे तो)
त्यामुळे ईश्वरचंद्र विद्यासागरांचे कार्य अजून ठळक होते. आकडेवारीत कितीही कमी दिसत असले तरी फ्री विल विरुद्ध एक अगदी एकही सती ही अतिशय घृणास्पद बाब आहे. ही बाब त्या युगप्रवर्तक माणसाला ठळकपणे जाणवणे हे त्या कार्याचे मर्म आहे
वरतून जर २००८ पर्यंत ही मानसिकता अस्तित्वात असेल तर समाज म्हणून आपण किती खाली आहोत अजूनही ते अधोरेखित होते.
तरीही ह्या विषयात सुरुवातीला आकडेवारीत शिरून मी माती खाल्ली ! तिच्याबद्दल तुमची मी माफी मागतो, आणि उदार मनाने आपण मला माफ कराल ही अपेक्षा करतो.
लोभ असावा
वांडो
वांड सर माफीची गरज नाही, खरतर
वांड सर माफीची गरज नाही, खरतर तुम्हाला माझा मुद्दा पटला असे दिसले त्या बद्दल धन्यवाद. अगदी एकही स्त्री जिवंत जाळली जात असेल तर ही अतिशय घृणास्पद बाब आहे! तुमच्या प्रमाणेच मलाही वाटले होते की सती प्रथा पार १९०० च्या आधीच बंद झाली पण अगदी २००८ मधे शेवटची घटना नोंद आहे छत्तीसगडच्या लालमती वर्मा ह्यांची! म्हणजे ह्या घटना थांबल्या आहेत असे नाही. राजस्थानात तर शेखावती भागात ह्या प्रथेचा उदो उदो चालतो, स्वातंत्र्य नंतर सती गेलेल्या ४० सतींपैकी ७० टक्के ह्या एकाच भागात आहेत, तिथे १०० सती मंदिरे आहेत. त्यातले झुनझुन चे राणीसती मंदिर हे सगळ्यात मोठे, तिथे “सतिमेळा” भरतो. १९८७ च्या कायद्याने सतीप्रथेचे उदात्तीकरण थांबणे अपेक्षित असतानाही हे सगळे प्रकार चालू आहेत. अजून काही निष्पाप स्त्रिया जिवंत जाळल्या जाऊ नये हीच छोटी अपेक्षा आहे.
<< एक अगदी एकही सती ही अतिशय
<< एक अगदी एकही सती ही अतिशय घृणास्पद बाब आहे. >>
—— एक्झाक्टली
बाकी गरीबात सती प्रथा कमी
बाकी गरीबात सती प्रथा कमी असण्यामागे मूळ कारण म्हणजे सतीप्रथेचा खर्च प्रचंड असायचा, लाकूड आणी तूप भरपूर लागे! गरिबीमुळेही अनेक स्त्रिया जिवंत जाळण्यापासून वाचल्या.
या प्रथेमागे संपत्ती,
या प्रथेमागे संपत्ती, घराण्याची अब्रू जाण्याची भीती ही कारणे असावीत. विशेषतः जरठविवाहात पती गेल्यानंतर पुढे वधू वयात आली तर काय?
ही कारणे बड्या आणि प्रतिष्ठीत घराण्यांना लागू असणार.
बाकी गरीबात सती प्रथा कमी
बाकी गरीबात सती प्रथा कमी असण्यामागे मूळ कारण म्हणजे सतीप्रथेचा खर्च प्रचंड असायचा, लाकूड आणी तूप भरपूर लागे! गरिबीमुळेही अनेक स्त्रिया जिवंत जाळण्यापासून वाचल्या.
एक हे आहे आणि दुसरे म्हणजे आर्थिक स्टेक्स/ इन्हेरीटन्स हे अगदी एक बाई जाळण्याइतके लुक्रेटिव पण नव्हते ! ऐकायला कसेतरी वाटते पण मॅक्स सती ह्या धार्मिक वेष्टन देऊन आर्थिक कारणासाठी केलेल्या थंड डोक्याचे खून होते असे सहज म्हणता येईल.
काही वर्षे आधी एका प्रकल्पावर काम करताना अशी अजून एक माहिती मिळाली होती. पश्चिम उत्तर प्रदेश पक्षी मेरठ, गाझियाबाद, बिजनोर, संभल, मुझफ्फरनगर, अलिगढ इत्यादी परिसरात प्रत्येक पोलिस स्टेशन मध्ये एक "रांडवा रजिस्टर" असते मेन्टेन केलेले.
कार्यकारणभाव काय ? तर एकाच घरात तीन भाऊ, त्यांना हिश्श्याची जमीन आलेली समप्रमाणात, त्यात एक भाऊ काही कारणाने अविवाहित त्यामुळे त्याच्या जमिनीचा पुढे तुकडा पडणार नाही अन् ती उरलेल्या भावाला पूर्ण किंवा भावांना (आणि त्याच्या पोरांना) समसमान मिळेल. पण मग जर चुलत्याने उतार वयात लग्न केले अन् त्याला पोरे झाली तर ? ह्यातून रांडवा म्हणजेच लग्न न झालेला/ विधुर असलेला चुलताच खलास करून टाकायचा !
हे एक समाजशास्त्रीय feature झाले! इतके रुळले त्यानंतर पोलिसांना खास प्रशिक्षण दिले गेले, समाजात जागरूकता आली अन् गावोगावी असणाऱ्या अशा सड्याफटींग पुरुषांचे रजिस्टर मेन्टेन केले जाऊ लागले !
एक थोडी वातावरण हलके करणारी
एक थोडी वातावरण हलके करणारी गंमत -
जरठविवाहात पती गेल्यानंतर पुढे वधू वयात आली तर काय?
बंगाली भोजनात माशाचे त्यातही इलिश उर्फ हिलसा माश्याचे महत्व अपरंपार आहे. त्यात कुलीन भद्रोलोक जनांत वैधव्य कोसळलेल्या स्त्रीने अतिशय सात्विक व मिताहार करण्याची रीत होती, मांस मासळी इत्यादी सगळे बंद !
त्यामुळे बंगालीत शाकाहारी जेवणाला ब्राह्मेनेर बिधोबा भोज (ब्राह्मण विधवेचे जेवण) म्हणले जाते !
कित्येकदा, मरणपंथाला लागलेला नवरा जाताना सांगून जायचा की हिला (पत्नीला) अमुक अमुक खायची परवानगी द्या, पण हिलसा प्रेम इतके जबरदस्त की, कित्येकदा बाई पण त्याला जाताना माझी मिष्टी, दूध दुभते फळफळावळ सगळे बंद झाले तर चालेल फक्त मला हिलसा मासा अन् वांग्याची कापे (बेगुन भाजा) खायची परवानगी देऊन मर म्हणून काकुळतीने विनंती करत !
बंगाली खाद्य संस्कृती एक वेगळाच प्रांत, खरे खोटे (म्हणजे माझी मजा घ्यायला सांगितले होते का माहिती नाही) पण बंगाल मध्ये भद्रोलोक जनतेत बदकाची अंडीच खाणे संमत होते आणि कोंबडीचे अंडे खायला उच्चवर्गीय तितकेसे तयार नसत म्हणे !
शेंडेनक्षत्र महाराष्ट्रात
शेंडेनक्षत्र महाराष्ट्रात काही वेळा स्त्रिया सती जात असतील पण सतीप्रथा सर्रास नव्हती.
बहुजनसमाजात पाट लावण्याचीही (पुनर्विवाह करणे) प्रथा (नेमकी कोणत्या काळात सुरू झाली माहिती नाही) होती. पाट लावून आणलेल्या बाईला थोडे फार टोमणे वगैरे मिळायचे पण निदान संसार तरी व्हायचा. त्यामुळे सर्व विधवांची प्रचंड परवड व्हायची असे नाही. पाट लावणाऱ्या जातींचीही सुप्त हेटाळणी व्हायची. पण मुळात रोटी बेटी व्यवहारच नसायचे त्यामुळे क्लॅश व्हायचे नाहीत.
बहुजनसमाजात विधवेला सणासमारंभात स्थान नसायचेच पण आलवण नव्हते.
पेशवाईमधे सती प्रथा प्रचलित
पेशवाईमधे सती प्रथा प्रचलित नव्हती असे म्हणतात. बाळाजी विश्वनाथ, पहिले बाजीराव, नानासाहेब, विश्वासराव, नारायणराव, सवाई माधवराव यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या बायका सती गेल्याची नोंद नाही. रमाबाई हा अपवाद असे म्हणतात. पण चिमाजीअप्पांच्या पत्नी अन्नपूर्णाबाई या त्याआधी सती गेल्या होत्या. पेशवे घराण्यातील त्या पहिल्या सती म्हणून त्यांच्या मंगळसूत्राची देवघरात ठेवून पूजा केली जात असे असे वाचले.
सती कसे जावे याविषयीही नियम होते म्हणे. रमाबाईंनी चितेवर चढून माधवरावांचे मस्तक मांडीवर घेऊन स्वहस्ते चितेला अग्नी दिला होता. तर छावामधील वर्णना प्रमाणे (ते खरे खोटे माहिती नाही) पुतळाबाईंना संभाजीराजांनी चूड दिली होती. म्हणजे पुतळाबाई चितेवर बसल्यावर त्यांना चंदनी लाकडांनी झाकण्यात आले होते आणि संभाजीराजांनी त्यांच्या ओंजळीतील कापूरवड्यांना तेवते निरांजन भिडवले होते.
बाकी काही वर्णनांप्रमाणे पत्नी चितेवर पतीच्या देहाशेजारी झोपायची आणि नातलगांपैकी कोणी वरिष्ठ चितेला चूड द्यायचे.
काहीही असले तरी हे किती अघोरी आहे हे जाणून अंगावर काटा येतोच! वरती म्हटल्याप्रमाणे आकडेवारी काहीही असली तरी हजारात एक देखील सती जाणे ही नि:संशय घृणास्पद बाब आहे.
ही वर्णने आणि डीटेल मध्ये
ही वर्णने आणि डीटेल मध्ये पद्धती देऊन नक्की काय साधले आहे? तो आपला इतिहास आहे, लपवून ठेवा असं अजिबात म्हणत नाही आहे. सर्वांना सांगावाच, जेणे करुन हे किती निर्घ्रुण आहे ते मनावर बिंबेल. पण अशी ग्राफिक वर्णने वाचुन पोटात ढवळले.
अगदी अगदी !! भयंकर वाटलं हे
अगदी अगदी !! भयंकर वाटलं हे सगळं वाचून. हे असं डिटेलमध्ये लिहिण्याचा नक्की हेतू काय ?
शिसारी यावी हाच उद्देश आहे.
शिसारी यावी हाच उद्देश आहे. हे किती भयानक आहे हे ग्राफिक वर्णनातून लोकांना कळायलाच हवं. नाहीतर सतीच्या वर्णनात ती स्त्री अलंकारांनी सजून चितेकडे चालली आहे, लोक तिच्या पाया पडत आहेत, ती अग्नित देह समर्पण करत आहे एवढीच माफक विधाने असतात. प्रतिमेपेक्षा प्रत्यक्ष काय असतं ते कळलं की त्यामागचा अघोरीपणा जास्त प्रकर्षाने जाणवतो.
जिवंत बाईला जाळलं जाणं हे
जिवंत बाईला जाळलं जाणं हे एव्हडं पुरेसं अघोरी नाहीये का?
पराग नक्कीच पुरेसे नाही!
पराग नक्कीच पुरेसे नाही!
दावा केला आजतो को सती प्रथा ऐच्छिक होती, पण ती ऐच्छिक होती तर अफू मिश्रित दूध का पाजले जायचे? वर्णने वाचली की कळते ही क्रूर हत्या होती ना की ऐच्छिक धार्मिक विधी! त्या स्त्रियाना उच्चकुळात हिंदू धर्मात जन्मल्याची जणू शिक्षा होती जाळून मारणे की काय असे वाटते!
हे वर्णन वाचा!
उदाहरणार्थ, 'द कलकत्ता रिव्ह्यू'ने खालीलप्रमाणे एक घटना प्रसिद्ध केली:
१८२२ मध्ये, कलकत्त्याच्या दक्षिणेला १६ मैल (२६ किमी) अंतरावर असलेल्या बरिपूर येथील सॉल्ट एजंटने , त्याने पाहिलेल्या एका घटनेची नोंद करण्यासाठी विशेष प्रयत्न केले, ज्यामध्ये एका स्त्रीला दोन पुरुषांनी एका मोठ्या बांबूने जबरदस्तीने दाबून धरले होते, जेणेकरून तिच्या सुटकेची कोणतीही शक्यता उरणार नाही. कटक येथे , एक स्त्री जळत्या खड्ड्यात पडली आणि जणू काही सुटका करून घेण्यासाठी पुन्हा उठली, तेव्हा एका धोब्याने तिला बांबूने धक्का दिला, ज्यामुळे ती पुन्हा आगीच्या सर्वात उष्ण भागात फेकली गेली. [ १८७ ] हे अधिकृत कागदपत्रांच्या संचावर आधारित असल्याचे म्हटले जाते. [ १८८ ] अधिकृत कागदपत्रांमध्ये आढळणारी आणि ब्रिटिश नियतकालिकांमध्ये प्रसारित झालेली अशीच आणखी एक घटना म्हणजे येथील पृष्ठ ४११ वरील प्रकरण ४१, जे १८२१ मधील आहे, ज्यात एका स्त्रीला तिच्या नातेवाईकांनी दोनदा आगीत परत फेकले होते. [ १८९ ]
जेम्स वांड आणि सुपरचार्ज
जेम्स वांड आणि सुपरचार्ज यांचे प्रतिसाद आवडले.
'प्रथा' भयंकर असली तरी ती हाय स्टेक्स असलेल्या लोकांमध्ये प्रचलित होती असे दिसते. थंड डोक्याने केलेले खून असेच म्हणावे लागेल.
साधे क्रूर कारण : संपत्तीतील एक तोंड/ गर्भाशय कायमचे बंद व्हावे.
समजातल्या इतर लोकांकडे फारशी असेट्स नव्हती, शेतकरी-मजूर वर्गात तर एक बाई अशी सती जाणे म्हणजे एक कामाचा माणूस जाणे जे परवडणारे नसावे. (मुळात जन्मदर नाजूक आणि बालकांचा मृत्यूदर जास्त होता) तेव्हा एक माणूस गमावणे फारशी हितावह गोष्ट नसावी.
मुघलानी सती प्रथी विरुद्ध कायदे केलेले होते असं सुनील तांबे म्हणतात.
Pages