युरोपिअन गोरे लोक भारतात येतात तेव्हां इथले लोक त्यांच्याशी कसे वागतात?
देवगिरीचा किल्ला बघत असताना सुरूवातीच्या पायर्यांवर एक टोळकं बसलं होतं. त्यांनी एका गोर्याला पाहिलं. त्याला ते चिडवायला लागले.
त्या टोळक्याला इंग्लीश माझ्याइतकंच येत होतं.
हे मॅन , हाऊ आर यू? इंडीया यू लाईक? असा चिडवल्यासारखा टोन काढून बोलत होते, तो टोन ऐकून तो गोरा त्यांना फक्त नमस्ते म्हणून पुढं जायला लागला. तर हे मागून त्याला जोरजोरात बोलत होते. यू सोनेरी माकड म्हणून आपसात हसले. त्यांचा टाईमपास होत होता.
आग्र्याला एक गोरी मुलगी/बाई लाल किल्ला बघायला आली होती. तिला थांबवून एका टोळक्याने तिच्यासोबत फोटो काढून घेतले. या खूप वर्षापूर्वीच्या घटना आहेत. आता सेल्फी काढतात.
आता गोरे लोक भारतात आले कि व्हिडीओ बनवून पोस्ट करतात. त्यात हेच प्रकार दिसतात. कमी नाहीत झालेले. उलट वाढलेत.
काही लोक गोर्यांचं मत भारताबद्दल चांगलं व्हावं म्हणून उगीचच त्यांना थांबवून सल्ले देतात. एक गोरी मोटरसायकलवरून मुन्नार ला चालली होती. एकाने येऊन तिला इथे फोटो काढू नकोस, सेफ नाही असं सांगितलं. ती थँक्स म्हणाली. "नाईस गाय" म्हणाली. पण नंतर तो जवळ जवळ तास दोन तास ती जिथे जिथे थांबेल तिथे थांबून तिला सल्ले देत होता. युट्यूब वाले शक्यतो निगेटिव्ह कमेण्ट्स करत नाहीत. पण हे भीतीदायक वाटू शकतं. मला इंग्लीश येतं याचं या गोरीनं कौतुक केलं पाहीजे अशी त्याची बॉडी लँग्वेज होती.
रिक्षावाले जवळच्या अंतर्साठी काहीही पैसे मागतात.
एका पीम्च्करवाल्याने एकाच्या मोटरसायकलची पंक्चर काढली. त्याने पैसे विचारले तर वन पंक्चर १२०० रूपीज म्हणाला. त्याला संशय आला. पण तो भांडण करायला लागल्यावर त्याने पैसे दिले.
रजनीश आश्रम सुरू असताना बरेच गोरे लोक कायनेटिक भाड्याने घेऊन फिरायचे. तेव्हां हवा भरायचे एकाने दीडशे रूपये घेतल्याचं पाहिलं होतं.
तुम्ही पाहिलेत का असे प्रसंग?
मी चांगले पण पाहिलेत, आमच्याच
मी चांगले पण पाहिलेत, आमच्याच Mexico ऑफिस मधून आलेली एक ब्रिटिश कन्या घेऊन पंजाब ग्रामीण मधून फिरताना बुलेट बंद पडली होती, तेव्हा जवळच्या घरातील पापाजी येऊन रात्रीचे कुठे गाडी लोटता इत्यादी सांगून घरी घेऊन गेले, मला दुभाष्याच्या रोल मधे टाकून पोरीला आधार दिला, गरम ऊन करून जेवायला घातले, दुसऱ्या दिवशी मेकॅनिक बोलवून गाडी नीट करवून दिली त्याचे पैसे खूप आग्रह केल्यावर घेतले अन् जाताना हसतमुख पणाने टाटा केले, सिमोन दर वर्षी त्यांना क्रिसमसला कार्ड पाठवत असे, मागच्या वर्षी पापाजी गेले अन् माताजी आता थोरल्या मुलाकडे दिल्लीला असतात, पोरगा पण त्यांच्यासारखाच आहे अगत्यशील आणि शांत.
जेम्स जी
जेम्स जी
जंगल मे मोर नाचा किसी ने ना देखा गाणं ऐकलंय का?
हाच प्रश्न मला पण पडला होता
हाच प्रश्न मला पण पडला होता सरकार तुमच्यासाठी
Ecosystems आहेत वेब वर, तुम्ही भारत वाईट व्हिडिओ एक बघा हजार सापडतील. तुम्ही भारत लैच भारी व्हिडिओ बघा एक बघता १०,००० सापडतील. सरकारच्या कृपेने लाख पण सापडतील उद्या !
त्यामुळे एकंदरीत काही पॉईंट नाही वाटत. धागा शतकी करायचा असल्यास सांगा. करून देतो
बाकी पुढे चालून ज्ञान हुंकार ऐकण्याचे नशीब लाभेल अशी पुसट idea असती तरी व्हिडिओ उतरवून ठेवला असता.
त्या उलटा वंशवाद सारखा
त्या उलटा वंशवाद सारखा कॉन्फर्मेशनल बायस घेऊन चालणारा धागा वाटतोय हा पण ! यूट्यूब वर बघितले (आपल्या सर्च हिस्ट्री नुसार आलेले सजेशन) ते ग्राह्य फक्त !
OK
OK