थोड्याफार फरकाने मला रेल्वे आणि विमानप्रवासात अलीकडच्या वर्षांत बऱ्याचदा असे अनुभव आले आहेत.
कोकणरेल्वेने नवऱ्यासोबत गावी जायला निघाले होते. तब्येत ठीक नव्हती. दोन कंपार्टमेंट सोडून असणाऱ्या सीटवर गुजराती लोकांचा एक मोठा फॅमिली ग्रुप होता. गोव्याला जात असावेत. नेहमीप्रमाणे त्यांनी बचाबचा खायला सुरुवात केली. रात्रीचे अकरा वाजून गेले होते तरी मोठा स्पीकर लावून सर्वांनी गाणी गायला सुरुवात केली. आजूबाजूला आपल्या गावी जाणाऱ्या कोकणी चाकरमानी लोकांची गर्दी. दबक्या आवाजात सर्वांनी अरे आता झोपायची वेळ झाली कुणीतरी यांना गाणी बंद करायला सांगा अशी कुजबुज सुरु केली. प्रत्यक्षात कुणीच त्यांना सांगायला जाईना. आमच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या काकांचा आवाज जरा वाढला. पण तोही फक्त बाजूला बसलेल्या माणसांसमोर. अरे काय माणसं आहेत, किती तो गोंधळ, किती तो आम्हाला त्रास वगैरे वगैरे. पण हे सर्व त्यांना तिथे जाऊन सांगायची हिंमत होईना. TCने येऊन अगदी सौम्य आवाजात जरा टोकलं तर ते लोक अगदी निर्लज्जपणे क्या हैं वो फॅमिली फॅमिली थोडा एन्जॉय कर रहे हैं अभी थोडे देर मे बंद कर देंगे असे अगदी गोड आवाजात सांगायला लागले. (असेच गोडगोड बोलून १०० ची गोष्ट १००० ला विकतात). पण अर्धा तास होऊन गेला तरीही आवाज सुरूच. वरच्या सीटवर बसलेला एक तरुण म्हणायला लागला मी सांगतो त्यांना मी रेल्वेतच कामाला आहे. पण असं दोन तीन वेळा बोलून झाल्यावरही आपल्या सीटवरून तो खाली उतरला नाही. माझी तब्येत बरी नव्हती, झोपायचं होतं. ह्यांच्या भसाड्या गाण्यांमुळे डोकं अतिशय दुखत होतं. शेवटी नवऱ्याला म्हटलं चल जाऊया तिकडे. दोघेही तणतणत गेलो आणि जोरजोरात शिव्या घातल्या आणि आता आता तुमची गाणी बंद नाही केलात तर स्पीकर गाडीतून खाली फेकून देईन, आवाज अगदी बंद झाला पाहिजे असं किंचाळले. त्या ग्रुपमधल्या तरुण मुलांनी दात काढून फिदीफिदी हसायला सुरुवात केली. पण त्यांच्यातल्या प्रौढ लोकांना काय वाटलं काय माहित त्यांनी गाणी अगदी बंद केली. यात आश्चर्य म्हणजे आजूबाजूला सर्व मराठी कुटुंबं होती पण एकही आमच्या बाजूने त्या लोकांना खडसवायला आला नाही. तोंडातल्या तोंडात पुटपुटत सीटवरच बसून त्यांचा काही निषेध चालला होता तोच.
त्यांना गप बसवून आमच्या सीटवर परत आलो तर रेल्वेत काम करणारा मुलगा त्याच्या सीटवर पांघरूण तोंडावर ओढून झोपून गेला होता. काही वेळाने त्या कुटुंबातला मोठा काका आमच्या सीटजवळ आला आणि माझ्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना सांगायला लागला. वो क्या हैं ना सब फेमिली गोवा घुमने जा राहा हैं ना तो जरा मजा मस्ती मे गा रहा था. त्यावर आमच्या बाजूच्या सीटवर बसलेले काका जे सीटवर बसल्या बसल्या त्यांना शिव्या घालत होते ते अगदी प्रेमाने त्या गुजराती माणसाच्या पाठीवर अलगत थोपटत म्हणाले. कूच नही चलता हैं.
तुम्हालाही प्रवासात असे अनुभव आले असतील तर शेअर करा.
हेच तर वैशिष्ट्य आहे मराठी
हेच तर वैशिष्ट्य आहे मराठी माणसाचे..
धाव फक्त जागेवर बसून चिडचिड करण्याची...
अशा वेळी तुम्हाला थोडा सपोर्ट करायला हवा होता जर त्यांना पण आधी त्रास होत होता तर.
मोठी गुजराती फॅमिली असेल तर
मोठी गुजराती फॅमिली असेल तर प्रेमानं घ्यायचं. त्यांना वडापाव विचारायचा. ते काही बाहेरचं काही खात नाहीत. पण तुम्ही विचारलं तर आठवणीने तुम्हाला त्यांनी डब्यातून आणलेले खाकरा, खमन, पत्री असे हजार आयटेम उतरेपर्यंत खाऊ घातले असते. शिवाय काय करता विचारतातच. जर तुमचा व्यवसाय धंदा असेल तर एखादं मोठं काम पण देतात. एखादे वेळी तुमच्यावर प्रसन्न झाले असते तर शंभर कोटीचं काम पण दिलं असतं.
त्या काकांना नक्की हजार दीड हजार कोटीचं काम मिळालं असणार. आणि फॅमिली फॅमिली म्हणजे साध्या नाही, बिझनेस फॅमिलीज. इतरांनी पण सुरूवात केली असेल. आता ते काका पण फॅमिली घेऊन गोव्याला गाणी म्हणत जातील.
भारतात प्रगती करायची तर गुजरातीशी वैर घेऊन चालत नाही. नाही खाल्ले मटणमासे तर काय बिघडतं? मुंबईत गुजराती भाषा कंपल्सरी झाली तर शिकायची. पुढं फायदे बघा ना. भाषेचा अभिमान बाळगून काय वडापाव खायचा का आयुष्यभर?
मी तर तरूणांना सांगतो गुजराती शिका. एखादी सुंदर गुजराती बायको मिळू शकते. ती मिळाली कि गेला बाजार पाचशे कोटी घेऊन येतेच,
माझ्यासोबत असा एक किस्सा घडला
माझ्यासोबत असा एक किस्सा घडला होता. मी रेल्वेने कोल्हापूरला जात होतो तेव्हा एक गुजराती फॅमिली अशीच जोरजोरात स्पीकर लावून गाणी ऐकत होते. मला राग आला मी मोबाईलमध्ये आरंभ है प्रचंड गाणं लावलं. ते गाणं ऐकून माझे बाहू स्फुरण पावले आणि माझ्या मनगटावरची मोत्यांची माळ तुटली. तिथे बाजूलाच एकजण शंकराची पिंडी घेऊन गावी जात होता ती पिंडी मी उचलली आणि त्यांच्या अंगावर जो काय धाऊन गेलो की ज्याचे नाव ते. माझा तो रुद्र अवतार बघून गुजराती लोकांची बोबडी वळाली आणि त्यांनी कसलाही विचार न करता रेल्वेतून खाली उद्या मारल्या. माझा तो अवतार बघून जे हेडफोन लावून गाणी ऐकत होते त्यांनी पण त्यांचे हेडफोन काढून ब्यागेत भरले आणि झोपी गेले.
अरेरे, तुम्ही संधी घालवली.
अरेरे, तुम्ही संधी घालवली.
बच्चनचं अंग्रेजी मे कहते है कि लावायचं. त्यातलं गुजराती मा बोलु तमे प्रेम करूं छुं ऐकून प्रेम केलं असतं तर गुजरातचे जावई होऊन अँटीलियाचे दोन माळे भाड्याने दिले असते. कुठं बाहुफुरफुरस्यवदसा आठवली.
तुमचा गुजराती जनतेवर विशेष
तुमचा गुजराती जनतेवर विशेष राग आहे का मराठी जनतेवर का तुम्ही एकंदरीत कायमच कोणावर तरी रागावून असता(च) ते कळले नाही त्यामुळे पास.
What you can expect from a
What you can expect from a community who do Garba on Vietnam airport Tarmac and Burj Khalifa observatory.
गोव्यात जाऊन गाणी गाऊन
गोव्यात जाऊन गाणी गाऊन श्रीखंड पुरी खाणार आहेत. पावभाजी, ढोकळो,अने पात्रा.
मलाही दोन तिनदा असा अनुभव
मलाही दोन तिनदा असा अनुभव कोकण रेल्वेत आलाय. गोव्याला जायचे म्हणजे लोक चेकाळतात.
माझ्या बाबांच्या कॅटॅरेक्ट
माझ्या बाबांच्या कॅटॅरेक्ट ऑपरेशनच्या वेळची आठवण. ऑपरेशन आधी डोळ्यात ड्रॉप घालून झोपवून ठेवलं होतं. बाबांनंतर एका गुजराती बांचा नंबर होता. बाबांसोबत मी एकटाच होतो. त्या बांसोबत चार पाच बायका. पुरुष मंडळीही बाहेर असतील.
हा पहिला अनुभव. असंच आणखी दोनदा हॉस्पिटलमध्येच पाहिलं आहे.
बाकी आमचं गाव मुंबईत असलं तरी गुजरातेतच असल्यासारखं. इंदूरला जाणार्या गाडीची जवळपास निम्मी स्टेशन्स गुजरातेतली. तिथेही बोरिवलीच्या प्लाटफॉर्म पासून हाच अनुभव घेतला आहे. गाणी नाही. पण गप्पा आणि हसणं , खिदळणं.
एकदा मी रेल्वेने गावी जात
एकदा मी रेल्वेने गावी जात होतो. मला खूप एकटं एकटं वाटत होतं. काय झालं काय माहीत मला अचानक रडू आलं. रेल्वेत एक पन्नाशीतलं गुजराती कुटुंब होतं ते माझ्याजवळ आले आणि मायेने माझ्या पाठीवर हात फिरवून माझी चौकशी केली. मला त्यांच्या डब्यातले पदार्थ खाऊ घातले. आजोबानी मला प्रेमाने त्यांच्या जवळ घेऊन थोपटलं आणि बोलले रडू नको आम्ही आहोत ना तुमच्यासोबत. नंतर त्यांनी मला त्यांच्या आयुष्यातील अनुभव सांगितले. आजी माझे पाय चेपत होती. आजोबा केसातून हळुवार हात फिरवत होते त्या सगळ्यात मला मस्त गाढ झोप लागली. सकाळी उठलो बघतोय तर आजोबा आजी कुठेच नाहीत. मी या डब्यातून त्या डब्यात नुसता शोधत होतो त्यांना पण कुठेही भेटले नाहीत. मी आजही विनाकारण गावी जातो ते आजी आजोबा भेटतील या आशेने पण अजूनही मला ते भेटले नाहीत.
झाले का सुरू या धाग्यावर पण
झाले का सुरू या धाग्यावर पण कचरा टाकायला ?
तो अमानवीय धागा तर पूर्ण खराब करून टाकला आहेच.
आता तर वेगवेगळे आयडीज वापरून
आता तर वेगवेगळे आयडीज वापरून कचरा सुरू आहे
हे नित्याचे अनुभव आहेत आणि
हे नित्याचे अनुभव आहेत आणि गुजराती किंवा कुण्या एका प्रदेशापुरते, लोकांपुरते सीमित नाहीत. फारसा प्रवास न करणाऱ्या बऱ्याच लोकांना प्रवासात काय तर मजा करायची, झोपायचं थोडीच असत, घरी जाऊन प्रवासाच्या गमती जमती सांगुन, जेवण वगैरे झालं की झोपायचं वगैरे वाटत असावं. आता फोन आहेत, स्पीकर आहेत पूर्वी रेडिओ टेप रेकॉर्डर होते. बस मध्ये व्हिडिओ कोच हा आणखी एक प्रकार सुरू झाला होता.
चित्रपट लावलाच पाहिजे आणि एक झाला की दुसरा. आक्षेप घेतला तर उत्तर मजा कर उद्या घरी जाऊन झोप, सुट्टी टाका ना एक दिवस.
मग व्हिडिओ प्लेअर खराब असला की गोंधळ, भांडण, पैसे परत द्या वगैरे. शेवटी प्रसन्न आणि इकडे जब्बार ट्रॅव्हल्सने रात्री अकरा नंतर व्हिडीओ बंद असा नियम केला होता.
ट्रेन मध्ये ट्रांझिस्टर, कधी कुणी हौशी सेल घालून टेपरेकॉर्डर घेऊन यायचे आणि वाजवायचे. गाणी, आणि पेक्षाही गप्पा. आता गप्पा, फोनवर कुणी स्पीकरवर गाणी ऐकत असतं कुणी सतत फोनवर जोरात बडबड करत असतं. एसी 2 टायर असो की फर्स्ट क्लास. वर्षभरापूर्वी गावाहून येताना दिवसाचा प्रवास होता, फर्स्ट एसी कम्पार्टमेंट मध्ये एक जोडपं होतं. बाईचं फोनवर सतत मोठ्याने बोलणं. ते वरोऱ्याला उतरले पुढे चन्द्रपूर वरून एकजण चढला. थोडावेळ झोपला फोन वाजला घेतला मग एका मागून एक फोन. मोठ्याने बोलणे. शेवटी दुसऱ्या कम्पर्टमेंट मध्ये जागा होती तिथे शिफ्ट झालो.
रात्रीपण लोक स्पीकर फोन लावून क्लिप्स बघत असतात, कुणी पिक्चर बघत असतं. एकाला गप केलं की बाजूचा कुणीतरी सुरू होतो, कुणाचा फोन वाजतो आणि मोठ्याने हॅलो, कोण?/कौन/यारू?/येवरू/ हां बोल करून मोठ्याने हसत वगैरे बोलणं सुरू होतं.
ट्रेनमध्ये आता सफाई कामगार असतात त्याचा खास करून उत्तरेवरून येणाऱ्या ट्रेन्समध्ये उलट परिणाम झालाय. टाका सीट खाली, येतील सफाई कामगार प्रकारामुळे कचरा करण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. टोकलं तर टेन्शन क्यो लेते हो क्लिनर आएग अभी असे उत्तर. त्यातल्या बाटल्या मग इकडे तिकडे घरंगळायला लागतात.
एकंदरीतच सिव्हीक सेन्स वाढण्या ऐवजी आणखीच मार खातोय.
कॅलिफोर्नियात आम्ही एका
कॅलिफोर्नियात आम्ही एका स्टॉबेरी फार्म मध्ये 'पिक युअर ओन स्टॉबेरी 'करायला दरवर्षी दोन तीनदा तरी जायचो. तर एकदा आमच्या नंतर असंच एक गुजराथी कुटुंब असेल मित्र असतील १०-१५ जण + पोरंबाळं आले होते. पंधरा मिनिटांत त्या शांत शेताची पार रया घालवली. जोरजोराने ओरडत काय होते, मॅनरलेस झुडपांवर पाय काय देत होते, स्टॉबेरी फेकत काय होते, कसेही विचित्र फ्रेम मध्ये बाकी कोण आहे नाही विचार न करता फोटो काय काढत होते. बाकीच्या लोकांची त्यांना पर्वाच न्हवती.
एकुण भारतीय एकत्र आले की विचित्र वागतात हे खरंच गुजराथी आणि साउथ इंडियन जरा जास्त विचित्र आहेत इतकंच.
डिस्क्लेमर ; एकत्र आलेले गुज्जू लोक माझ्या डोक्यात जातात.
वर कोणी गुजराती मुलींचा विषय
वर कोणी गुजराती मुलींचा विषय काढला त्यात तथ्य आहे. आमच्या जुन्या बिल्डींगमध्ये ३० टक्के गुजराती होते. आमच्या लहानपणी म्हणजे वयात येताना आम्हीं मराठी मुले गुजराती मुलींच्या मागे असायचो. कारण त्यांच्यामध्ये मराठी मुलींच्या तुलनेत प्रेमप्रकरण करायची डेअरिंग जास्त असायची. त्यांना घरचा फार धाक नसायचा. आणि विशेष म्हणजे छान मराठी बोलायच्या. त्यामुळे परप्रांतीय वाटायच्याच नाहीत.
आताच्या आमच्या सोसायटीमध्ये त्यांचा अजून जास्त टक्का आहे. कदाचित त्यामुळेच मराठी फार बोलत नाहीत. गणपतीला सुद्धा रात्री मस्त गरबा चालू असतो.
गुजराती फॅमिली हॉटेलमध्ये जेवायला जातात तेव्हाही त्यांची धमाल चालू असते. आपला मूड शांततेत जेवायचा असेल तर त्याची लागली समजावे.
एकूणच दिलखुलास जॉली मनोरंजनप्रिय लोकं असतात. त्यांचा स्वभाव आणि कल्चर सगळीकडे असेच असते वाटते.
पण शिस्त पाळत नाहीत फार आणि कोणाची पर्वा करत नाही हे देखील तितकेच खरे आहे. म्हणजे असे अनुभव आहेत.
पण कोणाची भीड बाळगत नसले तरी तसे भित्रे देखील असतात. तुम्ही मिळून आवाज चढवला असता तर कोणी अंगावर धावून आले नसते. पण सध्या चित्र बदलले असेल. मोदी शहा सरकार त्यांना आपले वाटते त्यामुळे जरा डेअरिंग दाखवतात. आवाज चढवला नाहीत हे एकप्रकारे चांगले देखील केलेत.
ट्रेन बस वगैरे मध्ये स्वतः पुढाकार घेत लफडे करूच नयेत. कायदेशीररित्या कुठे तक्रार करता येते का बघावे. टीसीकडे तक्रार करून त्यावर ऍक्शन घेण्यासाठी दबाव आणणे उत्तम. काही प्रकरण वाढलेच तर तो घेऊन येईल रेल्वे पोलिस..
ता.क. - मायबोलीवर कोणी गुजराती आहेत का?
त्यांनाही त्यांची बाजू मांडायला संधी द्यायला हवी. असे पाठीमागे आपणच बोलणे योग्य नाही
मोदीजी गुजराती आहेत आणि ते
मोदीजी गुजराती आहेत आणि ते माझे आवडते नेते आणि देशाचे पंतप्रधान आहेत.
ठराविक आय डीज नी कचरापट्टी
ठराविक आय डीज नी कचरापट्टी करुन ठेवले धागे, हाणामारी चे राजकिय धागे आणि ए आय च्या कविता - चांगले भविष्य आहे माबोचे
एकंदरीतच सिव्हीक सेन्स
एकंदरीतच सिव्हीक सेन्स वाढण्या ऐवजी आणखीच मार खातोय. >>> लोकांच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या अतिशयोक्ती ठरतील अशा संकल्पना झाल्या आहेत, आणि सार्वजनिक जीवनात काही कर्तव्ये असतात हे त्यांच्या गावी ही राहिले नाही.
सध्या गुजराती लोकांनी गरबा
सध्या गुजराती लोकांनी गरबा खेळला म्हणून त्यांना लोक नावे ठेवत आहेत. जणू स्वतः जाईल तिथे गुण्या गोविंदाने राहतात. नीट बसून हागायची पण अक्कल नसते बऱ्याच जणांना तरी देखील गुजरात्यांनी गरबा खेळला म्हणून त्यांना नावे ठेवायची.
अनेक ठिकाणी भटकल्यावर असे लक्षात आले आहे की गुजराती लोक काहीही वेगळे करत नाहीत. टिकटॉक वर सार्वजनिक ठिकाणी अनेक देशातले लोक अनेक ठिकाणी वाट्टेल ते करत असतात. लोकांना फ्लॅश मॉब चे कौतुक वगैरे वाटते आणि ते पब्लिक स्पेस वरचे अतिक्रमण वाटत नाही मात्र गुजरात्यांनी गरबा खेळला तर एवढा राग.
आपल्याच लोकांबद्दल एवढा द्वेष बरा नव्हे. वड्याचे तेल वांग्यावर, किंवा ढोकळ्यावर काढू नये.
अहो पण airport tarmac वर गरबा
अहो पण airport tarmac वर गरबा? असो तुमच बरोबर आहे. हे सगळ्यांनाच लागू आहे. गुज्जूना point out करायला नको.
गुजराती आपले अन्नदाते आहेत.
गुजराती आपले अन्नदाते आहेत. देश त्यांच्या मुळे चालतो.
काय होतं थोडंसं गरबा खेळला तर?
नीट बसून हागायची पण अक्कल
नीट बसून हागायची पण अक्कल नसते बऱ्याच जणांना तरी देखील गुजरात्यांनी गरबा खेळला म्हणून त्यांना नावे ठेवायची.>>>> मला आहे, म्हणून मी नावे ठेवणार,....तुम्हाला काही शंका असल्यास सोबत संडासात येऊन याची देही, याची डोळा खात्री करून घेऊ शकता....अगत्याचे निमंत्रण!!
..आणि मुंबई लोकल च्या फर्स्ट क्लास डब्यांच्या दरवाजांच्या फटीत पान-मसाला/ गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांच्यात गुजरात्यांचा टक्का खूप वर आहे...यांना सार्वजनिक स्वच्छते विषयी जराही आस्था नसते असे माझे स्पष्ट मत आहे.
जगात कुणीही, दुसऱ्यांना
जगात कुणीही, दुसऱ्यांना कुठेही मनसोक्त नाचायला मज्जाव करू नये. एयरपोर्ट टर्मिनल वर गरबा खेळू नये असा कोणता नियम आहे का काय?
>> गुजराती आपले अन्नदाते आहेत. देश त्यांच्या मुळे चालतो. <<
केवळ देशाच्या उरावर बसलेल्या काही लोकांमुळे समस्त भाषिक समाजाला जबाबदार धरण्याचा गाढवपणा करणार असाल तर स्वतःला पुरोगामी वगैरे म्हणवून घेऊ नये. त्या लोकांचे तत्त्वज्ञान मराठी लोकांनीच जोपासुन वाढवलेले आहे.
बडोद्याला आमचे अर्धे कुटुंब राहते, कधीही गुजराती लोकांनी तिथे मराठी लोकांवर आवर्जून अन्याय केला आहे असे झालेले नाही. आतापर्यंत व्यवसाय असो वा संस्था असोत, गुजराती लोकांनी आम्हाला कसलाही त्रास दिलेला नाही. आतिथ्य देखील मनसोक्त आणि प्रामाणिकपणे केले आहे. गुजराती लोकांची भाषिक अस्मिता आपल्यापेक्षा कितीतरी लवचिक आणि सहिष्णू आहे. मात्र पुण्यासारख्या कोअर मराठी ठिकाणी मात्र मराठी लोकांचेच अतिशय वाईट अनुभव आलेले आहेत.
मराठी लोकांना कसला काम्प्लेक्स असतो कुणास ठाऊक. भाषिक गुंडांचा प्रचंड राग येतो.
अन्नदाते आहेत असं लिहिलंय,
अन्नदाते आहेत असं लिहिलंय, यात कुठे रॉयपणा केला?
>> यांना सार्वजनिक स्वच्छते
>> यांना सार्वजनिक स्वच्छते विषयी जराही आस्था नसते असे माझे स्पष्ट मत आहे. <<
जणू महाराष्ट्रात कुणी गुटखा, मावा/खर्रा आणि पान तंबाखू खातच नाही. तुम्हा मराठी लोकांचे एवढे नैतिक अध:पतन झालेले आहे की तुमच्या प्रतीकांची देखील तुम्हाला फारशी पडलेली नसते, त्याच तंबाखू आणि बिडी यांच्या पाकिटावर 'संभाजी' वगैरे नावे दिसतात.
मदन बाळा, जरा मोठा हो. नुसताच
मदन बाळा, जरा मोठा हो. नुसताच वयाने वाढला आहेस तू.
रॉय यांच्याशी सहमत.
रॉय यांच्याशी सहमत.
सिक्कीम मध्ये लाचेनला गेलो
सिक्कीम मध्ये लाचेनला गेलो होतो, 2017 ला. तिथे हॉटेल पासून जवळच मिलिटरी कॅम्प होता, तेव्हा तिथे मराठा रेजिमेंट होती. चालत फिरायला म्हणुन गेलो तेव्हा कॅम्प दिसला. तिथे गेटवर असणाऱ्या सैनिकांशी गप्पा झाल्या. आतमध्ये चालत जायला परवानगी होती, थोडं फिरून आलो.
दुसऱ्या दिवशी तिथे एक व्हॅली बघायला गेलो होतो. थांगु की चोपटा व्हॅली.
तिथे गेलो तर एका एसयूव्ही मध्ये मोठ्याने झिंगाट गाणं लावून काही मुलं मुली नाचत होते. मराठीच होते. तिथे आधी आलेले पर्यटक वैतागले होते. तिथे पक्षी निरीक्षण पण करतात. एकजण म्हणाला सांगितलं इथे नका गाणी नका लावु तर दोनच मिनिट करून सुरूच आहे केव्हाचं. मी जाऊन त्यांना मराठीत ओरडून सांगितलं अरे बंद करा एकदम, ही जागा आहे का पार्टी करण्याची. तर लगेच बंद केले. कदाचित मराठीत ओरडतोय हा माणुस म्हणजे त्या मिलिटरी कॅम्पमधला वाटलो असेन मी, लगेच ऐकलं.
हा मराठी धिंगाणा होता.
हा मराठी धिंगाणा होता. >>>
हा मराठी धिंगाणा होता.
>>>
ती कविता / नज्म याद आली "तुम भी हम जैसे निकले "
पणजोबा झालो, अजून किती मोठं
पणजोबा झालो, अजून किती मोठं व्हायचं?
रॉयपणा केल्यावर वय कमी होतं का?
Pages