अनुभवलेले दिवस
सर्व दिवस सारखेच नसतात याचा प्रत्यय मी अनुभवला तो ऐन गणेश चतुर्दशी दिवशी २०२५ साली. वास्तविक सर्व मौसमाप्रमाणे ( उन्हाळा , हिवाळा आणि पावसाळा झाल्यास काही त्रास नसतो ) अर्थात ते सृष्टीचक असते पण तसेच माझे केवळ एकाच घटनेने बिघडले . तसा हा दिवस सामान्य पण दिवस सामान्य नसतोच जेव्हा काहीतरी अघटित घडायचे असते . दुपारची वेळ आणि डॉक्टर ची भेट झाली आणि काही तरी अघटित ची चाहूल लागली . ऑपरेशन करावे लागेल इत्यादि डॉक्टर चे बोल माझी अवस्था तशी खराब होतीच . पुण्यात मनुष्य बळ हा अतिशय कठीण विषय होताच आणि सर्वाधिक असलेल माझ्या ओळखिच जवळपास नाहीच ज्या होत्या त्या सुधा च्या मैत्रिणी हा कालावधी मला आणि सर्व घराला किचकट ठरला . डॉक्टर म्हटले की फॉलो अप हा प्रकार आलाच मग इकडे तिकडे धावाधाव कधी सुधा च्या मैत्रिणीची मदत असे प्रकार चालू होते ( दुर्देवाने मला पुण्यात आजही मित्र नाहीत हे मात्र प्रकर्षाने सांगावे लागते ते गेली २६ वर्ष पचवत आहे . आणि त्याहून वाईट चुलत भावू स्वत डॉक्टर असून तेही md सारख्या मोठ्या पोस्ट वर असून मला कामी आला नाही. एकतर त्यास वेळ तरी नसे अथवा तो मेसेज पाहत तरी नसे . तेव्हा एक आणखी केळल आपले कोण आणि परक कोण थोडक्यात कोणीच कामास आले नाही . आणि थोडक्यात लाचारी च्या अनुभव मी घेतला . नंतर एका महिन्याने मी केवळ पाय जमिनीवर अवघे टेकवू शकलो , पण चालू नाही अथवा येत तरी नव्हते. त्यात काळात घराच वातावरण थोडे बदलले . जवळपास दोन महिनेनंतर माझी अवस्था थोडी बरी झाली आणि मी घराबाहेर पडलो हा फारच आनंदचा दिवस होता . नंतर केलेली गावची सहल मला खूपच मोठी ऊर्जा देवून गेली . या काळात थोडी अधिक मदत झाली ते नितीक्षा च्या नवऱ्याची, शक्य असेल तेव्हा तो येई पण दर वेळेस शक्य नसे.
आता ९ महीने झाले आणि पायाने जणू नवीन जन्म घेतला असे वाटत आहे . अर्थात या पेक्षा भयानक कोणाचाही अनुभव असेल,आणि असतोही. पण एक प्रकारची भीती आणि मानसिक भीती मनात दाटली आहे . सध्या सर्व क्षेम आहे . पण काही सुप्त किल्ले पहायची ईछ्या आजही मनि आहे पण पायाने शक्य होईल का माहीत नाही.
तुमच्या पायाचे ऑपरेशन झाले,
तुमच्या पायाचे ऑपरेशन झाले, जवळचे मदतीला नव्हते, आता पाय ठीक आहेत एवढे कळले. आणखी सुधारणा होण्यास व पुढील वाटचालीस शुभेच्छा. Knee replacement झाले असल्यास फिजिओथेरपीने खूप सुधारणा होते हे पाहिले आहे.
लिखाण तुटक, अस्पष्ट वाटले, तपशीलवार लिहायला हवे.
मित्र मलाही नाहीत. संभाळून
मित्र मलाही नाहीत. संभाळून राहा.
हळूहळू चालत पाहण्यासारखा एकच किल्ला आहे जुन्नरचा शिवनेरी.
तुम्हाला लवकरच पायावरती उभे
तुम्हाला लवकरच पायावरती उभे राहून, टुणटुणीत होण्याकरता शुभेच्छा.
सुमुख तुमच्या पायात सुधारणा
सुमुख तुमच्या पायात सुधारणा आहे आणि तुम्ही गावाला सहल करून आलात हे वाचून आनंद झाला. इथे लेख लिहून व्यक्त झालात हे छान. आता लेख अपडेट करता येईल की नाही सांगता येत नाही. पण प्रतिसादांमध्ये थोड्या रिकाम्या जागा भरल्यात तर लेख व्यवस्थित कळेल. तुमच्या पायाचा नक्की काय प्रॉब्लेम होता? गीता आणि नितीक्षा कोण? तुम्हाला हव्या त्या किल्ल्यांवर नक्की जाता येवो अशा शुभेच्छा.
तुमच्या पायात सुधारणा होतेय
तुमच्या पायात सुधारणा होतेय ही फारच चांगले आहे.
हळू हळू तुम्ही पूर्ववत व्हाल, धीर सोडू नका.