कौन ? डोन्ट ओपन द डोअर (माझ्या घरी घडलेला २६ तासाचा थरार ) : भाग १ .

Submitted by दीपांजली on 29 May, 2026 - 03:45

चॅप्टर १ : स्ट्रेन्जर इन माय हाउस
साधारण १९९९-२००० च्या आसपास राम गोपाल वर्मा-उर्मिला मातोंडकर-मनोज वाजपेयी या जबराट कॉकटेलचा अत्यंत स्केअरी थ्रिलर मुव्ही आला होता, ‘कौन’ !
एका रात्री उर्मिलाच्या घरात एक स्ट्रेन्जर घुसतो आणि सुरु होतो एक लपाछपीचा ट्विस्टस ने भरलेला थरार.. नक्की कोण कोणाला थ्रेट आहे, कोण कोणाला घाबरतय..प्रेक्षक पार कनफ्युज होतात !
तसाच काहीसा थरार गेल्या शुक्रवारी आम्ही अनुभवला !
२२ मे २०२६
मेमोरिअल डे लाँग विकेन्ड असल्यामुळे शुक्रवार दुपार पासूनच सगळीकडे सुट्टीचं वातावरण होतं !
रविवार - सोमवार बाहेर जायचे प्लॅन होते म्हणून शनिवारी धुरन्धर मॅरॅथॉन करायचा प्लॅन केला !
आता चार तासाचे दोन धुरन्धर बॅक टु बॅक पहायला भरपूर स्नॅक्सही हवेत !
ट्रेडर जो या माझ्या आवडत्या दुकानातून भरपूर स्नॅक्स विकत घेऊन मी दुपारी एकच्या सुमारास घरी आले.
मी वरच्या फ्लोअरला होते आणि कपडे बदलून खाली जेवायला येतच होते इतक्यात नवरा ऑस्करला (आमच्या बेबी डॉग ला )घेऊन धावत वर आला, "किचन मधे मोट्ठा साप आला आहे "
काय ? साप ? घराच्या आत ? ? कसा ? ?? मी किंचाळले !
"मी आणि ऑस्कर गार्डन मधे खेळत होतो, बॅकयार्डचं दार उघडच होतं, इतक्यात प्रचंड वेगाने सळसळत एक साप घरात शिरला आणि मी काठी घेऊन येईपर्यन्तं तो वळवळत किचनच्या लेझी सुझॅन कॅबिनेट मधे शिरला , तिथेच लपलाय"

पण याच्या पुढचे जे स्केअरी घटनाक्रम घडले ते अ‍ॅडव्हेन्चर लिहिण्या आधी मी रहात असलेल्या लॉस अ‍ॅन्जलिसच्या 'पोर्टर रँच' या भागाची ओळख करून दिली नाही, तर या घटनेला जस्टिस मिळणार नाही !
……………………………………………………………………………………………………………………………………………
चॅप्टर २: अननोन थ्रेट्स इन द व्हॅली

व्हॅली एरीआ लॉस अँजलिस मधला वॉर्म एरीआ म्हणून प्रसिद्ध आहे , मी रहाते तो 'पोर्टर रँच' हा लॉस अँजलिसच्या नॉर्थ व्हॅली एरीआचा भाग आहे.
हा भाग डोंगरांचे व्ह्युज , ग्रीनरी, पार्क्स आणि अनेक सुंदर हायकिंग ट्रेल्सने सजलेला खूप सुंदर आणि रहायला सेफ एरीआ आहे , क्राइम रेट कमी आहे आणि मेजॉरीटी गेटेड कम्युनिटीज आहेत !
इथे लोक आउटडोअर अ‍ॅक्टिव्हिटिज / बॅकयार्ड पार्टीज अगदी वर्षाचे बारा महिने एन्जॉय करु शकतात असे दृष्ट लागण्या सारखे वॉर्म हवामान इथे असते !
इथल्या डोंगरातून दिसणारे सनराइज, सनसेट्स व आणि संधीप्रकाश तर फार खास असतो !
61E4054C-7326-414A-B2B5-20E775B72189_0.jpeg
इथे घरांच्या कम्युनिटिज सुद्धा डोंगर पायथ्याशी, काही डोंगरावर वसल्या आहेत !
IMG_4004_0.jpeg

पण म्हणतात ना , जगात परफेक्ट असे काही नसते, इव्हन मोस्ट ब्युटिफुल थिंग्ज डु कम विथ सम अनवॉन्टेड पॅकेजिंग , याला निसर्गही अपवाद नाही !
इथे कोरड्या गरम हवामानात हाय विंड्स सुरु झाला कि निसर्ग रुद्रावतार धारण करतो, जगभर सगळ्यांना माहित असलेले लॉस अ‍ॅन्जलिसचे ब्रश फायर्स/वाइल्ड फायर्स हजारो मैल निसर्ग उध्वस्तं करतात, आमच्या एरीयातही एक दोनदा इव्हॅक्युएशन वॉर्निंग आल्या आहेत ब्रश फायरमुळे, हा त्यावेळी माझ्या घरातून दिसणारा डोंगर !
60BFD334-3EC3-43AE-9ABB-838A6EABD275_2.jpeg

Ironically आगीच्या होरपळीने पोल्युटेड झालेल्या आकाशातला सनसेट अजुनच कलरफुल दिसतो
0CC17D05-9A9F-4D1E-A947-4EC8E5C6B6B7_3.jpeg

आगीच्या वेळी डोंगरातली जनावरे मनुष्यं वस्तीत येण्याचे चान्सेस खूप वाढतत !
इथला निसर्गं एखाद्या सुंदर लँडस्केप सारखा रेखीव असला तरी डोंगरां वरच्या उरल्या सुरल्या जंगलातून येणार्‍या कायोटीज, कोल्हे, माउन्टन लायन्स, साप , सरडे, स्कन्क्स, रॅकुन्स अशा अनेक नकोशा पाहुण्यांची थ्रेट इथे नेहेमीच असते !
मला सरडे, पाली, साप अशा प्राण्यांची भयंकर भीती/किळस्/तिटकारा आहे , यामुळेच मला आमच्या किचन मधून बाहेर बॅकयार्डला जाणारे घराचे दार उघडं ठेवायला अजिबात आवडत नाही !
माझा नवरा आणि ऑस्कर यांना मात्रं बॅकयार्ड मधे जायचे भारी वेड आणि घरातून बॅकयार्ड मधे जाणारे ते दार उघडे ठेवायची वाईट सवय !
ऑस्कर आणि माझा नवरा कधी गार्डन मधल्या खारींच्या मागे किंवा सतत खेळायला तरी दार सताड उघडे जातातच !
त्या दिवशी २२ मे ला तसेच झाले होते आणि तो स्ट्रेन्जर घरात घुसला होता .
……………
पुढे : भाग २

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शीर्षक वाचून आणि तुम्ही अमेरिकेत राहता, त्यामुळे गनमॅनशी सामना झाला की काय असं वाटलं,

त्यामुळे साप म्हटल्यावर खरं तर "त्यात काय एवढं?" असं झालं.

पुभाप्र.

गनमॅनशी सामनाही इनडायरेक्टली झाला आहे, मॉल मधे शॉपिंग करत असताना बाजुच्या स्टोअर मधे गन्शॉट्स ऐकु आले, मग दिसेल त्या दुकानात लपलो आणि कॉप्सनी लॉक केला होता मॉल त्या माणसाला अरेस्ट करे पर्यन्त Happy

पुढचा भाग कधी?

गनमॅनशी सामनाही इनडायरेक्टली झाला आहे, मॉल मधे शॉपिंग करत असताना बाजुच्या स्टोअर मधे गन्शॉट्स ऐकु आले, मग दिसेल त्या दुकानात लपलो आणि कॉप्सनी लॉक केला होता मॉल त्या माणसाला अरेस्ट करे पर्यन्त>> हॉरिबल!

भरत यांच्या पहिल्या प्रतिसादाला + १ मग दीपांजलीचा प्रतिसाद वाचून 'बापरे' ला ही +१
मायबोलीवर अजून कुणीतरी अमेरिकेत अनोळखी (सशस्त्र?) माणूस घरात घुसल्याचा प्रसंग लिहिला होता ना? दार उघडं राहिलं असताना तो माणूस आत आला पण प्रसंगावधान दाखवून त्याला बाहेर काढलं असं काही तरी वाचल्याचं आठवतंय.
पुभाप्र.

भरत यांच्या पहिल्या प्रतिसादाला + १ मग दीपांजलीचा प्रतिसाद वाचून 'बापरे' ला ही +१...... +१.

दार उघडं राहिलं असताना तो माणूस आत आला पण प्रसंगावधान दाखवून त्याला बाहेर काढलं असं काही तरी वाचल्याचं आठवतंय....... +१.

असे साप घरात घुसणे डेंजरस आहे. माझ्या चुलत बहिणीकडे बोरिवलीला असाच साप आलेला , येताना बघितले पण घरात कुठे लपलाय तेच कळेना सर्प मित्रांनी येऊन पूर्ण घर रिकामे केले . कुठेच दिसेना बेड वैगरे सगळे चेक केलेले ....या गोंधळात तो शेवटी बालकनी च्या बाहेरून जाताना दिसला पण घरातून बाहेर पडताना दिसला नाही . तरीही घरातला आणि बाहेरचा साप वेगळा असेल हि भीती वाटतच होती.
पुभाप्र

हा इन्सिडन्स माहित होताच पण तू लिहिलंयस एकदम मस्त, धुरन्धर स्टाइल मधे Happy मला पण साप आणि सरपटणार्‍या सगळ्याच प्राण्यांची फार किळस आणि भितीही वाटते.

अरे बापरे!

माझ्या वडलांच्या लहानपणी गावी आजीच्या घरी वाघ घुसला होता. दहा वीस वर्षांपूर्वी पर्यंत आठवण सांगितली जायची.

कौन चा उल्लेख वाचून एखादा विचित्र अथवा सशस्त्र व्यक्ती घरात घुसला की काय असे वाटले.
नंतर सापाचा उल्लेख वाचून हायसे वाटले ( त्यातल्या त्यात कमी रिस्क ह्या अर्थाने )
मग लक्षात आले की आपल्याकडे धामण लै।कॉमन, तसे तिकडचे माहीत नाही.
कोणता साप होता विषारी की बिनविषारी, शिवाय अश्यावेळी pets ची instinct वेगळीच आणि अटॅकिंग असते,
ऑस्करला कसे manage केलेत वै
थोडक्यात काय पुढे लवकर लिहा.

बापरे!! मोस्ट सिनिक जागी राहण्याचे चार्जेस अधुन मधुन भरावे लागतात.

मलाही आधी झकोबासारखे वाटले आणि नंतर हुश्श झाले. Happy

तरी घरात साप ही सिच्युएशन अजिबात साधी नाहीय. तो बाहेर जात नाही तोवर शांत बसता येणारच नाही.

इथे माझ्या आजुबाजुला साप वगैरे फिरतात. मी घाबरत नाही असे नेहमी म्हणते. परवा सकाळी दहा वाजता शेतात जायला दाराला कुलुप लावले, बॅग चेक करत पाच सात पावले चालले आणि समोर काळा साप. मी किती जोरात किंचाळले हे साप सांगु शकतो. Happy त्याला व मला दोघांनाही पळता भुई थोडी झाली. Happy तरी तो धामण होता, इकडे दिवड म्हणतात. रॅट स्नेक.

त्याच्या आदल्या दिवशी तिथेच घोरपड आली. सहसा आत येत नाही पण कुत्र्यांच्या भितीने आली असणार. माझ्या दोन्ही कुत्र्या तिच्यावर भुंकत होत्या. शेवटी त्यांना आवरले तेव्हा ती बाहेर पळाली. Happy

पुढे काय झाले ते लिही. तिकडे सर्पमित्र असतात ना? इथे गावातही आहेत.

२६ तास म्हणजे एक पुर्ण दिवस साप घरात!!!

आमच्या सर्पमित्रांनी लगेच पकडला असता.. Lol

शेवटी धुरंधर कोण बनला??? Happy Happy

बापरे!!!
आमच्याकडे बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये धामण शिरली होती.
सर्पमित्रांनी पकडली
ही अशी साप घरात घुसल्याची स्वप्नं मला हल्ली पडली होती.
उत्सुकता आहे.
लवकर लिहा पुढचा भाग.
फोटो सगळे अप्रतिम आहेत. मस्तच

बाप रे!
निदान येताना दिसला हेही एक ब्लेसिंगच म्हणायचं! नाहीतर अजाणता सहज कपाटात हात घालावा आणि हेच निघावं!

बापरे ! फोटो आवडले.
येथे टेक्सासमधे साप, सरडे, विंचू, सर्वांचा सुळसुळाट आहे. माझ्या उंबऱ्यापर्यंत साप आला होता. हल्लीच एक साळिंदर सुद्धा दिसले. जे जे म्हणून घाणेरडे रेप्टाईल्स आहेत , ते येथे नॅचरली आहेत.

आमच्या बागेतपण दोन आठवड्यांपूर्वी व्हिजीट झाली होती. साधा रॅट स्नेक होता. बहुतेक खार वगैरे खाल्ली असणार. हळू हळू हलचाल करत आधी अंजीराच्या झाडावर मग मागच्या झाडीत गेला. पूर्वी मलाही फार भिती वाटायची, आता थोडी कमी वाटते.
WhatsApp Image 2026-05-29 at 9.46.27 AM.jpeg

छान लिहिलंय.
मला ही पाय असलेलं कोणी घरात घुसलं असेल असंच वाटलेलं शीर्षक वाचुन.
इथे साप नाही दिसत फार, गारबेज डे ला उपवास सोडायला कायोटी आले तर. बाकी अर्बन भाग असल्याने कोणी येत नाही. आलं तर एकदम अस्वलच आल्याच्या बातम्या येतात. Lol
पुभाप्र

आमच्या सोसायटीच्या आवारात नागोबा आहे किंवा होता. मला कधी दिसला नाही. पण लोकांनी फोनचा कॅमेरा तयारच असल्यासारखे फोटो आणि व्हिडियो सोसायटीच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर टाकले आहेत. दहाचा आकडाही स्पष्ट दिसायचा.

ऋतुराज तुझ्या पोस्ट वरून आठवलं.

मी घराजवळ जिथे वॉक करायला जाते तिथे एक मोठी धामण आणि मी एकत्र काही अंतर parallel चाललो. मी घाबरून उडी मारली कट्ट्यावर पण ती शांतपणे निघून गेली झुडपात.

दुसऱ्या वेळी असाच एक सरपट्या आडवा गेला पण कोणत्या जातीचा होता माहिती नाही. वाट क्रॉस करून गेला इतकच. नॅच्युरल habitat मध्ये इतके दोनच पाहिलेत आजतागायत.

थँक्स सगळ्यांना !
भरत,
बापरे, नाग तर अजुन स्केअरी !
अंजली,
किती भयंकर दिसतोय आणि जाड + मोठा आहे तो साप, कुठला आहे ?
अस्मिता,
ग्रेट माइन्ड्स
मी अगदी हेच म्हंटले होते शेवटी नवर्‍याला Proud
साधना,
भाग ३ मधे लिहित आहे सर्प मित्रं, प्रोफेशनल स्नेक रेस्क्यु लोक इ. सगळ्यांचे अनुभव !
आत्ता भाग २ टाकलाय , त्यात फक्तं उल्लेख झालाय.

दीपांजली, छान लिहीलं आहेस. उत्कंठा वाढेल असं!
माझंही आधीचं घर डोंगराच्या पायथ्याशी होतं. तेव्हा असे पाहुणे यार्डात कधी मधी दिसायचे. पण बघता बघता निघुनही जायचे. विंचु मात्र खाशे मेहमान असल्यासारखे घरात कुठेही सापडायचे. अर्थातच त्यांना ठेचण्याशिवाय पर्यायच नसायचा.

दीपांजली, छान लिहीलं आहेस. उत्कंठा वाढेल असं!
माझंही आधीचं घर डोंगराच्या पायथ्याशी होतं. तेव्हा असे पाहुणे यार्डात कधी मधी दिसायचे. पण बघता बघता निघुनही जायचे. विंचु मात्र खाशे मेहमान असल्यासारखे घरात कुठेही सापडायचे. अर्थातच त्यांना ठेचण्याशिवाय पर्यायच नसायचा.

डिजे, गार्डन स्नेक / रॅट स्नेक म्हणतात तो आहे. भारतात बहुतेक धामण म्हणतात. बागकाम करणार्‍यांचा मित्र म्हणतात इथे. उंदीर, उपद्रव देणार्‍या खारी, सशांची पिल्लं (जी भाज्यांची, झाडांची नासधूस करतात) खातात. आमच्या बागेत घारीपण येतात. घुबडांची पण घरटी आहेत मागच्या झाडीत. अमच्या समोर घारीनं सशाचं पिल्लू उचललं होतं. शेजार्‍याच्या यार्डमधे बर्ड हाऊस आहे तिथे कुठल्या तरी पक्षानं अंडी घातली होती, ती अंडी सापानं बघता बघता खाल्ली होती. आम्ही शक्यतो ढवळा ढवळ करायला जात नाही. फक्त कोको बाहेर असताना बारीक लक्ष ठेवतो. आत्तापर्यंत साप घरात येईल म्हणून विचार केला नव्हता तो आता आपसूक यायला लागलाय Uhoh

आपल्याला सगळ्यांना "नगीना" मधल्या अमरिश पुरीची गरज आहे. Lol गेला बाजार पुंगी वाजवायचा शिकण्याची.>>>>> हेच मनात आलेले.
पुंगी शिकायचे क्लास असतात का कुठे?

छान लेख. निसर्गाचे फोटो पण आवडलेत.

आमच्या कडे ( सस्कॅत्चेवान ) साप पाळणारे पण काही हौशी लोक आहेत. कुत्रा, मांजर, ससा , पोपट , मोर एव्हढे ठिक वाटते पण साप, अजगर, पाल हे पण हौशीने पाळायचे प्राणी आहेत हे बघून अचंबित व्हायला होते. Happy