Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झुरळांना प्रकाश सहन होत नाही आणि सध्या अंधाराची कमी नाही . जसे " ऊंबरातील किडेमकोडे उंबर करती लीला " . फार अपेक्षा करू नये.

अपेक्षा आहेच नाही Happy
बस छान वाटले हे बघून.. जे पुढे होईल ते ही छानच होईल..
सध्या जे काही देशात चालू आहे त्याने एक नैराश्य हताशा मनात आलेली त्यात ही झुळूक सुखावणारी ठरली!

काल माझ्या मुलीच्या स्टेटसवर मला हे दिसले. ही मध्येच कुठे राजकारण फोलो करू लागली असे वाटून चेक केले तर ही धमाल सापडली. म्हणजे प्रकरण माहीत होते

घरी येऊन तिला विचारले तर म्हणाली की तिने आधीच माझ्या बायकोला अर्धा तास CJP काय आहे याचे ज्ञान दिले होते. तरीही बायको BJP च करत होती. पण मी CJP फॉलो करताच खुश झाली.

आता आमच्या घरात दोन गट पडले आहेत.
अंकल आण्टी लोक जे BJP आणि इतर राजकीय पक्षांना आपले तन मन धन अर्पण करून बसले आहेत!
तर युथ ज्यांच्या मनात सध्याच्या देशातील परिस्थितीबद्दल असंतोष आहे !

तर युथ ज्यांच्या मनात सध्याच्या देशातील परिस्थितीबद्दल असंतोष आहे !>>>> कुच भी. ते IPL आणि बॉलीवूड मध्ये दंग आहेत.

तर युथ ज्यांच्या मनात सध्याच्या देशातील परिस्थितीबद्दल असंतोष आहे !>>>>आगे बढो, हम तुम्हारे साथ है.

देशभरात सध्या कॉकरोच जनता पार्टीची (Cockroach Janta Party) सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या 6 दिवसांत कॉकरोच जनता पार्टीने इन्स्टाग्रामवर 13 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. कॉकरोच जनता पार्टीने इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या संख्येत भाजपलाही मागे टाकलं. तर काही तासांत काँग्रेसच्या फॉलोअर्सलाही कॉकरोच जनता पार्टी मागे टाकणार असल्याचं दिसून येत आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

कॉकरोच जनता पार्टीच्या एक्स अकाऊंटवर कारवाई करण्यात आली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे एक्स अकाऊंट भारतात बंद करण्यात आले आहे. प्रचंड लोकप्रियतेनंतर कॉकरोच पार्टीचं एक्स अकाऊंट बंद केलं आहे. एक्सच्या अकाऊंट बंद करण्यामागील सध्या अधिकृत कारण समोर आलेलं नाही. कॉकरोच जनता पार्टी संस्थापक अभिजीत दीपके यांनी याबाबत स्वत: माहिती दिली. इन्स्टाग्राम अकाऊंट देखील बंद करण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु ते बंद न झाल्यामुळे आमचं एक्स अकाऊंट भारतात बंद करण्यात आलं, असं अभिजीत दीपके यांनी सांगितले.

Cockroachisback.
नवीन twitter अकौंट,

किती इन्सिक्युरिटी असेल? खरंच ताकद आणि गुणवत्ता असती तर ही अशी चिर्कुटगिरी करावी लागली नसती. शाळा कॉलेज मधल्या मुलांच्या मागे लागलेत.

काल धागा काढला
आज १८ मिलियन झाले
त्यात माझ्या मित्रयादीतील काही मायबोलीकर सुद्धा मला दिसत आहेत Happy

The Manifesto.
Read it once. Read it twice. Then send it to someone who needs to read it.

01
If the CJP comes in power, no Chief Justice shall be granted a Rajya Sabha seat as a post-retirement reward.

02
If any legit vote is deleted, whether in a CJP or opposition-ruled state, the CEC shall be arrested under UAPA, as taking away voting rights of citizens is no less than terrorism.

03
Women shall receive 50% reservation, not 33%, without increasing the strength of Parliament. Additionally, 50% of all Cabinet positions shall be reserved for women.

04
All media houses owned by Ambani and Adani shall have their licences cancelled to make way for truly independent media. Bank accounts of Godi media anchors shall be investigated.

05
Any MLA or MP who defects from one party to another shall be barred from contesting elections — and from holding any public office — for a period of 20 years.

जाहीरनामा.
एकदा वाचा. दोनदा वाचा. आणि मग ज्यांना हे वाचण्याची गरज आहे त्यांना पाठवा.

01
जर CJP सत्तेत आली, तर कोणत्याही मुख्य न्यायाधीशाला निवृत्तीनंतर बक्षीस म्हणून राज्यसभेची जागा दिली जाणार नाही.

02
जर कोणतेही वैध मत हटवले गेले, मग ते CJP किंवा विरोधी पक्षाच्या राज्यात असो, तर नागरिकांचे मतदानाचे अधिकार हिरावून घेणे हे दहशतवादापेक्षा कमी नसल्याने CEC वर UAPA अंतर्गत कारवाई करून त्याला अटक केली जाईल.

03
महिलांना 33% नव्हे तर 50% आरक्षण दिले जाईल, तेही संसद सदस्यसंख्या न वाढवता. तसेच, मंत्रिमंडळातील 50% पदे महिलांसाठी राखीव असतील.

04
अंबानी आणि अदानी यांच्या मालकीच्या सर्व मीडिया संस्थांचे परवाने रद्द करून खऱ्या अर्थाने स्वतंत्र माध्यमांना संधी दिली जाईल. गोदी मीडिया अँकर्सच्या बँक खात्यांची चौकशी केली जाईल.

05
कोणताही आमदार किंवा खासदार जर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेला, तर त्याला पुढील 20 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास तसेच कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घातली जाईल.

मुळात ह्याला पक्ष म्हणुन निवडणूक आयोगाची मान्यता मिळालेली नाही तोवर ह्या जाहिरनाम्याला वगैरे काही अर्थ राहत नाही. पान लाखभर तरुण तरुणी जर ह्यांच्यात सहभागी होत असतील तर त्यांचा रोष समजून घेणे आवश्यक आहे

ह्यातला दुसरा चौथा आणि पाचवा मुद्दा मलाही हास्यास्पद वाटला. ग्राउंड रिॲलिटी न जाणणाऱ्या माणसाने ह्यांव करणार आणि त्यांव करणार म्हणलेले जाणवले.

बातमीदार संस्थांचे परवाने रद्द करणार - कोणत्या ग्राउंड वर??? आधीच तुम्ही अमुक तमूक मालक असलेल्यांचे परवाने रद्द करणार असे म्हणून स्वतःचा बायस दाखवून दिला आहे.

CEC वर UAPA लावणार.
कोणी झुरळ ह्या नियमानंतर पाहिला CEC होण्यास वॉल्न्टीअर करत आहे का ?

पक्ष बदलला तर निवडणूक लढवायला बंदी म्हणजे झुरळ मारायला (पाल म्हणा हवं तर) घर जाळून टाकण्यासारखे झाले.

पाहतेय २-३ दिवस मिडियामधे फार चर्चा आहे, पण एक मीम , जोक यापलिकडे काहीही सब्स्टन्स आहे असे वाटत नाही.
ग्राउंड रिॲलिटी न जाणणाऱ्या माणसाने ह्यांव करणार आणि त्यांव करणार म्हणलेले जाणवले. >>> खरं तर तेवढेही सिरियस वाटले नाही, नुसताच टिपी असे वाटले. पण याचा जर एकांगी प्रचार, विचर, किंवा अंधभक्ती चा ट्रेन्ड थांबवण्यासाठी उपयोग झाला तर चांगले होईल.

सटायर, सिनिसिझम ऐकलं आहे का?
>>> अच्छा, मागण्या मॅनिफेस्टो सगळच सटायर आहे होय. मग काय काहीही चालेल.
पण हे टपाल सर्व जेन झी पर्यंत पोहोचले आहे का ?

काही हास्यास्पद.
Yoon Suk Yeol: The former South Korean leader jailed for life
किती हास्यास्पद!
आता कोणी प्रेसिबेंट व्हायला तयार होणार नाही!

मतदार यादीतल्या एकनेक माणसाबद्दल अकाऊंटेबल राहणे हा थ्रेशोल्ड आहे.
लष्करी सत्ता आणून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो कोरियाचा माणूस जेलमध्ये आहे. तुमची तुलना चुक आहे.

Pages

नवीन प्रतिसाद लिहा