Submitted by Meghvalli on 17 May, 2026 - 07:38

या भवनात ते गीत पुराणे गुंजते अजून,
आर्त संगीत ते पुराणे वाजते भिंतीस बिलगून।।
बंद खिडकी मागे अजुनी येतो विरळ श्वास कुणाचा,
विरलेले ते स्वर कुणाचे शोधत फिरतो वारा दमुन।।
धूसर सावल्या प्रतिक्षेत बसल्या कोणाच्या अजुन,
चांदणेही हरवून बसले या अंगणी उतरुन।।
विझल्या दीपांमधुनी अजुनी धूर उठतो हळूच,
जणू काळोखाशी कुणीतरी बोलत आहे रुसून।।
रिकाम्या या दालनामध्ये काळ थबकला कधीचा,
भंगलेल्या त्या आरशातले चेहरे गेले विरघळून।।
आता उरल्या फक्त स्मृती या दाराशी टेकून,
भवन स्वतःलाच ऐकत बसते त्या गीतास बिलगून।।
या भवनात जो जो येतो,नकळत जातो हरवून,
स्वर राहतात त्यांचे इथेच या भिंतींमध्ये अडकून।।
रविवार, १७/५/२६ , ४:२० PM
अजय सरदेसाई -मेघ
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गूढ आहे. आवडली.
गूढ आहे. आवडली.
धन्यवाद _/\_
धन्यवाद _/\_