काही गोष्टींकडे मनात नसतानाही लक्ष जातं, त्या गोष्टी डोळ्यात भरतात आणि नंतर मनात घर करून राहतात.
रोजच्या धावपळीत शहरात बहावा दिसला तर नशीबवान आहात, नाहीतर रानात किंवा घाटात, रस्त्याच्या कडेला तो हमखास दिसतो.
तसं ते एक सामान्य झाड!
पण वर्षभर सामान्य दिसणारा हा राजवृक्ष त्याचं खरं ऐश्वर्य दाखवतो उन्हाच्या झळा लागताना.. ऐन उन्हाळ्यात!
‘खरं सोनं आगीत तावून-सुलाखून निघतं’ असं म्हणतात, तसंच बहाव्याचं आहे.. भर उन्हाळ्यात त्याची फुलं झुपक्यांनी दिसून येतात आणि मग पूर्ण झाड सोनपिवळ्या फुलांनीच भरून जातं.
मावळतीचं ऊन कधी बघितलं आहे? क्षितिजावर पसरलेलं?
ते मावळतीचं सोनं साठवून घेणारं झाड म्हणजे बहावा!
बहरणं म्हणजे काय ते फक्त बहाव्यालाच माहीत असावं!
बाकीची झाडं फुलतात, बहावा बहरतो..
कालपर्यंत साधारण दिसणारं हे झाड अचानक त्याच्या पिवळ्या धम्मक फुलांनी बहरून जातं! आणि मग आपण ते डोळ्यांत साठवून घ्यायचा प्रयत्न करतो, पण ते सौंदर्य डोळ्यात भरत नाही. मग ते काम आपण आपल्या मोबाईलकडे सोपवतो, पण पूर्ण अपेक्षाभंग!
बहाव्याचं ते ऐश्वर्य सामावून घेईल असा कॅमेरा अजून तरी बघितला नाहीये.. आणि असेल असं वाटतही नाही!
अमावस्येच्या उत्तररात्री कधी आभाळभर पडलेला चांदण्यांचा सडा पाहिला आहे का? तो कितीही बघितला तरी मन भरतं का? नाही ना? तसंच बहाव्यासोबत होतं.
हापूस, काजू, फणस हे उन्हाळ्यात जिभेला आनंद देतात, तसा बहावा डोळ्यांना सुख देतो.
‘डोळ्यांचे पारणे फिटणे’, ‘डोळ्यांत भरून राहणे’ हे असले वाक्प्रचार मला वाटतं बहाव्यासाठीच आहेत…त्याला नजरेचा सुगंध असतो!
नेहमीच्या धावपळीतून आपल्याला थोडं बाजूला नेणारा, आपल्या मनातला एक रसिक/कलेचा कोपरा जो जागवतो तो बहावा…
जो बहकवतो तो बहावा!
एवढं रणरणतं ऊन असूनही त्याचं बहरणं तो थांबवत नाही, तसंच अवतीभवती काहीही असो, आपणही आपलं बहरायचं!
खूप छान वर्णन..
खूप छान वर्णन..
छान लेख.
छान लेख.
बहरलेल्या बहाव्यावर पहाटे मध गोळा करायला येणाऱ्या मधमाश्यांचे गुंजन ऐकत राहणे हा एक सुंदर अनुभव असतो.
अप्रतिम!!!!
अप्रतिम!!!!
मस्त लिहीलेले आहे.
मस्त लिहीलेले आहे.
वाहवा बहावा
वाहवा बहावा

छान लिहिले आहे
फोटो पाहिजे होता. सध्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर बहावे बहरले आहेत.
वाहवा, सुंदर लेख !
वाहवा, सुंदर लेख !
सध्या "साकुरा" देखील छान बहरला आहे.
बहावा - अमलतास अत्यंत आवडीचा,
बहावा - अमलतास अत्यंत आवडीचा, हे स्फुट नजरेतून सुटले नसतेच. छान लिहिलेत.
सध्या दररोज सुवर्णफुलांनी लगडलेल्या बहाव्याचे दर्शनसुख आहे - घरासमोरच्या मुख्य रस्त्यावर ७-८ वर्षांपूर्वी लावलेली वीसेक झाडे ऐन बहरात आहेत. 😍 Dazzling golden hues .
ऋतुराज म्हणतात तसे सध्या मुंबई-पुणे प्रवासात चाफा, गुलमोहर, रंगीबेरंगी बोगनवेली आणि सर्वांना वरताण रूपराज बहावा असे दृष्टीसुख भरभरून आहे.
मस्त...
मस्त...
परदेशात चेरी ब्लॉसम पार्क असतात तसे भारतात बहावा, नीलमोहर आणि गुलमोहर पार्क असावेत असं अगदी मनापासून वाटतं. जपानमध्ये साकुरा फेस्टिवल मध्ये झाडाखाली बसून टी किंवा वाइन पितात म्हणे. आपल्या इथे बहाव्याखाली बसून कोकम नाहीतर पन्हे सर्व्ह करून एक अस्सल देशी समारंभाचा पायंडा पाडायला हवा.
सरनौबत यांचाही बहाव्या वरचा उत्तम लेख आहे.
https://www.maayboli.com/node/78937
या महिन्यात आपल्याकडे बहावा तर हिमालयात नीलमोहर, बुरांश आणि असे कितीतरी वृक्ष ऐन भरात असतात. ते बघायला मिळणं म्हणजे एक पर्वणीच असते.
वास्तविक मला हे झाड नवीन होत
वास्तविक मला हे झाड नवीन होत याच वर्णन मात्र खूप आवडल.