अधल्या-मधल्या नोंदी – १
..... एक-एक म्हणता म्हणता अशा क्षणांची मोळीच बनत जाते.. अन् मग आपल्यातलंच माणूसपण निघून जातंय की काय असं वाटायला लागतं..
दूर सारायचे ठरवले तरी सगळे प्रसंग तसेच नजरेसमोर असतात.. गळून नं जाणाऱ्या ओंजळीतच!!! कुठल्याही अपेक्षा करणं नाहीच आता, पण असलेली किमान तत्व.. खूप मोठा शब्द आहे का हा..? मग तत्व नको.. पण ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे..’ असं वाटणं म्हणजे तर खूप नाहीय नं?
मनाला क्लेश देणाऱ्या व्यक्ति शोधायला कुठं लांब पण बघायला नको.. नवरा.. मुलं.. मित्र मैत्रिणी.. खूप जवळची वाटणारी लोक.. जवळच्या ओळखीतले.. म्हणजे ज्या ओळखीच्या लोकांना आपण जवळचे समजतो.. ह्या आपल्या जगातच तर असतात हे सगळे.
कालपर्यंत मृदुभाषी.., सभ्य वैगेरे वाटणारी व्यक्ति, तिच्या काही व्यक्तिगत स्वार्था करता, आपणही तिच्या कामात तोंड मिटून सहभागी व्हावं म्हणून सरळ, नाही तर आडमार्गाने भिडेला घालते.. काहीतरी लाच सुचवते.. त्या क्षणी ती व्यक्ती तर दुरावतेच.. पण मग आपल्यातलाच एका विश्वासाचा लचका तोडल्याच जातो तेव्हा..
घरातल्याच व्यक्तीने कधीतरी, बाहेर कुणाला तरी खूप दुखावलेलं असतं.. पश्चातापाने ती कबुली दिल्या गेली तरी....
‘अरे!!! ह्याचेही पाय इतके इतके मातीचे!!!!!’ असं वाटून मान खाली, मनाच्या खोल गर्तेत जातेच अगदी. बघायला .. न्याय करायला.. खरं तर कुणीच नसतं. पण आपल्याच मनाचा आरसा त्याचे कोन वेडेवाकडे करून दाखवत असतो. विश्वासघातच वाटत राहतो मग.. आता पर्यंत सांभाळलेली मूल्ये.. केलेले संस्कार.. सगळं गेलं कुठे मग?
हा मिळालेल्या कबुलीचा क्षण तर मोठ्ठाच पहाड बनून राहतो मग!!! कसं विसरायचं सगळं..? करता येईल पाटी कोरी..? कसा चढायचा आता हा अवाढव्य डोंगर..? की मुखवटा घालून चालत राहायचं..?
*****
ह्म्म्म!!! अनुभव नाही
ह्म्म्म!!! अनुभव नाही सुदैवाने, पण समजू शकते.
.
बरेचदा आपलाच फोकस खूप नकारात्मक आणि सिलेक्टिव्ह होउन बसतो. औषधांनी माझा फोकस आणि पर्स्पेक्टिव्ह १८० कोनात बदलला. बर्याच मेमरीजना कुलुपे लागली. त्यामुळे वर्तमानात जगायची एक संधी मिळाली.
.
वी आर अ बन्च ऑफ केमिकल्स. जर ही निव्वळ फेझ नसेल, वारंवारिता असेल तर वैद्यकिय सल्ला घेणे उत्तम. मे बी माझ्याकडे हातोडा असल्या कारणाने, मला प्रत्येक गोष्ट खिळाच वाटत असेलही.
त्याला चुका करण्याची मुभा
त्याला चुका करण्याची मुभा असणं आणि त्याहीपेक्षा विश्वासाने या जगापासून लपवून ठेवेल्या चुका तुमच्यासमोर कबूल करण्याचा मोकळेपणा वाटणं हेच तर जवळीकीचं विश्वासाचं आपलेपणाचं नातं असतं. शेवटी प्रत्येक जण हा मुळात माणूस असतो . त्याला भावभावना असतात. प्रसंगी भावनेच्या आहारी जाऊन चुका त्यामुळेच घडत असतात.
अशावेळी या चुका बाजूला सारून त्यापासून धडा घेऊन भविष्यात अशा तऱ्हेच्या चुका न करण्यासाठी त्याला प्रवृत्त करणे हे काम मूकपणानेही अशा नात्यांमध्ये घडत असतं किंवा असे घडवून आणणे हीच तर तुमची जबाबदारी असते.
कदाचित मला हे नीट शब्दात मांडता येत नाहीये ; व्यक्त करता येत नाहीये.. समजून घ्या !
>>>>>>विश्वासाने या जगापासून
>>>>>>विश्वासाने या जगापासून लपवून ठेवेल्या चुका तुमच्यासमोर कबूल करण्याचा मोकळेपणा वाटणं
होय पण ज्या व्यक्तीवरती हे अनलोड होतं, तिला भार होउ शकतो. अज्ञानातील सुख ती व्यक्ती गमावुन बसते.
आपल्या धर्मात, कन्फेशन नाही. ही एक उणीव असेल का?
आपण ज्या लोकांना आपले मानतो,
आपण ज्या लोकांना आपले मानतो, त्यांच्याकडूनच अपेक्षाभंग झाला की जास्त वेदना होतात कारण तिथे विश्वास गुंतलेला असतो. ‘माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं’ ही फार मोठी अपेक्षा नाही, पण आजच्या जगात तीच सर्वात कठीण वाटू लागली आहे. कदाचित पाटी पूर्ण कोरी करता येत नाही, काही जखमा भरतात, काहींचे ठसे राहतात आणि तेच आपल्याला पुढे अधिक सजग, कणखर बनवतात.
मुखवटे घालून जगण्यापेक्षा आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहून जगणं अधिक समाधान देतं.
दुसरयाला समजून घेन्ताचा
दुसरयाला समजून घेन्ताचा प्रयत्न करा. सगळी कोडी आपोआप सुटतील.
जब WE मेट मध्ये करीना शहीद कपूरला काय सांगते.?
"अरे She must be in love!"
केकू हेच म्हणणार होते 'ती
केकू हेच म्हणणार होते 'ती व्यक्ती असे का वागली?' हा प्रश्न विचारायचा. घडाघड कारणे समोर येतात आणि क्वचित राग येण्याऐवजी कीव येउ लागते किंवा निदानपक्षी वाईट वाटते.
धन्यवाद सामो , पशुपत ,
धन्यवाद सामो , पशुपत , दक्षिणा, केशवकुल.
सामो, कधीतरी सामोरं जायला लागलं अशी फेज होती ती.
त्याला चुका करण्याची मुभा असणं आणि त्याहीपेक्षा विश्वासाने या जगापासून लपवून ठेवेल्या चुका तुमच्यासमोर कबूल करण्याचा मोकळेपणा वाटणं हेच तर जवळीकीचं विश्वासाचं आपलेपणाचं नातं असतं.>> खरं आहे... छोट्या आणि कित्येकदा खूप मोठ्या चुकाही माझा मुलगा लहानपणापासून माझ्यापुढे ठेवतो, आणि तो सांगतो तेव्हा मला बरं वाटतं की बाहेरच्या जगात घाबरून राहण्यापेक्षा तो घरात बोलतो.
बाकी एरवी आम्ही भरपूर भांडू शकत असलो तरी मी तो बोलतो तेव्हा शांतपणे ऐकून घेते नेहमीच.
आपण ज्या लोकांना आपले मानतो, त्यांच्याकडूनच अपेक्षाभंग झाला की जास्त वेदना होतात कारण तिथे विश्वास गुंतलेला असतो.>> अगदी... अगदी...
भार होतो सहन करण्याचा... जवळच्या माणसाने विश्वास गमावल्याच दुःखही वाटतं. पण आपल्याजवळ कुणी मन मोकळं केलं की त्या व्यक्तीचा विचार करून बरं ही वाटतं.
काही जखमा भरतात, काहींचे ठसे राहतात आणि तेच आपल्याला पुढे अधिक सजग, कणखर बनवतात.>> आपल्याला आणि त्या व्यक्तीला पण.
जे काही असेल ते आता जूने झाले
जे काही असेल ते आता जूने झाले असेल आणि त्याचा आता काही त्रास नसेल तर छान.
<<<<<< खूप मोठ्या चुकाही माझा मुलगा लहानपणापासून माझ्यापुढे ठेवतो
>>>
त्या पलीकडे सुद्धा काही असू शकते जे तो तुम्हाला सांगत नसेल असे धरून चालायचे. आपणही कुठेतरी हे करतोच. आपल्याकडेही काही गोष्टी असतात ज्या आपण आपल्या प्रिय व्यक्तींनाही कधीच सांगितल्या नसतात.
एकूणच लेखाबद्दल सांगायचे झाल्यास,
मुळात आपल्या सुख दुःखाचे कारण कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीला होऊ देऊ नये. मग ती व्यक्ती कितीही का जवळची असेना.. हे मी अनुभवातून शिकलो आहे. अनुभवाशिवाय हे समजूच शकत नाही.
सुरेख लिहिलं आहे. पोचलं.
सुरेख लिहिलं आहे. पोचलं.
आपल्याकडेही काही गोष्टी असतात
आपल्याकडेही काही गोष्टी असतात ज्या आपण आपल्या प्रिय व्यक्तींनाही कधीच सांगितल्या नसतात.>> बरोबर आहे. जेवढं सांगितलं.. कळलं... त्यावरूनच समोरच्याला थोडं तरी मोकळं व्हायला मदत झाली असं समजून समाधान मानायचं.
बाकी बसलेले धक्के आपले आपल्यालाच मॅनेज करायला लागतात.
जगात प्रत्येक व्यक्ती
जगात प्रत्येक व्यक्ती थोड्याफार प्रमाणात अशीच असणार... आपल्यासह..
ही वस्तुस्थिती स्विकारली की हा त्रास मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकेल..
चुकीच्या, आदर्श, अवास्तव अपेक्षा ठेवल्या की अपेक्षाभंग होणार..
आणि अपेक्षाभंगाचं दुःखही..
अनिरुद्ध यांच्या प्रतिसादाशी
अनिरुद्ध यांच्या प्रतिसादाशी सहमत.