जगण्याचे पुस्तक इतके सुंदर झाले
शब्दा शब्दाने जणू चांदणे ल्याले
मन व्याकूळ हो अंताशी येता येता
चल पुन्हा नव्याने लिहू आपली गाथा
चल पुन्हा नव्याने भेटू एकामेकां
पोटात पाखरे मनात कातर हाका
चल त्याच पथांवर पुन्हा नव्याने हिंडू
पण जरा वेगळ्या मुद्द्यांवरती भांडू
चल सोबत शोधू नव्या जिण्याच्या वाटा
चल पुन्हा नव्याने लिहू आपली गाथा
हा किती निराळा प्रवास झाला सारा
कधी कंपित स्वर कधी रंगित मोरपिसारा
ही कितीक पाने उलटत गेलो आपण
गोष्टीत पेरले कितीक जगण्याचे सण
ही जिवंत पाने अनंत नव्हती का रे?
प्रत्येक गोष्टीचा शेवट होतो का रे?
विसरलोच आपण पुस्तक जगता जगता
अंतिम धडाही लिहिणे आहे आता...
रे नको नको चल परतू पहिल्या पानी
सुरुवातीपासून लिहू नवीन कहाणी
जगण्याच्या अजुनी प्रगल्भ रिती शोधू
नात्याच्या गाठी पुन्हा नव्याने बांधू
चल पहाट हो अस्ताशी भिडता भिडता
चल पुन्हा नव्याने लिहू आपली गाथा
कातर! आवडली.
कातर! आवडली.
सुंदर
सुंदर
छान!
छान!
पण गाथेसाठी अडसर का शब्दांचा ?
हा क्षण शब्दांचे बंधन झुगारण्याचा !
आवडलीच!
आवडलीच!
धन्यवाद.
धन्यवाद.
@अमितव - दुरुस्त केलेय. गडबडले होतेच जरा. धन्यवाद.
@अनन्त यात्री - अप्रतिम. धन्यवाद.
क्या बात है !!
क्या बात है !!
अनन्तयात्रींचा प्रतिसादही भारीच...
सुंदर.
सुंदर.
खुप छान!
खुप छान!
वाह! अप्रतिम !
वाह! अप्रतिम !
सुंदर.
सुंदर.
सुरेख!
सुरेख!
वाह!अप्रतिम.
वाह!अप्रतिम.
धन्यवाद!
धन्यवाद!
आवडली!
आवडली!
सुरेख. आवडली.
सुरेख. आवडली.
सुंदर! अनन्तयात्रींचा
सुंदर! अनन्तयात्रींचा प्रतिसादही भारीच!
छान
छान