Submitted by सांज on 15 April, 2026 - 13:22
दरवळाच्या कथा सुगंधी माळून केसात हासते
मालिनी गं जखम कोणती ही अवेळी गंधाळते
कोणता हा ऋतू ज्याला बहराचे भान नाही
कंच हिरव्या रेशमाला जरतारीचा मान नाही
अबलख वारू हा अजाण शर्थ तरी ती करा कुणी
तळपायीचे शर सुगंधी वेचून भरा ही अत्तरदाणी
पायरव हा मुग्ध शरांचा सुमनांच्या राजस देशी
लक्ष जखमा साहल्यावर दरवळते ती चारुकेशी
भ्रमभारल्या सुखाचा भ्रमर घुमतो अवतीभवती
वाट त्यास रे कुणी दाखवा त्या तिथे पल्याडची
इथे न कुणी दवडा वेळ नकोच फुंकरही कुणाची
स्वयंभू हा सुगंध आहे यास न विधा कुण्या कुळाची
संजीवनी
०१.०९.२०२५
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा