होर्मुजी जलडमरू
नाद करीतो खणाणा
चाले इराणी तांडव
तुम्ही हे राम म्हणाणा
श्वास कोंडले जगाचे
वारे उष्ण आखातात
घामाघूम सरकारे
विनवणी करतात
तेल वायू दुर्लभची
ओशाळलेले जगणे
कसे दाटले मळभ
धावा देवाचा करणे
गमावले खूप काही
देशाभिमान राहिला
अंतर्यामी हीच उर्मी
दिवा वादळी तगला
एक पोर चिमुकले
मुठी बांधीत हुंकारे
नको जगणे गुलामी
वीर मरण ते बरे
भाळी लाल मळवट
रणी अवतरे वीर
माती मागे बलिदान
अंगी विजेचा संचार
कुणा लढाई चलनी
कुणा असे अस्तिवाची
कुणा सार्वभौमत्वाची
कुणा लढाई तेलाची
कुणी रोज बरळतो
भय नाना दाखवितो
जग कंटाळले आता
बेसूर ट्रपेंट वाजतो
अग्नीतांडव चालले
निरपराध जळताती
भिंतिवर लटकलेले
देव आत ओशाळती
इतिहासाचा दाखला
बळीने कान पिळला
राष्ट्र हवे बलशाली
मदांधाला ठेचायला
इतरांचेही स्वातंत्र्य
माणसानं आदरावे
जन्म मानवी दुर्मिळ
बंधूभाव जागवावे
कोण हरले जिंकले
धुमसती चिता किती
अजूनही वधस्तंभ
कलेवरे मागताती
आम्ही पेरतो द्वेषची
कशी अमृताची फळे
आला जवळ विनाश
तरी काहीच न कळे
© दत्तात्रय साळुंके
१३-४-२०२६
अत्यंत समयोचित!
अत्यंत समयोचित!
ह्या घ्या माझ्या दोनोळ्या
"जहाजे येतील जहाजे जातील बॉंब करतील ठणाणा
आयुष्यांचा नाश होतोय राम कारे म्हणाना"
वास्तवदर्शी! केकू चांगली भर.
वास्तवदर्शी!
केकू चांगली भर.
माझं पण एक शेपुट:
पेरुनी ही द्वेषबीजे
वाजवती जलडमरू
कळे ना कसे गड्या
सारेच की जलद मरु।
केशवकूल
केशवकूल
मानव
खूप धन्यवाद...
दोनोळ्या, चारोळ्या छानच की.
आवडली.
आवडली.
शुक्रवारी समेट
शुक्रवारी समेट
अन् सोमवारी लढण्याचा बाणा
कुणाचा वाढे पैका पण
तुम्ही आम्ही राम म्हणा !
शर्मिला अगदी अगदी!
शर्मिला
अगदी अगदी!
शर्मिला सामो खूप धन्यवाद
शर्मिला
सामो
खूप धन्यवाद