Submitted by Meghvalli on 30 March, 2026 - 00:57

तीन ऋतू तीन तर्हा
धर्म वेगळे,वेगळी ओळख
हिरवा, रखरखीत, पानगळ
ऊन्हाळा गरम
पावसाळा चिंब
हिवाळा थंड
ठरवलं एकदा तिघांनी
करु आपण बंड
ऊन्हाळा झाला चिंब
घामाने
पावसाळा झाला थंड
पाण्याने
हिवाळा झाला गरम
चहाने
बदलले काहीच नाही
ना धर्म ना ओळख
नावं ही नाही
शनिवार, २८/३/२६ , २:०० PM
अजय सरदेसाई -मेघ
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा