चार ४चा खेळ
Posted
1 month ago
शेवटचा प्रतिसाद
1 month ago
28
चार ४ आणि गणिती operations वापरून अनेक संख्या सहजी बनतात.
जसे:
1 4 ÷ 4 + 4 − 4 = 1 + 0
8 4 + 4 + 4 − 4 = 8
28 4! + 4 − 4 + 4 Factorial!
2 4 ÷ 4 + 4 ÷ 4 = 1 + 1
52 4‖4 + 4 + 4 Concatenation
एक साधा खेळ बनवला आहे. खेळून पहा, कसा वाटतो ते सांगा, आवडल्यास इतरांनाही पाठवा.
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त आहे खेळ. १ ते १०० पर्यंत
मस्त आहे खेळ. १ ते १०० पर्यंत सर्व संख्या यातून तयार करता येतात का? मी काही ट्राय केल्या. असेच प्रत्येक एक अंकी संख्येनेही होऊ शकते का?
एकदा दिलेला कंस काढायचा कसा? कधी तो जातो असे दिसते, कधी एकाचे दोन होतात व परत एक राहतो.
खतरनाक खुराक दिलात डोक्याला.
खतरनाक खुराक दिलात डोक्याला. फार मस्त.
छान आहे खेळ!
छान आहे खेळ!
माझे निरीक्षण: कंसावर टिचकी मारली की एक येतो, परत टिचकी मारली की दुसरा आणि परत टिचकी मारली की दोन्ही जातात.
कंसात काही ऑपरेशन करून मग येणारी संख्या वापरून concatenate करू देत नाही. उदा(4÷4)||4= 14 करता येणार नाही. तेव्हा कंसांनंतर ते चिन्ह आलं की त्या आधीचा उजवा कंस बंद होतो.
मस्त आहे खेळ अस्चिग! मी
मस्त आहे खेळ अस्चिग! मी दहापर्यंत पोचले आहे.
कंसाच्या बाबतीत मा.पृ. +१
मी ३ ला अडकले व मग लगेच झोपुन
मी ३ ला अडकले व मग लगेच झोपुन गेले. पण मस्त आहे हा खेळ.
वीसपर्यंत पोचले!
वीसपर्यंत पोचले!
अकरावर खूप वेळ अडकले आणि मग एकदम ट्यूब पेटली!!
I solved #30 with four 4s!
तीसपर्यंत पोचले!
I solved #30 with four 4s! (30/100)
Can you?
https://ashishmahabal.github.io/four4s/
अरे मस्त आहे हे.. दोन तीन
अरे मस्त आहे हे.. दोन तीन नंबर ट्रायल म्हणून चेक केले. मुलांना खुराक म्हणून द्यायला छान आहे. मोबाईल ऍप स्वरूपात बनवायचा विचार असल्यास आणि तसे केल्यास शेअर जरूर करा.
रँडम नंबर आणि रँडम आन्सर अशा स्वरूपात सुद्धा बनवता येईल..
मी आता चाळीसला पोचलो.
मी आता चाळीसला पोचलो.
मोबाईल ऍप, रँडम नंबर व अपेक्षित उत्तर काय रँडमली विचारणे (असेच म्हणतोयस ना?) कल्पना छान आहे.
मी आता चाळीसला पोचलो.
मी आता चाळीसला पोचलो.
>>>>
किती खोटे बोलाल....
तुम्ही पन्नाशीला पोहोचलेले आहात
आणि हो बरोबर, रँडम नंबर म्हणजे दर प्रश्नाला LHS ला काही वेगवेगळे सिंगल डिजीट नंबर्स येणार ज्यांचे असेच arithmetic operations करायचे आणि RHS ला जी फिगर आहे ती मिळवायची.
किंवा मग RHS ला देखील असेच काही वेगळे सिंगल डिजिट नंबर असणार तिथेही काही गुणाकार भागाकार करायचे आणि LHS=RHS जमवायचे. ज्याची मग एकापेक्षा जास्त उत्तरेही असू शकतील.
अजून असे वेगवेगळे ट्विस्ट विचार करून देता येतील. इझी मिडीयम हार्ड लेव्हल राहतील.
अर्थात असे ऍप असतीलही म्हणा. मुलगी लहान असताना पझल आणि लॉजिकल रीजनिंगचे ऍप शोधून खेळायचो आम्ही. पण गणिती आकडेमोडीची आवड पझल आवडणाऱ्या सर्वांनाच असेल असे नाही.
थोडे गणित विषयाला धरून अवांतर,
किंवा मल्टिपल टास्कवाला ग्रूप गेम ज्यात एक टास्क काहीतरी आकडेमोड राहील. ग्रुपमधील गणिताची आवड असणारे त्यात हिरीरीने पुढे येतील.
नुकतेच मुलीचा बर्थडे झाला त्यात जनरल नॉलेज प्रश्न, हिंदी मराठी शब्दांचा खेळ, टॅग लाइन वरून प्रॉडक्ट ओळखून उचला असे काही खेळ खेळलो ज्या सर्वांना भारी रिस्पॉन्स मिळाला. हे खेळ ठरवताना काहीतरी गणिती आकडेमोडीचा खेळ खेळता येईल का असाही प्रस्ताव मी मांडलेला जो 2-1 या बहुमताने फेटाळला गेला. पण पुढच्या वेळी तयारीने कुठलातरी आकडेमोडीचा खेळ रोचक स्वरूपात शोधून हा प्रस्ताव पुन्हा मांडून पास करून घ्यायचा असे माझे टार्गेट आहे
४ खेळाची आवडलेली गोष्ट म्हणजे
४ खेळाची आवडलेली गोष्ट म्हणजे जसे वर एकेक चिन्ह सिलेक्ट करत होतो तसे खाली उत्तर बदलताना बघायला मजा येत होती. त्यामुळे नुसते उत्तर करेक्ट किंवा चूक एवढेच न समजता आपण जे सूत्र मांडले आहे त्याचेही उत्तर समजत होते. हा खेळ लहानपणी वर्गात खेळायचे तेव्हा वहीत अशी फॅसिलिटी नव्हती
मीपण चाळीसवर पोचले!
मीपण चाळीसवर पोचले!
पन्नासला पोचले.
पन्नासला पोचले.
खेळ आवडतो आहे हे ऐकून छान
खेळ आवडतो आहे हे ऐकून छान वाटले.
इतरांबरोबर नक्की शेअर करा.
६६
६६.
मी with concatenate खेळतोय सध्या. नंतर त्याशिवाय खेळेन.
मी सत्तरला पोचले. Concatenate
मी सत्तरला पोचले. Concatenate वापरत नाहीये. नंतर तेही वापरून बघेन.
मी ७१ ला अडकून पडले आहे!
मी ७१ ला अडकून पडले आहे!
काही क्ल्यू आहे का अस्चिग/मा.पृ.?
मी पण.
मी पण.

चोवीस मध्ये दोन / चार ऍड करून मग त्याला अपूर्णांकांनी भागुन (तीन अंक गेले यात) ६६ ते ७० पोचलो. पुढे विषम संख्यांवर अडकलोय अद्याप.
तुम्ही वेगळी ऑपरेशन्स वापरली असतील तर त्याची हिंट द्या.
हो ना! मला अशाच खटपटी लटपटी
हो ना! मला अशाच खटपटी लटपटी करून ७० आणि ७१ च्या मधलाही एक अपूर्णांक मिळाला. पण ७१ काही प्रसन्न झाला नाही अजून.
५ आणि ९ मिळतात दोन आकडे वापरून. पण बाकी दोन आकड्यांमधे ६६ किंवा ७५ किंवा ८० किंवा ६२ नाही मिळत. तीन आकडे लागतायत.
काखेला कळसा झाले. आधी
काखेत कळसा झाले. आधी एक्काहत्तरला एका साध्या अपूर्णांकाने गुणा मनातच. उत्तर मिळेल.
५, ९ व्यतिरिक्त दोन अंक वापरून १२ पर्यंत सगळ्या संख्या मिळतात, ७ व ११ सोडुन.
येस
येस
अरे! काय मस्त हिंट दिलीत मानव
अरे! काय मस्त हिंट दिलीत मानव. जमले ७१!
I solved #100 with four 4s!
I solved #100 with four 4s! (100/100)
Can you? https://ashishmahabal.github.io/four4s/
अरे वा! मस्तच! अभिनंदन!!
अरे वा! मस्तच! अभिनंदन!! तुम्ही पहिलेच.
अनेकांना हे माहित नाही की पहिले ९९ झाल्याशिवाय १०० करता येत नाही.
१०० सोबतच्या स्मायलीचा स्नॅपशॉट टाका नाहीतर लोकांना एप्रिल फूल केले असे वाटायचे (solved squareवर टिचकी मारल्यास तुमचे त्या आकड्याचे उत्तर दिसते हे तुम्हाला माहित आहेच).
<<नाहीतर लोकांना एप्रिल फूल
<<नाहीतर लोकांना एप्रिल फूल केले असे वाटायचे>>
क्या बात है मानव! अभिनंदन!!
क्या बात है मानव! अभिनंदन!!
अरे वाह, अभिनंदन !!
अरे वाह, अभिनंदन !!
धन्यवाद तिघांनाही.
धन्यवाद तिघांनाही.
संख्यांच्या की-पॅडवर सोडवलेल्या उत्तर संख्येवर टिचकी मारली की आपण त्याचे उत्तर कसे मिळवले ते दिसते. त्यातील जिथे जिथे concatenate वापरले होते (सहा - सात वेळा वारपले होते) ते आता concatenate न वापरता सोडवले.