Submitted by Meghvalli on 13 March, 2026 - 05:42

पाहून ती सुंदर बाला झाला माझ्या मनाचा पतंग,
उंच भराऱ्या मारतो गगनात माझ्या मनाचा पतंग।
तिच्या तीक्ष्ण कटाक्षाने कापला दोर भरकटला पतंग,
भिरभिर भिरभिर भिरभिरतो हवेत माझ्या मनाचा पतंग ।
माझा पतंग नव्हता लेचा-पेचा, त्याची दोरी धारदार,
कापले कित्येक पेच ,कधी न बधला माझ्या मनाता पतंग।
आभाळाच्या वाटेवर हरवली माझी दिशा सारी,
वाऱ्याच्या झुळुकीने भरकटत राहिला माझ्या मनाता पतंग।
हातात मनाचा दोर होता, तरी काहीच ना चालले माझे,
तिच्या नजरेसमोर का असहाय झाला माझ्या मनाचा पतंग।
तिच्या डोळ्यांच्या त्या जादूने सैरभैर झाले माझे मन,
क्षणात स्वप्नांच्या नभात हरवून गेला माझ्या मनाचा पतंग।
‘मेघ’ म्हणे खेळ हा पतंग-दोरीचा न्यारा निराळा,
कधी जिंकतो , कधी कटतो माझ्या मनाचा पतंग।
शुक्रवार, १३/३/२६ , १:०९ PM
अजय सरदेसाई -मेघ
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली. वेगळीच कल्पना.
आवडली. वेगळीच कल्पना. नाविन्यपूर्ण!